प्रधान मंत्री जनजातीय महा न्याय अभियानाचा आढावा गडचिरोली, दि. १३ एप्रिल – प्रधानमंत्री जनजातीय महा न्याय अभियान (पीएम जनमन) अंतर्गत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज जिल्हास्तरीय आढावा घेतला. दूरदृष्टी प्रणालीद्वारे पार पडलेल्या या बैठकीत त्यांनी विविध योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेतला व संबंधित अधिकाऱ्यांना कामाला गती देण्याचे निर्देश दिले. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात 8321 […]
Author: Lokrath Team
जलव्यवस्थापन कृती पंधरवाड्याचे उद्घाटन भावी पिढ्यांसाठी पाणी सुरक्षित ठेवणे ही सामूहिक जबाबदारी – समीर डोंगरे
भावी पिढ्यांसाठी पाणी सुरक्षित ठेवण्यासाठी सामुहिक जबाबदारीतून पाण्याचे शाश्वत व्यवस्थापन, जनजागृती आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगसारख्या उपाययोजनांची अंमलबजावणी प्राधाण्याने करण्याची गरज मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त समीर डोंगरे यांनी व्यक्त केली. जलसंपदा विभागाच्या वतीने आयोजित “जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा 2025” उपक्रमाचा उद्घाटन सोहळा आज गडचिरोली पाटबंधारे विभागात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन समीर डोंगरे यांच्या हस्ते संपन्न […]
गडचिरोली जिल्ह्याच्या औद्योगिक व आर्थिक विकासाला नवे बळ
गडचिरोली जिल्ह्याच्या औद्योगिक व आर्थिक विकासाला नवे बळ गोंदिया-बल्लारशा रेल्वे मार्ग दुहेरीकरण प्रकल्पासाठी 4819 कोटींचा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा माध्यम प्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणाली द्वारे संवाद गडचिरोली दि.११: गडचिरोली जिल्ह्यातून जाणाऱ्या गोंदिया ते बल्लारशा या २४० किलोमीटर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी केंद्र सरकारने तब्बल ४ हजार ८१९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला […]
हिवताप प्रतिबंधासाठी व्यापक जनजागृती मोहिम राबवा
अंमलबजावणी समितीच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या सूचना जिल्ह्यात हिवताप आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाययोजना जनजागृतीच्या माध्यमातून प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज दिल्या हिवताप प्रतिबंध अंमलबजावणी समितीची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी […]
गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत तलावांचे खोलीकरण होणार
मागणी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करा महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाअंतर्गत गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये धरणामध्ये साचलेला गाळ उपसा करून धरणाची मूळ साठवण क्षमता पुनस्थापित होणार आहे. तसेच उपसा केलेला गाळ शेतात पसरविल्यास शेतीची उत्पादन क्षमता वाढून एकंदरित कृषी उत्पनात वाढ होणार आहे. या योजनेअंतर्गत काम करणाऱ्या […]
वाहन भाडे तत्वावर पुरवठा करण्याबाबत निविदा आमंत्रित
गडचिरोली, (जिमाका) दि.09:जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष व इतर कार्यालयीन कामाकरीता (होंडा अमेझ) या दर्जाची वाहन भाडे तत्वावर पुरवठा करण्याबाबत इच्छुक वाहन पुरवठा धारकांना आवाहन करण्यात येत आहे. तरी इच्छुक वाहन पुरवठा धारकांनी निविदेकरीता व अधिक माहिती करीता 11 एप्रिल 2025 ते 17 एप्रिल 2025 या कालावधीत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गडचिरोली, डॉ.बाबासाहेब […]
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय सप्ताहाचा प्रारंभ
गडचिरोली अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती व वंचित दुर्बल व्यक्तींच्या सर्वागीण घटकातील करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध कल्याणकारी योजनांनी माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी, या उददेशाने दरवर्षी 8 एप्रिल 14 एप्रिल कालावधीत राज्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता साजरा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे औचित्य साधून सहाय्यक आयुक्त, समाज […]
‘आपले सरकार’ पोर्टलच्या अद्ययावतीकरणामुळे १० ते १४ एप्रिल या काळात सेवांमध्ये तात्पुरती खंडितता
महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडून १० एप्रिल २०२५ (गुरुवार) ते १४ एप्रिल २०२५ (सोमवार) दरम्यान ‘आपले सरकार’ पोर्टलवर नियोजित देखभाल आणि हार्डवेअर अद्ययावत करण्याचे काम करण्यात येणार आहे. या कालावधीत ‘आपले सरकार सेवा पोर्टल’ वरील सर्व सेवा आणि प्रणाली काही काळासाठी अनुपलब्ध राहतील. दिनांक १० ते १४ एप्रिल २०२५ या कालावधीत बहुतांश दिवस सार्वजनिक सुट्ट्या […]
पत्रकारांच्या मागण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक
ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान योजनेच्या अटीसंदर्भात पत्रकार संघटनांच्या सूचना घेऊन प्रस्ताव सादर करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील पत्रकारांच्या मागण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक आहे. ज्येष्ठ पत्रकारांसाठी सुरू करण्यात आलेल्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेच्या अटीसंदर्भात राज्यातील पत्रकार संघटनांच्या सूचना घेऊन योजनेतील बदलाबाबत नव्याने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मंत्रालय आणि विधीमंडळ […]
मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत औद्योगिक वापरासाठीचे चार बिगर सिंचन पाणी आरक्षण प्रस्ताव मंजुरीस्तव सादर
राज्यातील घरगुती व औद्योगिक पातळीवर पाण्याची वाढती गरज लक्षात घेता, बिगर सिंचन पाणी आरक्षणासाठी सादर करण्यात आलेल्या चार प्रस्तावांबाबत आजच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीस जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, जलसंपदा विभागाचे सचिव डॉ. संजय बेलसरे आदि उपस्थित होते. प्रचलित क्षेत्रीय वाटपाच्या मर्यादेनुसार – पिण्याच्या पाण्यासाठी १५ […]