मुलचेरा:-तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने गावोगावी शेती शाळा येण्यास सुरुवात झाली या शेती शाळांमध्ये शेतकऱ्यांना पिकाच्या विविध टप्प्यांवर त्या त्या वेळी लागणारे मार्गदर्शन करण्यात येते या अनुषंगाने मोजा आंबेला व कोळसापुर येथे शेती शाळेच्या पहिल्या वर्गाची सुरुवात करण्यात आली खरीप हंगामात भात लागवडीची पहिली शेतीशाळा वर्ग घेण्यात आले त्यावेळी मंडळ कृषी अधिकारी सोनाली सुतार यांनी शेतकऱ्यांना शेती शाळा कशा प्रकारे होते याची माहिती दिली यावेळी उपस्थित कृषी पर्यवेक्षक श्री गरमाडे यांनी शेतकऱ्यांना हात लागवडीच्या विविध पद्धती बाबत माहिती दिली प्रदीप मुंडे कृषी सहाय्यक यांनी शेतकऱ्यांना गादीवाफ्यावर लागवड पट्टा पद्धतीने लागवड दशपर्णी अर्क निंबोळी अर्क तसेच बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी त्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी गावातील शेतकऱ्यांनी स्वतःच्या अनुभवातून मार्गदर्शन केले आंबेला सौ गोपिका वोटिंगवार यांनी शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून दाखवले व त्याविषयी माहिती दिली तसेच कोळसापुर येथील शेतकरी सौ नंदीषा कांबळे यांनी गादीवाफ्यावर लागवड आणि खोड किड नियंत्रणाविषयी सविस्तर माहिती उपस्थिती शेतकऱ्यांना दिले अशाच प्रकारे गावातील इतर शेतकऱ्यांनी आपल्या अनुभवातून इतर शेतकऱ्यांना काय फायदे झाले याविषयी माहिती दिली त्यावेळी गावातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते त्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून त्या शंकांचे निरसन करून
