महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची सेवा निवृत्तीवेतनासह आणि इतर थकबाकी रक्कम तातडीने वितरित करण्यात यावी, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर यांनी दिले. निर्मल भवन येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी कर्मचारी संघटनेच्या विविध मागण्यांसाठी आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, वित्त विभागाचे संचालक सिताराम काळे […]
ठाणे शहरातील रस्ते, नालेसफाईच्या कामांची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी ठाणे, दि. 22 (जिमाका) :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील नालेसफाई आणि रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई, रस्त्यांची कामे ही दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. कॉनवूड जंक्शन येथील चौक सुशोभीकरण व रस्त्याचे काम, पवार नगरमधील रस्त्यांची कामे, टिकुजीनी वाडी ते नीलकंठ रस्ता, […]
राज्यातील वंचित, संकटग्रस्त महिलांसाठी केंद्र पुरस्कृत “उज्ज्वला” व “स्वाधार” या योजनांची अंमलबजावणी सन २०१६ पासून करण्यात येत आहे. शासन निर्णयान्वये केंद्र पुरस्कृत स्वाधार योजनेंतर्गत राज्यातील निराधार, निराश्रित, नैसर्गिक आपत्तीत / कौटुंबिक हिंसाचारामध्ये बेघर झालेल्या महिला व त्यांच्या बालकांना अन्न, वस्त्र, निवारा व वैद्यकीय मदत, कायदेविषयक समुपदेशन तसेच हेल्पलाईनव्दारे मार्गदर्शन, समुपदेशन उपलब्ध करुन देण्यात येते. तसेच […]