ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेअंतर्गत वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत लाभार्थींनी ई-केवायसी पूर्ण करावी – तहसिलदार चेतन पाटील

मुलचेरा: राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजने’ अंतर्गत पात्र लाभार्थी कुटूंबांना वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या योजनेसाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या व मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे लाभार्थी कुटुंब पात्र ठरणार असल्याने संबंधीत लाभार्थींनी आपल्या गॅस एजंन्सीमध्ये संपर्क करावा, तसेच योजनेचा लाभ मिळण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन तहसिलदार चेतन पाटील यांनी केले आहे.

ग्राहकांनी गॅस साठी बुकींग ऑनलाईन करावी. तसेच 3 सिलेंडरची रक्कम लाभार्थ्यांकडून गॅस एजन्सी मार्फत वसुल करण्यात येईल. त्याकरिता ग्राहकांनी गॅस एजन्सीकडून सिलेंडर खरेदी केल्यानंतर 3 सिलेंडरची रक्कम ग्राहकांच्या बँक खातेमध्ये सबसिडीच्या रुपात जमा होईल. या योजनेचा लाभ घेण्याकरिता महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन असणे आवश्यक आहे. कुटुंबप्रमुख अर्थात पुरुषाच्या नावावर कनेक्शन असेल तर ते ग्राहय धरले जाणार नाही. त्यासाठी महिलेच्या नावावर कनेक्शन करावे लागणार आहे. मुलचेरा तालुक्यात 1 एचपी गॅस एजन्सी परवानाधारक कार्यरत असून ई-केवायसी प्रक्रिया पुर्णपणे करून घ्यावे.