ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

गोशाळांकरीता अनुदानाचे अर्ज आमंत्रित

जिल्हयातील गोशाळांना आर्थीकदृष्टया सक्षम करण्याकरीता सन 2024-25 पासुन गोशाळेत ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींना रु. 50/- प्रतीदिन प्रती गोवंश अनुदान देण्यासाठी योजना राबवीण्यास शासन मान्यता प्राप्त आहे. सदर योजनेअंतर्गत अनुदानाच्या पात्रतेच्या अटीनुसार जिल्हयातील गोसंगोपनाचा किमान 3 वर्ष अनुभव असलेल्या, गोशाळेत किमान 50 गोवंश व संस्थेतील ईअर टॅगींग (भारत पशुधन प्रणालीवर) असलेले गोसेवा आयोगाकडील नोंदणीकृत गोशाळा, गोसदन, पांजरापोळ व गोरक्षण संस्थेमधील देशी गाई अनुदानास पात्र आहेत.
 त्या करीता ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत दिनांक 31 डिसेंबर2024 पर्यंत आहे. सदर योजनेचे उद्देश व स्वरुप, अनुदाना पात्रतेच्या अटी व शर्ती योजनेची अमलबजावणी तसेच योजनेचा ऑनलाईन अर्ज व त्यासोबत जोडावयाची अनुषंगीक कागदपत्रे इ. सवीस्तर माहीती www.mahagosevaayog.orghttp://schemes. mahagosevaayog.org या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. त्याचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे. ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारणे १६ डिसेंबर २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४,गोसेवा आयोग मार्फत प्राप्त अर्जाची प्राथमीक तपासणी ०१ जानेवारी २०२५ ते १० जानेवारी २०२५, जिल्हा गोशाळा पडताळणी समीतीव्दारा प्राथमीक तपासणी अुती पात्र गोशाळांची प्रत्यक्ष भेट व पडताळणी ११ जानेवारी २०२५ ते २० जानेवारी २०२५, जिल्हा गोशाळा पडताळणी समीती अहवालानुसार अनुदानास पात्र गोधनांची संख्या आयोग कार्यालयास कळवीणे २१ जानेवारी २०२५ ते २५ जानेवारी २०२५ .
तरी जिल्हयातील ईच्छुक गोशाळा यांनी वर दिलेल्या वेळापत्रकानुसार ऑनलाईन अर्ज करण्यास डॉ.विलास अ. गाडगे,जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त गचिरोली यांनी आवाहन केले आहे.