विधानसभा निवडणूक २०२४ च्या आचारसंहिता कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार, नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सी व्हिजिल सिटीझन ॲप विकसित केले आहे. या ॲपवर दाखल होणाऱ्या तक्रारींवर 100 मिनिटांत पहिली कार्यवाही केली जात आहे. आचारसंहिता कालावधीत काय करावे आणि काय करु नये याविषयी निवडणूक उमेदवार, […]
Author: Lokrath Team
आगामी विधानसभा निवडणुकांसाठी राज्यात ९१५ शॅडो मतदान केंद्र रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक २३२ शॅडो
आगामी विधानसभा निवडणुकांसाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत राज्यात ९१५ शॅडो मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत. रत्नागिरी जिल्हयात सर्वाधिक २३२ शॅडो मतदान केंद्र तर सांगलीत केवळ १ शॅडो मतदान केंद्र असणार आहे. राज्यात एकूण २४ जिल्ह्यांमध्ये शॅडो मतदान केंद्र असतील. १२ जिल्ह्यांमध्ये शॅडो मतदान केंद्र नसतील. या शॅडो मतदान केंद्रात मतदानाच्या दिवशी विशेष सुविधा असणार आहेत. […]
जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी “शेतकरी प्रशिक्षण व कृषी निविष्ठा वितरण” कार्यक्रम
मुलचेरा:- भा.कृ.अनु.प.-केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर द्वारा व कृषी विभागाच्या सहकार्याने जिल्ह्यातील अनुसूचित जमाती शेतकऱ्यांसाठी “शेतकरी प्रशिक्षण व कृषी निविष्ठा वितरण” कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ११ ऑक्टोबर,२०२४ रोजी मुलचेरा तालुक्यातील चुटूगुंटा चक या ठिकाणी आयोजीत करण्यात आले होते. यावेळी कपाशीवरील गुलाबी , बोंड अळीच्या निगराणीसाठी ट्रॅप व कामगंध सापळे, जैविक खते, किटकनाशक व पाण्यात विरघळणारे नत्र:स्फुरद:पालाश […]
महाराष्ट्र मंत्रिमंडळ निर्णय
सार्वजनिक बांधकाम विभाग वांद्रे शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांना घरांसाठी जागा देणार वांद्रे शासकीय वसाहतीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरांसाठी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या संदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समिती ही जागेबाबतची निश्चित करणे, सदस्य संख्या निश्चित करणे तसेच इतर कार्यपद्धती […]
आलापल्लीतील टायगर ग्रुप गणेश मंडळ जिल्ह्यातून सर्वोत्कृष्ट
गडचिरोली दि. 10 : सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने घेण्यात आलेल्या सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत जिल्हास्तरावर सर्वोत्कृष्ट गणेश मंडळ म्हणून आलापल्लीच्या टायगर ग्रुप गणेश मंडळाला सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. राज्यस्तरीय तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेत विजयी झालेल्या मंडळास यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा येथे काल पारितोषिक प्रदान करण्यात […]
महामंडळाच्या थकीत कर्जदारांसाठी एकरक्कमी भरणा करणाऱ्या लाभार्थीस व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत परतावा योजना
गडचिरोली: महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या (ओ.बी.सी.महामंडळ) थकीत कर्ज प्रकरणात लाभार्थ्यांसाठी एकरक्कमी परतफेड योजना (OTS) 31 मार्च 2025 पर्यंत राबविण्यात येत आहे. या योजनेनुसार महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपूर्ण थकीत कर्ज रक्कमेचा एकरक्कमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यांस थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. महामंडळाच्या गडचिरोली जिल्ह्यातील थकबाकीदार लाभार्थ्यांनी या योजनेचा […]
शहरी आरोग्य वर्धिनी केंद्रामध्ये मिळणार पॉलिक्लिनिक सेवा
गडचिरोली :- राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्यवर्धिनी केंद्र गोकुलनगर व रामनगर गडचिरोली येथे विशेष तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून विशिष्ट सेवा पुरविण्याकरिता आज जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे यांच्या हस्ते सुरवात करण्यात आले. सदर सेवांचा उद्देश म्हणजे स्त्री रोग उपचार, बालरोग उपचार, नेत्ररोग उपचार, कान-नाक-घसा रोग उपचार, मानसिक रोग उपचार, त्वचा रोग उपचार इत्यादी […]
गडचिरोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे आज उद्घाटन
गडचिरोली दि. 8 : गडचिरोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे उद्घाटन 9 ऑक्टोबर 2024 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे होणार असून या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे करण्यात येणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला राज्यपाल सि.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय आरोग्य मंत्री जगतप्रसाद नड्डा, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे […]
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात ‘शक्ती पेटी’ चे वितरण
बारामती वकील संघटनेच्यावतीने आयोजित संवाद मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शक्ती अभियानाअंतर्गत शहरातील शाळेस प्रातिनिधिक स्वरुपात ‘शक्ती पेटी’ चे वितरण करण्यात आले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. प्रभाकर बर्डे, उपाध्यक्ष ॲड.प्रिती शिंदे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी […]
‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ पुढील पाच वर्ष चालू राहील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सोलापूर येथे ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ वचनपूर्ती सोहळा राज्य शासनाने महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. राज्यातील 2 कोटी 20 लाख बहिणींच्या खात्यात थेट पैसे जमा झालेले आहेत. महिलांच्या सक्षमीकरणाचा विचार प्रथम या शासनाने केलेला असून त्याचा लाभ राज्यातील लाडक्या बहिणींना मिळत असल्याने त्यांना एक प्रकारचा आनंद व समाधान मिळत आहे. हा आनंद […]