31 डिसेंबर 2024 रोजी नववर्षाचे आगमन उत्सव जिल्ह्यात सर्वत्र साजरा केला जाणार आहे. तसेच काही विविध राजकीय पक्ष, संघटना व इतर नागरिक हे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे, मोर्चे, आंदोलने, सभा, मिरवणुक, सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता असल्याने सदर कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्याच्या दृष्टीने संपुर्ण गडचिरोली जिल्ह्यात दिनांक 27.12.2024 चे 00.01 वा. ते दिनांक 10.01.2025 चे 24.00 वा. पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1)(3) लागु करण्यात आलेले आहे. त्यामुळे सदर कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्याच्या दृष्टीने विवक्षित कृतींना मनाई करणे व अव्यवस्थेला प्रतिबंध उपाय करणे आवश्यक आहे. याकरीता जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) आणि (3) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन दिनांक 27.12.2024 चे 00.01 वा. ते दिनांक 10.01.2025 चे 24.00 वा.पर्यंत या कालावधीत पुढील गोष्टींना मनाई केलेली आहे. शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठया किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी इतर कोणतीही वस्तु बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्र सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, किंवा जमा करणे किंवा तयार करणे यावर प्रतिबंध घालण्यात आले आहे. व्यक्तिच्या किंवा प्रेताच्या किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणने, वाद्य वाजविणे, ज्यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यास धक्का पोहचेल अशी किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल, अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे, अगर सोंग आणणे आणि अशी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे त्याचे प्रदर्शन करणे किंवा त्याचा जनतेत प्रसार करणे. उपविभागीय दंडाधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी अथवा संबंधित पोलिस स्टेशन अधिकारी (जे शक्य असेल ते) यांच्या पूर्व परवानगी शिवाय कोणीही मिरवणूक काढू नये, पाच इसम किंवा त्यापेक्षा जास्त इसम सार्वजनिक जागेत सार्वजनिक रस्त्यावर किंवा सार्वजनिक चावडीवर दिनांक 27.12.2024 चे 00.01 वा. ते दिनांक 10.01.2025 चे 24.00 वा.पर्यंत जमा होणार नाहीत किंवा कोणतेही कार्यक्रम आयोजित करणार नाही. सदर आदेश दिनांक 27.12.2024 चे 00.01 वा. ते दिनांक 10.01.2025 चे 24.00 वा.वाजेपावेतो संपुर्ण गडचिरोली जिल्हयाच्या क्षेत्राकरीता लागु राहतील असे जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली, अविश्यांत पंडा यांनी आदेशीत केले आहे.
Related Articles
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतली राज्यपालांची भेट
मुंबई दि-05: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आज राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. योगी आदित्यनाथ यांनी राजभवनातील ब्रिटिश कालीन भुयारात निर्माण करण्यात आलेल्या ‘क्रांतिगाथा’ या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांच्या संग्रहालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी संग्रहालयातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीपुढे नतमस्तक होऊन शिवरायांना अभिवादन केले. उपस्थित अधिकाऱ्यांकडून त्यांनी संग्रहालयातील सर्व क्रांतिकारकांची माहिती जाणून घेतली. […]
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना
केंद्र शासनाने (संघराज्य शासनाने) असंघटीत कामगारांसाठी सामाजिक सुरक्षितता पुरविण्याच्या उद्देशाने दिनांक ३१ डिसेंबर, २००८ रोजी असंघटीत कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियम २००८ पारीत केला. त्या अनुषंगाने विविध व्यवसाय गट जसे कि बांधकाम कामगार, घरेलु कामगार, फेरीवाले, शेतमजुर, गृहउद्योगातील कामगार, माथाडी कामगार, बिडी कामगार, यंत्रमाग कामगार, आशा वर्कर, आंगणवाडी सेविका यांसारख्या विविध १२७ व्यवसाय गटातील असंघटीत कामगारांना सामाजिक सुरक्षितता […]
महसूल पंधरवाड्यातील सैनिक हो तुमच्यासाठी हा कार्यक्रम तहसील कार्यालय मुलचेरा येथे संपन्न
मुलचेरा-: दिनांक 1 आगस्ट पासून सुरु झालेल्या महसूल पंधरवाडा कार्यक्रम अंतर्गत *सैनिक हो तुमच्यासाठी*हा विशेष उपक्रम मुलचेऱ्याचे प्रभारी तहसीलदार लोमेश उसेंडी यांच्या अध्यक्षतेखली तहसील कार्यालयात दिनांक 10 आगस्ट ला आयोजीत करण्यात आला होता. प्रभारी तहसीलदार लोमेश उसेंडी यांचे हस्ते तालुक्यातील माजी सैनिकांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला व त्यांच्या अडी-अडचणी जाणून घेतल्या.देशाच्या रक्षणासाठी, आपल्या […]