महाराष्ट्र

ॲग्रीस्टॅकमुळे राज्यातील १ कोटी ४४ लाख शेतकऱ्यांना डिजिटल ओळख; देशात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

ॲग्रीस्टॅकमुळे राज्यातील १ कोटी ४४ लाख शेतकऱ्यांना डिजिटल ओळख; देशात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे   मुंबई, दि. २६ : राज्यातील शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ जलद, पारदर्शक आणि परिणामकारक पद्धतीने मिळावा, तसेच कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा विस्तार व्हावा, या उद्देशाने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महाराष्ट्रात ॲग्रीस्टॅक योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र

दुय्यम न्यायालयातील कर्मचारी मागण्यांच्या पूर्ततेसाठी तीन सदस्यीय समिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या संघटनांसोबत बैठक

मुंबई, दि.२६ : दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन संवेदनशील आहे. मागण्यांची पूर्तता करण्यासाठी शासनाने एक पाऊल पुढे टाकले आहे. या मागण्यांबाबत यापूर्वी उच्च न्यायालयाने गठित केलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाला असून या अहवालातील शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी तीन सदस्यांची समिती स्थापन करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. सह्याद्री अतिथिगृह येथे दुय्यम न्यायालयातील कर्मचारी संघटनांच्या […]

गडचिरोली

*सिरोंच्यातील नगरम चौक आता ‘संविधान चौक’; संविधान दिनी नगराध्यक्ष पद्मा बोगे यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण* *संविधान दिनानिमित्त नगराध्यक्ष पद्मा बोगे यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण; नागरिकांची मोठी उपस्थिती*

सिरोंचा : भारतीय संविधानाचा गौरव आणि संविधान निर्मात्यांच्या विचारांचा सन्मान करण्यासाठी, संविधान दिनाचे औचित्य साधून सिरोंचा शहरातील नगरम चौकाचे ‘संविधान चौक’ असे अधिकृत नामकरण करण्यात आले. मिलिंद बहुद्देशीय विकास मंडळ आणि नालंदा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष दुर्गम सर यांच्या मागणीची दखल घेत नगर पंचायत प्रशासनाने २६ नोव्हेंबर रोजी हा सोहळा पार पाडला. यावेळी नगराध्यक्ष सौ. पद्मा […]

गडचिरोली

गडचिरोली जिल्ह्यातील मुलींसाठी मोफत निवासी वैमानिक प्रशिक्षणाची संधी* *जिल्हा परिषदेचा पुढाकार; १ डिसेंबर रोजी मार्गदर्शन कार्यक्रम*

*गडचिरोली जिल्ह्यातील मुलींसाठी मोफत निवासी वैमानिक प्रशिक्षणाची संधी* *जिल्हा परिषदेचा पुढाकार; १ डिसेंबर रोजी मार्गदर्शन कार्यक्रम* *इच्छुक मुलींनी प्रशिक्षणाच्या संधीचा लाभ घ्यावा – सुहास गाडे* गडचिरोली, दि. २५ नोव्हेंबर (जिमाका) : जिल्ह्यातील मुलींना विमान वाहतूक क्षेत्रात करिअरची संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद, गडचिरोलीच्या पुढाकाराने इंडिगो (IndiGo) आणि इंडिगोरीच (IndiGoReach) यांच्या सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांतर्गत […]

इतर

वाघोलीतील शेतकऱ्यांशी भूसंपादनाबाबत समितीची तीन तास चर्चा* *शेतकऱ्यांच्या संमतीनेच पुढील प्रक्रिया, संपादित जमिनीचा योग्य मोबदला देणार*

*वाघोलीतील शेतकऱ्यांशी भूसंपादनाबाबत समितीची तीन तास चर्चा* *शेतकऱ्यांच्या संमतीनेच पुढील प्रक्रिया, संपादित जमिनीचा योग्य मोबदला देणार* गडचिरोली, दि. २६ नोव्हेंबर (जिमाका) — जिल्ह्यातील पोलाद प्रकल्पांसाठीच्या प्रस्तावित भूसंपादनासंदर्भात जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने वाघोली येथील शेतकरी व स्थानिक रहिवाशांशी जिल्हाधिकारी कार्यालयात काल तीन तास चर्चा केली. बैठकीत शेतकऱ्यांनी भूसंपादनासंदर्भातील मांडलेल्या शंका, हरकती आणि त्यांच्या मनातील […]

