31 डिसेंबर 2024 रोजी नववर्षाचे आगमन उत्सव जिल्ह्यात सर्वत्र साजरा केला जाणार आहे. तसेच काही विविध राजकीय पक्ष, संघटना व इतर नागरिक हे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे, मोर्चे, आंदोलने, सभा, मिरवणुक, सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता असल्याने सदर कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्याच्या दृष्टीने संपुर्ण गडचिरोली जिल्ह्यात दिनांक 27.12.2024 चे 00.01 वा. ते दिनांक 10.01.2025 चे 24.00 वा. पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1)(3) लागु करण्यात आलेले आहे. त्यामुळे सदर कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्याच्या दृष्टीने विवक्षित कृतींना मनाई करणे व अव्यवस्थेला प्रतिबंध उपाय करणे आवश्यक आहे. याकरीता जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) आणि (3) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन दिनांक 27.12.2024 चे 00.01 वा. ते दिनांक 10.01.2025 चे 24.00 वा.पर्यंत या कालावधीत पुढील गोष्टींना मनाई केलेली आहे. शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठया किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी इतर कोणतीही वस्तु बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्र सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, किंवा जमा करणे किंवा तयार करणे यावर प्रतिबंध घालण्यात आले आहे. व्यक्तिच्या किंवा प्रेताच्या किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणने, वाद्य वाजविणे, ज्यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यास धक्का पोहचेल अशी किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल, अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे, अगर सोंग आणणे आणि अशी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे त्याचे प्रदर्शन करणे किंवा त्याचा जनतेत प्रसार करणे. उपविभागीय दंडाधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी अथवा संबंधित पोलिस स्टेशन अधिकारी (जे शक्य असेल ते) यांच्या पूर्व परवानगी शिवाय कोणीही मिरवणूक काढू नये, पाच इसम किंवा त्यापेक्षा जास्त इसम सार्वजनिक जागेत सार्वजनिक रस्त्यावर किंवा सार्वजनिक चावडीवर दिनांक 27.12.2024 चे 00.01 वा. ते दिनांक 10.01.2025 चे 24.00 वा.पर्यंत जमा होणार नाहीत किंवा कोणतेही कार्यक्रम आयोजित करणार नाही. सदर आदेश दिनांक 27.12.2024 चे 00.01 वा. ते दिनांक 10.01.2025 चे 24.00 वा.वाजेपावेतो संपुर्ण गडचिरोली जिल्हयाच्या क्षेत्राकरीता लागु राहतील असे जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली, अविश्यांत पंडा यांनी आदेशीत केले आहे.
Related Articles
रामनवमीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा
Posted on Author Lokrath Team
मुंबई दि. २९: रामनवमीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात की, प्रभू श्रीरामानं जीवनभर सत्य आणि धर्माचे आचरण केलं. ही शिकवण सगळ्या मानवजातीला प्रेरणा देणारी आहे. प्रभू श्रीरामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हटले जाते. त्यांनी कधीही मर्यादांचे उल्लंघन केलं नाही. ज्यांना वचन दिलं, ते पाळलं. एक आदर्श पुत्र, शिष्य, भाऊ, […]
माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची भाजपा सिरोंचा तालुका बुथ सशक्तीकरण बैठकीला विशेष उपस्थिती
Posted on Author Lokrath Team
भाजपामध्ये बुथ प्रमुख हा पक्षाचा प्रमुख अंग- राजे अम्ब्रिशराव आत्राम भारतीय जनता पार्टी हा एकावेळी दोन खासदारांचा पक्ष म्हणून ओळखला जाणारा आज देशातच नव्हे तर जगभरात आपली एक ओळख निर्माण केली आहे, आज भाजपा देशाचा एक नंबरचा पक्ष म्हणून ओळखला जातो याचे मुख्य कारण म्हणजे बुथ प्रमुख व कार्यकर्ता, कार्यकर्त्यामुळे पक्ष मजबुतीकरणाला बळ मिळतो, म्हणून […]