मुलचेरा-: बऱ्याचदा महसूल विषयक कामकाजाविषयी माहिती नसल्यामुळे शेतजमिनविषयक कामकाजत नागरिकांना नाहक त्रास उद्भवत असतो. परिणामी जमीन खरेदी विक्री प्रकरण असो किंवा जमिनीबाबत इतर विषय असोत,नागरिकांना असलेल्या माहितीच्या अभावी बरेचशे प्रकरणे न्यायालयापर्यंत जात असतात. नागरिकांना महसूली व्यवहाराची अगदी सोप्या भाषेत माहिती व्हावी या हेतूने माजी सेवानिवृत्त सनदी अधिकारी शेखर गायकवाड (भा.प्र.से) यांच्या संकलपनेतून साकर झालेले, संजय दैने जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनातून व मुलचेऱ्याचे तहसीलदार चेतन पाटील यांच्या प्रत्यक्ष कृतीतून निर्माण झालेले गोष्टीरूप महसूल वाचनालयाचे उदघाटन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते झाले.स्थानिक तहसील कार्यालयात दिनांक 3 आगस्ट ला मुलचेरा तालुक्यातील विविध विकास कामांचा आढावा घेण्याकरिता आले असता त्यांनी सदर गोष्टीरूप महसूल वाचनालयाचे उदघाटन केले. सदर गोष्टीरूप महसूल वाचनालयात शेतजमीन विक्री प्रकरण, आदिवासी शेतजमीन हक्क हस्तांतरण, शेतजमिन विभाजन अश्या एकूण 36 प्रकारच्या जमीन व्यवहाराशी निगडित गोष्टीबाबत चित्राच्या माध्यमातून तसेच मार्मिक गोष्टीच्या माध्यमातून त्यांची माहिती विषद केले आहे. सदर गोष्टीरूप महसूल वाचनालय हे जिल्ह्यातील एकमेव वाचनालय असल्याने मुलचेऱ्याचे तहसीलदार चेतन पाटील यांच्या सदर उप्रकमाचे मंत्रिमहोदयानी कोतुक केले.
Related Articles
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना
राज्यात निराधार, अंध, अपंग, शारिरीक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती व निराधार विधवा, परित्यक्त्या, देवदासी या सर्व दुर्बल घटकांसाठी अर्थसहाय्य देण्याच्या हेतूने राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृध्द व्यक्तींसाठी श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना राबविण्यात येतात. इंदिरा […]
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
स्थायी आणि स्थलांतरीत पध्दतीने मेंढपालनासाठी पायाभूत सोई-सुविधेसाठी २० मेंढ्या + १ मेंढानर अशा मेंढी गटाचे ७५% अनुदानावर वाटप. सुधारीत प्रजातीच्या नर मेंढ्याचे ७५% अनुदानावर वाटप करणे., मेंढी पालनासाठी पायाभुत सोई-सुविधा उपलब्ध करुण देण्यासाठी ७५% अनुदान., मेंढी पालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करुन देण्यासाठी ७५% अनुदान. हिरव्या चार्याच्या मुरघास करण्या करीता गासड्या बांधण्याचे तंत्र खरेदी करण्यासाठी ५०% अनुदान पशुखाद्य कारखाने उभारण्यासाठी […]
राज्यात प्रत्येक जिल्ह्यात होणार रोजगार मेळावा – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा
औरंगाबाद जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्याला मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळाला. अशाच प्रकारच्या रोजगार मेळाव्यांचे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात नियोजनपूर्वक आयोजन करण्यात यावे अशा सूचना कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिल्या. प्रधानमंत्री कौशल्य व महारोजगार मेळावा राज्यभरात आयोजित करण्याबाबत मंत्रालयातील त्यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी ही सूचना केली. बैठकीस कौशल्य […]