मुलचेरा- मागील दोन दिवसापासून तालुक्यात चालू असलेल्या सततधांर पाऊसामुळे दिनांक 21जुलै ला देवदा- रेगडी मुख्य रस्त्यावर एक मोठे झाड पडून वाहतूक काही काळासाठी प्रभावित झाली होती. ही बाब आपल्या महसूल विभागाच्या पथकासोबत अतिवृष्टिग्रस्त भागात दौऱ्यावर असलेल्या मुलचेऱ्याचे तहसिलदर चेतन पाटील यांना कळताचं त्यांनी तात्काळ आपल्या महसूल विभागाचे पथक व स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने झाड बाजूला हटवून रस्ता पूर्ववत वाहतुकीसाठी चालू केला. याप्रसंगी मंडळ अधिकारी अरुण नागरगोजे, तलाठी प्रशांत मेश्राम, महसुल सहाय्यक हितेश लांजेवार उपस्थित होते.
Related Articles
महाराष्ट्रातील ३ हजार कोटी रूपयांच्या अतिरिक्त प्रकल्पांच्या प्रस्तावास मंजुरी मिळावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
केंद्रीय अर्थसंकल्प २०२३-२४ च्या पूर्वतयारी बैठकीत विविध महत्त्वपूर्ण मागण्या नवी दिल्ली, दि. 25 : महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला गती मिळण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या सुमारे 3 हजार कोटी रुपयांच्या अतिरिक्त प्रकल्पांच्या प्रस्तावास मंजुरी प्रदान करावी, अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली येथे केली. येथील मानेकशॉ सेंटरमध्ये केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय अर्थसंकल्प : 2023-24 […]
यावर्षी या तारखेपासून होणार शाळा सुरू – विद्यार्थी व पालकांसाठी मोठी बातमी
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांना २ मेपासून सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. तर नवीन शैक्षणिक वर्ष १२ जूनपासून सुरू होणार आहे विदर्भात मात्र, 26 जूनपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षण विभागाकडून यासंदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले आहे. पहा काय सांगितले शिक्षण विभागाने इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल ३० एप्रिलपर्यंत लागणार आहे. […]