ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

स्त्री शक्ती पोर्टलवर नोंदणीचे महिलांना आवाहन

कोणत्याही कठिण प्रसंगी महिलेला मार्गदर्शन मिळून उपजीविकेचे साधन उपलब्ध करुन देणे आणि प्रत्येक ठिकाणी गरज भासल्यास मदत मिळणे सोपे व्हावे, याकरीता आयुक्त कार्यालय, महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे द्वारा स्त्रीशक्ती पोर्टलची निर्मिती करण्यात आलेली आहे.
 सदर स्त्री शक्ती या पोर्टलव्दारे शासकीय / निमशासकीय / खासगी / विद्यालये / महाविद्यालये / जिल्हा परिषद शाळा / आशा वर्कर / अंगणवाडी सेविका / रुग्णालय / पोलीस विभाग / वकिल / महिला संबंधित काम करणाऱ्या संस्था तसेच इतर कोणतेही छोटे – मोठे व्यवसाय करणाऱ्या किंवा इतर ‍ठिकाणी काम करणाऱ्या महिलांना स्वत:चे अस्तित्व निर्माण करणे व संकटकाळी मदत मिळणे तसेच मार्गदर्शन मिळून उपजीविकेचे साधन उपलब्ध करुन देणे सोयीचे होईल याकरीता गडचिरोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी स्त्री शक्ती पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी श्री. प्रकाश भांदककर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, गडचिरोली तसेच कु. प्रणाली सुर्वे, केंद्र प्रशासक (प्र.), सखी वन स्टॉप सेंटर, गडचिरोली यांनी आवाहन केले आहे.
स्त्री शक्ती पोर्टलवर नोंदणी कसे करायचे ?
Google वर जावून strishakti.org या वेबसाईट वरुन महिलेचे सपूर्ण नाव, ई-मेल ‍किंवा मोबाईल क्र., पत्ता, जन्म तारिख टाकून नोंदणी करणे. तसेच पासवर्ड स्वत: तयार करुण घेणे.
संपर्क कुठे करावा ?
कार्यालय संपर्क क्रमांक :- 07132-295675
कार्यालय मोबाईल क्रमांक :- 9404354543
कार्यालय पत्ता :- जुनी धर्मशाळा,जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, मुल रोड कॉम्प्लेक्स,
    गडचिरोली.