ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

अमित शहा व परभणी च्या घटने विरुद्ध मुलचेरा येथे तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा

मुलचेरा:- परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अवमानकारक शब्द वापरल्या प्रकरणी मुलचेरा येथे आज प्रबुद्ध बौद्ध समाज तर्फे निषेध मोर्चा काढून मुख्यमंत्री यांना तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले. मुलचेरा येथील बुद्ध विहारापासून निषेध मोर्चा काढण्यात आला.मोर्चाचे नेतृत्व दुष्यंत चांदेकर यांनी केले .पोलिसांनी मोर्चा तहसील कार्यालयाच्या प्रवेश द्वारा जवळ थांबवून नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले . निवेदनात म्हटले आहॆ ,10 डिसेंबर रोजी परभणी येथे संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणारा सोपान पवार याच्यावर देशद्रोहा चा गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा ठोठवावी.या प्रकरणी पोलीस कोठडीत मृत्यू पावलेला सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची शासनाने आर्थिक मदत करुन कुटुंबातील एकाला शासकीय सेवेत घेऊन कुटुंबाचे पुनर्वसन करावे.पोलिसांच्या कोबिंग ऑपरेशनची न्यायालयीन चौकशी करावी.पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड सह ईतर दोषी अधिकाऱ्यांवर अँट्रोसिटी actअंतर्गत गुन्हे दाखल करावे.परभणी शहरातील सर्व पोलीस स्टेशन चे सीसीटीव्ही फुटेज तपासावे.आदी मागण्या करण्यात आल्या.निषेध मोर्चा च्या आयोजन समितीचे अध्यक्ष शुभम शेंडे,उपाध्यक्ष विनोद झाडे,प्रफुल दुर्गे,सूर्यप्रकाश चांदेकर,सचिव कालिदास दुर्गे,कोषाध्यक्ष लवकुमार दुर्गे,सहसचिव रवींद्र झाडे,मीडिया प्रमुख रोहित करमे,येल्ला चे उपसरपंच दिवाकर उराडे,कवडूजी चल्लेवार ,कालिदास कुसनाके,आंबटपल्लीचे सरपंच उमेश कळते,सेवानिवृत्त मुख्याध्यापक शेंडे,सत्यवान भडके यांच्या सह तालुक्यातील बहुसंख्य बांधव उपस्थित होते.यावेळी मोर्चा स्थळी माजी जि प अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी भेट दिली.