विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मान्यतेनुसार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात आता ‘बी.कॉम’ आणि ‘एमसीए’ हे पदवी अभ्यासक्रम पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने सुरू होणार आहेत. या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश क्षमतेची कोणतीही मर्यादा नसून कितीही विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल, अशी माहिती कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी दिली. ऑनलाइन प्रॉक्टर पद्धतीने परीक्षा होणार असून १०० विद्यार्थ्यांमागे एक मेंटॉर मार्गदर्शन करणार आहे. […]
Author: Lokrath Team
प्रवाशांच्या सेवेसाठी एसटीचा ताफा अधिक सक्षम होणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक पाच हजार ‘लालपरी’ बसेसची निविदा प्रक्रिया पूर्ण
मुंबई, दि. १३ : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्वसामान्य प्रवाशांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या एसटी अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी, दर्जेदार आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक सेवा देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने बसताफ्याच्या विस्तारासोबतच आधुनिकीकरणाला वेग दिला आहे. नव्या बसेसच्या माध्यमातून एसटीची सेवा अधिक सक्षम करण्याचा संकल्प करण्यात आला असून, त्याच दिशेने पाच हजार ‘लालपरी’ […]
भारतीय ज्ञानपरंपरेच्या जतन व संवर्धनासाठी एशियाटिक सोसायटीने पुढाकार घ्यावा – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईने ज्ञानाचे डिजिटायझेशन करून देशभरातील ग्रंथालये व संशोधन संस्थांशी जोडावे
मुंबई, दि. १३ : भारतीय ज्ञानपरंपरेचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईने पुढाकार घ्यावा. संस्थेकडील ज्ञानसंग्रहाचे डिजिटायझेशन करून हा ज्ञानसंग्रह देशभरातील विद्यार्थी, संशोधक आणि अभ्यासकांना उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. टाउन हॉल येथे एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या नवनिर्वाचित समितीच्या परिचय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र […]
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद; महाराष्ट्रातून ४३२ अर्ज सादर
मुंबई, दि. १३ : महाराष्ट्र शासनाच्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६’साठी महाराष्ट्रभरातून ४३२ मंडळांनी अर्ज सादर केले आहेत. यामध्ये ठाणे जिल्ह्यातून सर्वाधिक ५२ अर्ज प्राप्त झाले आहेत. या स्पर्धेचा विस्तार मागील वर्षापासून तालुकास्तरापर्यंत करण्यात आला आहे. यावर्षीपासून प्रथमच ही स्पर्धा […]
लॅबग्रोन डायमंड उद्योगात भारताचे जागतिक नेतृत्व; नवी मुंबईत जेम्स अँड ज्वेलरी पार्क- केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह एक लाख कोटींची गुंतवणूक आणि ५० हजार रोजगारांची अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
‘इंडिया जेम्स अँड ज्वेलरी अवॉर्ड्स’मध्ये उद्योगातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव मुंबई, दि. १३ : प्रयोगशाळेत विकसित होणाऱ्या हिऱ्यांच्या (लॅबग्रोन डायमंड) निर्मितीसाठी आवश्यक यंत्रसामग्रीपासून दागिन्यांचे उत्पादन, ब्रँडिंग, शोरूम आणि जागतिक विक्री व्यवस्थेपर्यंतची संपूर्ण मूल्यसाखळी भारतात उभारावी. या उदयोन्मुख क्षेत्रात भारतीय उद्योगाने जागतिक नेतृत्व प्रस्थापित करावे, असे आवाहन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी केले. भारतातील रत्न […]
Ganesh Chaturthi 2026 : यंदा गणराया 12 दिवसांसाठी मुक्कामी, नऊ वर्षांनी योग; हरितालिका-गणेश चतुर्थी एकाच दिवशी, उपवास कधी सोडायचा?
नाशिक : यंदाचा गणेशोत्सव धार्मिकदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. तब्बल नऊ वर्षांनंतर यंदा गणरायाचा मुक्काम १२ दिवसांचा राहणार असून, त्याचबरोबर हरितालिका तृतीया आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी येत (Ganesh Sthapana Muhurat 2026) आहेत. तिथीच्या विशिष्ट गणितामुळे दोन्ही व्रतांचा योग एकाच दिवशी आला आहे. त्यामुळे हरितालिका पूजन कधी करायचे, गणेशाची स्थापना कोणत्या वेळी करायची आणि उपवास कधी […]
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबई विमानतळावर स्वागत
मुंबई, दि. १३– केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांचे आज पहाटे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे आगमन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार अमित साटम, मुंबईच्या […]
श्रीचक्रधर स्वामींच्या विचारांतून समाजाने मानवकल्याणाची शिकवण घ्यावी – मंत्री मंगल प्रभात लोढा मंत्रालयात श्रीचक्रधर स्वामी यांचा ‘अवतार दिन’ साजरा;
मुंबई, दि. १३ : महानुभाव पंथाचे प्रवर्तक भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांच्या अवतार दिनानिमित्त मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी श्रीचक्रधर स्वामी यांच्या जीवनकार्याचा गौरव केला. श्रीचक्रधर स्वामी यांच्या जीवनकार्यातून मिळालेले विचार अंगीकारण्याचे आवाहन मंत्री लोढा यांनी यावेळी केले. श्रीचक्रधर स्वामी यांनी तत्कालीन समाजात पसरलेल्या अंधश्रद्धा, विषमता, […]
आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या विकास उपक्रमांना राज्य शासनाचे पूर्ण सहकार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. १३ : आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्क महाराष्ट्रात राबवत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास आणि हवामान बदल प्रतिबंधासंदर्भातील उपक्रमांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले. तसेच, अशा सर्व प्रकल्पांना राज्य शासनाकडून आवश्यक ते सहकार्य आणि पाठबळ दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. पाचवे आगा खान म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच महाराष्ट्राच्या अधिकृत दौऱ्यावर आलेले […]
भरती परीक्षा पद्धतीच्या सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती १६ सप्टेंबरला नागपुरात
नागपूर, दि. १३ : भरती परीक्षा पद्धतीतील सुधारणांसाठी गठित करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीच्या नागपूर येथील संवाद कार्यक्रमाच्या अनुषंगाने समितीचे अध्यक्ष व सदस्य बुधवार, दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नियोजन भवन, सदर पोलीस स्टेशनच्या मागे, सिव्हिल लाइन्स, नागपूर येथे उपस्थित राहणार आहेत. राज्यातील स्पर्धा परीक्षार्थींच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या या प्रक्रियेत नागपूर महसूल विभागातील […]









