ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

अतिवृष्टी व पुरबाधित भागातील विद्युत पुरवठा तातडीने पूर्ववत करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिले निर्देश

राज्यात अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी विशेषतः मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर या भागातील विद्युतपुरवठा युद्धपातळीवर सुरळीत करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांना दूरध्वनीद्वारे दिले आहेत.

अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती उद्भवलेल्या भागातील विद्युत पुरवठा पूर्ववत व सुरळीत करण्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ शेजारील जिल्ह्यांमधून मागविण्यात यावे तसेच आवश्यक त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर तातडीने उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.