ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

दिव्यांग लाभार्थ्यांसाठी UDID-आधार संलग्नीकरण अनिवार्य; 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन : श्रीमती सविता झाडे नायब तहसीलदार, (संजय गांधी ) मुलचेरा

मुलचेरा:-

शासन निर्णय दि. 15 सप्टेंबर, 2024 अन्य दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात 1000/- रु. ची वाढ करून 2500/- इतके अनुदान D.B.T. प्रणाली द्वारे देण्यात येत आहे. करिता लाभार्थ्यांचे ऑनलाइन UDID कार्ड (दिव्यांग प्रमाणपत्र) पोर्टलवर अपडेट करणे आवश्यक आहे. अवर सचिव, महाराष्ट्र शासन, दिव्यांग कल्याण विभाग, यांचे पत्र क्र. बैठक-2026/प्र.क्र.-22/काय-6 दि. 04.03.2026 चे अनुषंगाने दिव्यांग कल्याण विभागाच्या सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांचे UDID आधार संलग्नीकरण करण्याबाबत दि. 5 मार्च, 2026 रोजी दुपारी 12.00 वाजता आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये जिल्ह्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग योजनेतील लाभार्थ्यांना UDID व आधार संलग्न नसल्याबाबतची माहिती समक्ष सादर केली असून सदर लाभार्थ्यांची माहिती DBT प्रणालीवरील माहिती अपडेट करण्याचे निर्देश दिलेले आहेत. दिव्यांग लाभार्थी लाभापासून वंचित राहू नये म्हणून लाभार्थ्यांनी आपले UDID कार्ड आधार क्रमांक व बँकेचे पासबुक झेरॉक्स गावातील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) किंवा तहसील कार्यालय संजय गांधी योजना येथे दि. 20.03.2026 पूर्वी जमा करावे तसेच दिव्यांग UDID Portal वरून e-KYC करण्याबाबतचे निर्देश समक्ष इति उक्त अवर सचिव, महाराष्ट्र शासन, दिव्यांग कल्याण विभाग, यांचे पत्र क्र. बैठक-2026/प्र.क्र.22/काय-6/234546 नुसार देण्यात आलेले आहे. करिता उपरोक्त योजनांच्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी दि. 20.03.2026 पूर्वी UDID कार्डची झेरॉक्स प्रत ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) किंवा तहसील कार्यालय संजय गांधी योजना येथे सादर करण्याबाबत UDID Portal वरून e-KYC करण्याबाबत याद्वारे आवाहन करण्यात येत आहे. श्रीमती सविता झाडे नायब तहसीलदार, (संजय गांधी ) मुलचेरा