इतर

महाराष्ट्राच्या विकासात स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा यांचे मोठे योगदान – उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे गौरवोद्गार उपराष्ट्रपतींच्या हस्ते जवाहरलाल दर्डा यांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण

यवतमाळ, दि. २५ (जिमाका): महाराष्ट्राच्या विकासात स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा यांचे मोठे योगदान असल्याचे गौरवोद्गार उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन यांनी आज येथे काढले.स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून प्रियदर्शनी सहकारी सूतगिरणी येथे उभारण्यात आलेल्या त्यांच्या पूर्णाकृती कांस्य पुतळ्याचे अनावरण उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते डिजीटल पद्धतीने करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला राज्यपाल जिष्णू देव वर्मा, […]

गडचिरोली

तब्बल १०० किलोमीटरचा सायकल प्रवास करून गाठले ‘तिरुपती बालाजी’चे दर्शन!

तब्बल १०० किलोमीटरचा सायकल प्रवास करून गाठले ‘तिरुपती बालाजी’चे दर्शन! सिरोंचातील प्रमोद गुंडे यांचा अनोखा भक्तिमय उपक्रम; ११ दिवसांत सायकलने पूर्ण केली तिरुपती बालाजी यात्रा, परिसरातून कौतुकाचा वर्षाव सिरोंचा, दि. २५ नोव्हेंबर : श्रद्धा, भक्ती, जिद्द आणि प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कोणतेही ध्येय अशक्य नसते, याचा प्रत्यय सिरोंचा येथील रहिवासी प्रमोद गुंडे यांनी आपल्या अनोख्या […]

गडचिरोली

एटापल्ली वनपरिक्षेत्रात गावविकासाची विविध कामे पूर्ण; वनसंवर्धनासोबत रोजगारनिर्मितीलाही चालना!

एटापल्ली वनपरिक्षेत्रात गावविकासाची विविध कामे पूर्ण; वनसंवर्धनासोबत रोजगारनिर्मितीलाही चालना! अवैध सागवान वाहतुकीवर वनविभागाची मोठी कारवाई; ५५ ट्रॅक्टर जप्त, २० कोटींचा महसूल, स्थानिकांना रोजगाराच्या संधी एटापल्ली, दि. २५ नोव्हेंबर : गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आणि वनबहुल एटापल्ली परिसरात वनसंरक्षण, वनसंपत्तीचे संवर्धन, अवैध वृक्षतोड आणि वनसंपत्तीच्या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासोबतच गावविकास आणि रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी वनविभागाच्या माध्यमातून मागील […]

महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना तीन महिने मोफत धान्य! राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना तीन महिने मोफत धान्य! राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय राज्यातील ३३ जिल्ह्यांतील ४२ लाख शेतकरी कुटुंबांना लाभ; चार सदस्यांच्या कुटुंबाला तीन महिन्यांत ६० किलो धान्य मिळणार मुंबई, दि. २६ नोव्हेंबर २०२६ : राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील ३३ जिल्ह्यांमधील राष्ट्रीय […]

गडचिरोली महाराष्ट्र

दिव्यांगांसाठी १६ कल्याणकारी योजनांची कवाडे उघडणार! आता तालुकास्तरावरच मिळणार लाभ; गडचिरोली जिल्हा प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

दिव्यांगांसाठी १६ कल्याणकारी योजनांची कवाडे उघडणार! आता तालुकास्तरावरच मिळणार लाभ; गडचिरोली जिल्हा प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय ई-बाईक, इलेक्ट्रिक व्हीलचेअर, स्मार्ट उपकरणांपासून कौशल्य प्रशिक्षणापर्यंत अर्थसहाय्य; दुर्गम भागातील दिव्यांगांना मोठा दिलासा गडचिरोली : जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना स्वावलंबी बनविण्यासोबतच त्यांना शिक्षण, रोजगार, आरोग्य, प्रवास आणि दैनंदिन जीवनात आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. दिव्यांगांसाठी […]