ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

लोकसंख्येच्या प्रमाणात पोलीस भरतीला प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांच्या पोलीस दलाच्या तीन इमारतींचे उद्घाटन व निवासस्थान इमारतींच्या कामाचे भूमिपूजन राज्यात आदर्श पोलीस प्रशासन निर्माण करण्यासाठी लोकसंख्येच्या अनुरुप पोलीसांची संख्या ठेवली जाणार आहे. त्यामुळे गृह विभागामार्फत नव्याने 40 हजार पोलीसांची भरती केली आहे. यापुढेही राज्यात पोलीस भरतीला प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सांगली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने बांधण्यात आलेल्या तीन इमारतींचे उद्घाटन […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

विधवा प्रथांचे निर्मूलन करण्यासाठी राज्यस्तरीय जनजागृती राबवा – महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे

विधवा प्रथांचे निर्मूलन करण्यासाठी मिशन वात्सल्य योजने अंतर्गत जनजागृती करण्यात येते.  मात्र काही प्रमाणात अद्यापही अशा कृप्रथा सुरू असल्याचे निदर्शनास आले असून, या प्रथांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये नव तंत्रज्ञानाचा वापर करून विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रबोधन करावे. तसेच अशा प्रथांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

तूर खरेदीला केंद्र सरकारकडून २८ मेपर्यंत मुदतवाढ – पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

तूर खरेदीसाठी मुदतवाढ मिळावी अशी केद्राकडे केली होती मागणी राज्यातील तूर उत्पादक शेतकरी व लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेता पीपीएस अंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफ यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या तूर खरेदीस आता केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने 28 मे 2025 पर्यंत मुदत वाढवून दिली आहे. यामुळे राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, अशी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान – महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे

 महिलांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक समस्या सोडविण्यासाठी व सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने सन २०२५-२६ पासून राज्यात ‘आदिशक्ती अभियान’ राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. या मोहिमेद्वारे महिलांसाठी राज्यात राबविण्यात येत असलेल्या विविध शासकीय योजना, उपक्रम, कार्यकम आदींबाबत आवश्यक व उपयुक्त माध्यमांद्वारे प्रचार व प्रसिद्धी देऊन जनजागृती करण्यात येईल. यासाठी ग्रामस्तरीय समित्यांना ‘आदिशक्ती पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येईल, […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

विकास आणि पर्यावरणाचा समतोल राखणारा निर्णय

नागपुरात झोपडपट्टीधारकांना मालकी हक्क देण्याचाही मार्ग मोकळा नागपूर, दि. 22 :- झुडपी जंगलाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा ऐतिहासिक आणि क्रांतिकारी आहे. तो विकास आणि पर्यावरणाचा समतोल राखणारा आहे. या निर्णयामुळे विदर्भाच्या विकासाला मोठी चालना मिळेल आणि नागपुरात तर झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे देण्याचाही मार्ग मोकळा झाला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. नागपूर […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मान्सून काळात आपत्ती उद्भवल्यास निवारणासाठी महाराष्ट्र सज्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आपत्तीच्या काळात सर्व अधिकाऱ्यांनी जबाबदारी म्हणून २४ तास दक्ष रहावे; जीवित व वित्तहानी रोखण्यासाठी सतर्कतेने काम करावे मुंबई, दि. २१ : मान्सूनच्या काळात एखादी आपत्ती निर्माण झाल्यास त्याचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. त्यादृष्टीने सर्वच यंत्रणांनी योग्य तयारी केली आहे. यंदाच्या मान्सूनच्या काळात जीवित आणि मालमत्तेचे नुकसान रोखण्यासाठी काम करावे. आपत्तीच्या काळात सर्व प्रशासकीय अधिकारी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

धान खरेदीसाठी मुदतवाढ

गडचिरोली दि. २१: महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित, नाशिक (उच्च श्रेणी) आणि उप प्रादेशिक कार्यालय, अहेरी (उच्च श्रेणी) यांच्या माध्यमातून खरीप हंगाम २०२४-२५ करिता अहेरी उपविभागात धान खरेदी केंद्रांवर सुरु असलेल्या खरेदी प्रक्रियेची मुदत ३१ मे २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील सिरोंचा, आसरअल्ली, अमरादी, अंकीसा, वडधम, जाफ्राबाद, […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

कृषि विभाग, जिल्हा परिषद गडचिरोली येथे कृषि निविष्ठा तक्रार निवारण कक्ष स्थापन

गडचिरोली,(जिमाका)दि.21: जिल्यातील बियाणे, खते व किटकनाशके यांच्या खरेदी विक्री, गुणवत्ता व पुरवठ्याच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणींचे तात्काळ निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर ‘निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्ष, खरीप हंगाम २०२५ करिता १५ मे २०२५ ते १५ ऑगस्ट २०२५ व रबी हंगामासाठी १५ सप्टेंबर २०२५ ते ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत स्थापन करण्यात आलेला आहे. सदर नियंत्रण कक्षाशी दररोज […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

कामगारांच्या गरजेनुसार परिपूर्ण योजना तयार करावी – कामगार राज्यमंत्री आशिष जयस्वाल

कामगार कल्याण मंडळाने कामगारांच्या गरजेनुसार परिपूर्ण योजना तयार करून त्याचा प्रस्ताव शासनास सादर करावा. या योजनेमध्ये इतर योजनांचा लाभ घेण्यास पात्र होणार नाहीत अशा कामगारांना लाभ मिळेल अशा तरतुदी कराव्यात, अशा सूचना कामगार राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिल्या. प्रभादेवी येथील कामगार व क्रीडा भवन येथे कामगार कल्याण मंडळाची आढावा बैठक झाली. त्यावेळी राज्यमंत्री जयस्वाल बोलत होते. […]

Uncategorized ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

विद्यानिकेतनच्या सक्षमीकरणासाठी सुविधा उपलब्ध करुन देणार – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

 ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यात पाच शासकीय विद्यानिकेतन निवासी शाळा सुरू आहेत. या शाळांमधून दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून दिले जाते. येथे विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढणे अपेक्षित असल्याचे सांगून विद्यानिकेतनच्या सक्षमीकरणासाठी शाळांना आवश्यक शिक्षक आणि इतर सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील, असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. राज्यातील पाच शासकीय विद्यानिकेतनच्या विविध समस्यांबाबत शालेय […]