राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या समान व असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी प्रस्ताव/अर्ज सादर करण्याचे आवाहन ग्रंथालय संचालक शालिनी गो. इंगोले यांनी केले आहे. भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या समान निधी व असमान निधी योजनेंतर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या […]
Author: Lokrath Team
लम्पी चर्मरोगाने बाधित पशुधनाचा मृत्यू झाल्यास सर्व पशुपालकांना नुकसान भरपाई – पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
मुंबई, दि. ४ : नुकसान भरपाईच्या निकषांमधून अल्प आणि अत्यल्प भूधारक हा निकष शिथिल करण्यात आला असून, आता लम्पी चर्मरोगाने बाधित पशुधनाचा मृत्यू झाल्यास अशा सर्व पशुपालकांना नुकसान भरपाई अनुज्ञेय करण्यात आली असल्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. श्री. विखे पाटील यांनी सोलापूर येथून आयुक्त पशुसंवर्धन यांचे समवेत लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव […]
सेवा पंधरवडा ५ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार; १४ लाखांहून अधिक नागरिकांचे तक्रार अर्ज निकाली
मुंबई, दि. ४: सामान्य नागरिकांच्या तक्रारी, अर्जांचा कालमर्यादेत निपटारा होण्यासाठी राज्यात आयोजित केलेल्या ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यात १४ लाख ८६ हजार ९५९ तक्रार अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. दरम्यान, हा सेवा पंधरवडा ५ नोव्हेंबरपर्यंत सुरू ठेवण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सेवा पंधरवड्याबाबत आढावा घेण्यात आला. राज्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर […]
शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मतदार नोंदणी सुरु
गडचिरोली: भारत निवडणूक आयोगाने दिनांक 14 जूलै,2022 च्या पत्रान्वये दिनांक 01 नोव्हेंबर,2022 या अर्हता दिनांकावर आधारीत नागपूर विभागातील शिक्षक मतदार संघासाठी नव्याने मतदार याद्या ( de-novo) तयार करावयाचा पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. दिनांक 01 नोव्हेंबर,2022 या आर्हता दिनांकावर आधारीत नागपूर विभागातील शिक्षक मतदार संघासाठी नव्याने मतदार याद्या ( de-novo) पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत, आपले नाव […]
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत विविध पोकरा अनुदान योजना
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत विविध पोकरा अनुदान योजना हवामान बदलाचा राज्याच्या शेतीवर विपरीत परिणाम दिसून येत असून, भविष्यात देखील सदर परिणामांची व्याप्ती वाढणार असल्याचे राज्याच्या हवामान बदला विषयक कृती आराखडयामध्ये नमूद केले आहे. मराठवाडा व विदर्भातील शेतक-यांना गेल्या काही वर्षांपासून मोठया दुष्काळास सामोरे जावे लागत असून भू-गर्भातील पाणीसाठयावर व जमिनीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत […]
आरोग्य सुविधांबाबत मुख्यमंत्र्यांकडून महत्वपूर्ण घोषणा, नागरिकांचा होणार मोठा फायदा…
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा भक्कम करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (ता. 3) महत्वपूर्ण घोषणा केल्या. राज्यात पुढील काळात तब्बल 700 ठिकाणी ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू केला जाणार आहे. त्या माध्यमातून नागरिकांना घराजवळ आरोग्य सुविधा मिळतील, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. एका खासगी कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्याच्या आरोग्य क्षेत्रासाठी अनेक महत्वाच्या घोषणा […]
मंत्रिमंडळ निर्णय ४ ऑक्टोबर, २०२२
१) शिधापत्रिकाधारकांना मिळणार दिवाळी भेट – अन्न व नागरी पुरवठा विभाग दिवाळीच्या निमित्ताने राज्यातील शिधापत्रिकाधारकांना शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज केवळ १०० रुपयांत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या संचामध्ये प्रत्येक शिधापत्रिकाधारकांना प्रति १ किलोच्या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर व १ लिटर पामतेल याचा समावेश असेल. राज्यातील […]
राज्याच्या आरोग्य क्षेत्रासाठी दुप्पट निधी देणार; राज्यभर ७०० ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
मुंबई, दि.३: राज्याची ग्रामीण आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी आमचे सर्वोच्च प्राधान्य असून आरोग्य क्षेत्रासाठी दुप्पट निधी देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एनडीटिव्ही वृत्तवाहिनीच्या ‘स्वस्थ बनेगा इंडिया’ या कार्यक्रमात दिली. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणे, राज्यभर सुमारे ७०० ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करणे, बाल आरोग्यावर विशेष लक्ष केंद्रीत करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. […]