
मुलचेरा, : नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई वेळेत त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे आवश्यक असल्याचे आवाहन मुलचेरा येथील तहसीलदार चेतन पाटील यांनी केले आहे.
ज्या शेतकऱ्यांनी अद्याप KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी आधार कार्ड, बँक पासबुक आणि आवश्यक कागदपत्रांसह आपल्या संबंधित बँक शाखेत, सेवा केंद्रात (CSC) किंवा संबंधित कार्यालयात जाऊन KYC पूर्ण करावी. KYC अपूर्ण असल्यास नुकसान भरपाईची रक्कम खात्यात जमा होण्यास विलंब होऊ शकतो.
तहसीलदार चेतन पाटील यांनी सर्व पात्र शेतकऱ्यांनी कोणताही विलंब न करता KYC प्रक्रिया पूर्ण करून शासनाच्या नुकसान भरपाई योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा.




