ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मुलचेरा तालुक्यातील चिचेला येथे शेतकऱ्याची स्ट्रॉबेरी लागवड यशस्वी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर मॅडम यांनी प्रत्यक्ष शेतावर भेट देऊन स्ट्रॉबेरी लागवडीची पाहणी

मुलचेरा तालुक्यातील चिचेला येथे शेतकऱ्याची स्ट्रॉबेरी लागवड यशस्वी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर मॅडम यांनी प्रत्यक्ष शेतावर भेट देऊन स्ट्रॉबेरी लागवडीची पाहणी केली.  मुलचेरा दुर्गम व आदिवासी बहुल अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आधुनिक, तंत्रज्ञानाधारित आणि बाजारपेठाभिमुख शेतीचे नवे पर्व सुरू झाले आहे. मुलचेरा तालुक्यातील गोमणी मुख्यालयातील चिचेला येथील प्रगतशील शेतकरी सुबेनराव गंगाराव येरमे […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

एटापल्ली येथे ‘शिवजन्मोत्सव सोहळा’ २०२६ उत्साहात संपन्न.

माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन. सुप्रसिद्ध गायिका कु.भाग्यश्री व धनश्री वाटकर भगिनी यांच्या भक्ती-संगिताने संपूर्ण परिसर मंत्रमुग्ध.! एटापल्ली:- स्थानिक राजमुद्रा फाउंडेशन,समर्पण ट्रस्ट व श्री सार्वजनिक युवा गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शिवजन्मोत्सव सोहळा’ २०२६ मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाच्या वातावरणात पार पडला. या भव्य सोहळ्याचे उद्घाटन अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मार्कंडा येथे ‘मिनी सरस महोत्सवा’चे दिमाखदार उद्घाटन; ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ*

गडचिरोली, दि. १६ (जिमाका) : ग्रामीण भागातील महिला स्वयं सहाय्यता समूहांच्या हाताला काम मिळावे तसेच त्यांच्या उत्पादनांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने ग्रामविकास विभाग, ‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा देवस्थान येथे ‘मिनी सरस महोत्सवा’चे आज थाटात उद्घाटन करण्यात आले. हा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

‘महिला आयोग आपल्या दारी’ शुक्रवारी गडचिरोली जिल्हयात महिलांनी पुढाकार घेत आपल्या तक्रारी मांडाव्या- रुपाली चाकणकर यांचे आवाहन

महिलांनी पुढाकार घेत आपल्या तक्रारी मांडाव्या- रुपाली चाकणकर यांचे आवाहन गडचिरोली दि. १६ फेब्रुवारी – महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात शुक्रवार दि. २० फेब्रुवारी, २०२६ रोजी जनसुनावणी आयोजित करण्यात आली असून, आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर तक्रारींची सुनावणी घेणार आहेत. नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे सकाळी ११ वाजता […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

जिल्हास्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा २०२६ चे उत्साहात उद्घाटन

गडचिरोली, दि. १६ फेब्रुवारी २०२६ : गडचिरोली जिल्हास्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा – २०२६ चा उद्घाटन जिल्हाधिकारी श्री. अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या हस्ते आज सकाळी जिल्हा क्रीडा संकुल येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

स्थानिक वापरासाठी रेती खरेदीसाठी महाखनिज पोर्टलचा वापर बंधनकारक,600 रुपये प्रति ब्रास दर.

मुलचेरा तहसीलदार चेतन पाटील यांचे आवाहन मुलचेरा, प्रतिनिधी –स्थानिक शासकीय तसेच वैयक्तिक बांधकाम साठी रेती (वाळू) खरेदी किंवा वाहतूक परवाना प्रक्रियेसाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या महाखनिज पोर्टल (Mahakhanij) वरून ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासंदर्भात मुलचेरा तालुक्याचे तहसीलदार चेतन पाटील यांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. तहसीलदार पाटील यांनी सांगितले की, शासनाने रेती […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे होणार वेगाने परिवर्तन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन सोबतच्या करारांमुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील विकास महाराष्ट्रभर पोहोचविणार मुंबई, १२ : महाराष्ट्र विविध क्षेत्रांसह देशाच्या प्रगतीमध्ये वेगळा ठसा उमटवीत आहे. राज्याच्या प्रगतीचा वेग असाच कायम ठेवून राज्य शासनाच्या विविध स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे वेगाने परिवर्तन होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन सोबत करण्यात […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

शेतकऱ्यांसाठी मोठी डिजिटल संधी — महाविस्तार AI अ‍ॅपवर तात्काळ नोंदणी करण्याचे तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांचे आवाहन

मुलचेरा: शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, शेती अधिक आधुनिक व फायदेशीर व्हावी, तसेच शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ सहज व पारदर्शकपणे मिळावा, यासाठी सुरू करण्यात आलेल्या महाविस्तार AI अ‍ॅपवर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने नोंदणी करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांनी मुलचेरा वासियांना केले आहे. राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने सुरू करण्यात आलेले महाविस्तार […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

“रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता?” मुलचेरा – आष्टी मार्गाची दयनीय अवस्था; तात्काळ दुरुस्ती करा – काँग्रेसचे मुलचेरा तालुका अध्यक्ष प्रमोद गुट्टेवार यांचा इशारा

मुलचेरा :- गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा – आष्टी मार्गाची अवस्था अत्यंत बिकट झाली असून संपूर्ण रस्ता खड्ड्यांनी विद्रूप झाला आहे. नागरिक अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे, हेच ओळखू येत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया वाहनचालक व्यक्त करत आहेत. दररोज शेकडो विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी व रुग्णवाहिका या मार्गावरून प्रवास […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

देवदा–एटापल्ली रस्त्याच्या कामाबाबत तक्रार; चौकशीचे निर्देश

देवदा–एटापल्ली रस्त्याच्या कामाबाबत तक्रार; चौकशीचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सार्वजनिक बांधकाम विभागास पत्र देवदा ते एटापल्ली या महत्त्वाच्या मार्गावरील रस्त्याच्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाली असून, या प्रकरणी चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथून सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांना पाठविण्यात आलेल्या पत्रानुसार, संबंधित रस्त्याचे काम मंजूर आराखडा व तांत्रिक […]