गडचिरोली

*सिरोंच्यातील नगरम चौक आता ‘संविधान चौक’; संविधान दिनी नगराध्यक्ष पद्मा बोगे यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण* *संविधान दिनानिमित्त नगराध्यक्ष पद्मा बोगे यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण; नागरिकांची मोठी उपस्थिती*

सिरोंचा : भारतीय संविधानाचा गौरव आणि संविधान निर्मात्यांच्या विचारांचा सन्मान करण्यासाठी, संविधान दिनाचे औचित्य साधून सिरोंचा शहरातील नगरम चौकाचे ‘संविधान चौक’ असे अधिकृत नामकरण करण्यात आले. मिलिंद बहुद्देशीय विकास मंडळ आणि नालंदा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष दुर्गम सर यांच्या मागणीची दखल घेत नगर पंचायत प्रशासनाने २६ नोव्हेंबर रोजी हा सोहळा पार पाडला. यावेळी नगराध्यक्ष सौ. पद्मा […]

इतर

महाराष्ट्राच्या विकासात स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा यांचे मोठे योगदान – उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे गौरवोद्गार उपराष्ट्रपतींच्या हस्ते जवाहरलाल दर्डा यांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण

यवतमाळ, दि. २५ (जिमाका): महाराष्ट्राच्या विकासात स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा यांचे मोठे योगदान असल्याचे गौरवोद्गार उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन यांनी आज येथे काढले.स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून प्रियदर्शनी सहकारी सूतगिरणी येथे उभारण्यात आलेल्या त्यांच्या पूर्णाकृती कांस्य पुतळ्याचे अनावरण उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते डिजीटल पद्धतीने करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला राज्यपाल जिष्णू देव वर्मा, […]