ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

‘सक्षम महिला, सक्षम महाराष्ट्र’ उपक्रम राबवणार – महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि. १० : महिलांच्या विविध तक्रारी तसेच समस्यांचे निराकरण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे याकरिता सक्षम महिला ,सक्षम महाराष्ट्र (जनसुनावणी) हा उपक्रम महिला व बालविकास विभागामार्फत दि.१ डिसेंबर २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर शासकीय महिला वसतिगृहातील  महिला व इतर गरजू महिलांसाठी कौशल्य विकास विभागामार्फत रोजगाराभिमुख प्रशिक्षण देणार असल्याची माहिती कौशल्य […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

कोकणत्व जपून कोकणचा सर्वांगीण विकास करूया – मंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. १० – ‘राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. याअंतर्गत कोकणचा कॅलिफोर्निया करायचा आहे, मात्र कोकणचे कोकणत्व जपून’ असे प्रतिपादन शालेय शिक्षण तथा मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी केले. महासंस्कृती व्हेंचर्सच्या वतीने ‘कोकण सन्मान २०२२’ कार्यक्रमात मंत्री श्री.केसरकर यांच्या हस्ते कोकणातील संस्कृतीचा वारसा जतन करण्यासाठी योगदान देणाऱ्या विविध व्यक्ती आणि […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

२५ हजार उद्योजक घडविण्याचे शासनाचे उद्दिष्ट – उद्योगमंत्री उदय सामंत

मुंबई, दि. 10 : राज्यात सुमारे २५ हजार उद्योजक घडविण्याचे उद्दिष्ट असून यातून ७५ हजार तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.             उद्योगमंत्री श्री. सामंत म्हणाले, राज्यातील तरुणांच्या हाताला काम मिळावे तसेच त्याद्वारे नवउद्यमी घडविण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्य शासनाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेद्वारे […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

गुंतवणुकीस प्रोत्साहन देऊन राज्यातील बंदरे विकासाला गती देणार – बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. 10 : राज्याच्या विकासात व आर्थिक प्रगतीत बंदरे क्षेत्राचा वाटा महत्त्वाचा असून या क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यास प्रोत्साहन देवून राज्यातील बंदरे विकासाला गती देण्यात येत असल्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. बंदरे विकास धोरण संदर्भात महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड सभागृह येथे लोकप्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. त्यावेळी श्री भुसे बोलत होते. यावेळी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

‘भारतीय नौदलाचे कार्य प्रेरणादायी’ – नौदलाचे कामकाज पाहून विधिमंडळ सदस्यांच्या भावना

मुंबई, दि. १० : भारतीय नौदलाचे कामकाज कसे चालते, युद्धनौकांचे संचलन कसे होते, युद्धनौकेवरील जवान कशा पद्धतीने खडतर परिस्थितीत कामकाज करतात, शोध आणि बचाव कार्यात भारतीय नौदल कशा पद्धतीने योगदान देते याची प्रत्यक्ष पाहणी करण्याची संधी आज विधानमंडळ सदस्यांना मिळाली. भारतीय नौदलाचा पश्चिम विभाग आणि महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र यांच्यामार्फत […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

‘वन सेवा केंद्र’ सुरू करणार – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. १० : सामान्य नागरिकांना “आपले सरकार” पोर्टलच्या माध्यमातून अनेक सेवा सुविधा उपलब्ध होत असतात. याच धर्तीवर वन विभागामार्फत केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व सेवा एका छताखाली देण्यासाठी ‘वन सेवा केंद्र’ सुरू करण्याचे निर्देश वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. वन मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्‍यातील व्‍याघ्र संवर्धन प्रतिष्‍ठान नियामक मंडळाची बैठक आयोजित […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणणार – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पालघर दि. 10 : केंद्र व राज्य शासनाद्वारे आदिवासी समाजासाठी विविध योजना राबविल्या जातात. या योजना आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उपयोगी आहेत. आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणणार असल्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सांगितले. जव्हार येथील प्रगती प्रतिष्ठाणच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात तसेच वाडा येथे कातकरी समन्वय समितीमार्फत कातकरी समाजाचा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

‘दिलखुलास’ कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव दिनेश सुराणा यांची मुलाखत

मुंबई, दि. 10 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव दिनेश सुराणा यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर शुक्रवार दि. 11, शनिवार दि. 12 , सोमवार दि. 14 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 7.25  ते 7.40 […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

ग्रंथप्रेमींसाठी १६ नोव्हेंबरपासून दादरमध्ये ‘मुंबई शहर ग्रंथोत्सव’

मुंबई, दि. 10 : जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, मुंबई शहर आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मुंबई शहर ग्रंथोत्सव’ येत्या १६ व १७ नोव्हेंबर रोजी दादर (पू) येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात आयोजित करण्यात आला आहे. या ग्रंथोत्सवाच्या अध्यक्षस्थानी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे असतील व शालेय शिक्षण व मराठी भाषा तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

राज्य लोकसेवा आयोगाच्या इमारतीसाठी २८२ कोटी २५ लाख रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता

मुंबई, दि. 10 : राज्य लोकसेवा आयोगाच्या नवी मुंबईतील बेलापूर येथील नियोजित इमारतीसाठी राज्य शासनाकडून सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. आता या इमारतीसाठी 282 कोटी 25 लाख रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून त्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आयोगाच्या कार्यालयासाठी प्रशासकीय इमारत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू होते आयोगाकडून सादर करण्यात आलेल्या […]