विशेष माहिती :- महाराष्ट्र शासनामार्फत सतत नवनवीन बदल केले जातात मग ते बदल आधारकार्ड संबंधित असतील, मतदानकार्ड संबंधात असतील किंवा राशन कार्ड संबंधीत असतात. अश्याच प्रकारचा बदल मागील वर्षी रेशनकार्डमध्ये करण्यात आला. जुने रेशन कार्डच्या क्रमांकाऐवजी नागरिकांना १२ आकडी SRC NUMBER क्रमांक देण्यात आला. त्या १२ अंकी SRC क्रमांकामधे एका कुटुंबातील संपूर्ण व्यक्तींची नावे समाविष्ट […]
ताज्या घडामोडी
कोविड-19 मुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे दहावी आणि बारावीची परीक्षा फी माफ
विशेष माहिती : राज्यात कोविड-19 मुळे पालक गमावलेल्या आणि 2022 मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांचे संपूर्ण परीक्षा शुल्क एक विशेष बाब म्हणून माफ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली. कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावामुळे काही विद्यार्थ्यांनी त्यांचे पालक अथवा कायदेशीर पालक/ दत्तक पालक गमावलेले आहेत. (Tenth and […]
कोरोनाने निधन झालेल्यांच्या वारसांना ५० हजार सानुग्रह निधीसाठी ऑनलाईन अर्ज सुरु – MahaCovid19Relief
विशेष माहिती :- कोविड-19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास रु. 50,000/- इतके सानुग्रह सहाय्य देण्याबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाने दि. 04.10.2021 रोजी दिलेल्या निर्देशानुसार, महसूल व वन (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन) विभागाने शासन निर्णय 26 नोव्हेंबर रोजी प्रसारित केला आहे. आवश्यक कागदपत्रे: अर्जदाराची 1 आधार कार्ड प्रत. मृत व्यक्तीच्या आधार कार्डाची २ प्रत. […]
फ्री घरगुती वीज कनेक्शन अर्ज सुरू | जीवन प्रकाश योजना
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शोषित व उपेक्षितांचे मुक्तिदाते म्हणून सुपरिचित आहेत. विपरित परिस्थितीत त्यांनी देश व विदेशातून उच्च शिक्षण प्राप्त करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. याच शिक्षणाच्या बळावर शोषित, उपेक्षित घटक व एकूणच समग्र भारतीयांच्या जीवनात क्रांतीकारक बदल घडवून आणले व एक प्रकारे आधुनिक भारताची पायाभरणी केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाची […]
राज्यातील नागरी सहकारी बँकांमधील नोकरभरती प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविणेबाबत शासन निर्णय जारी
राज्यातील नागरी सहकारी बँकांचे कामकाज कार्यक्षम व निर्विवाद पध्दतीने हाताळण्यासाठी गुणवत्तापूर्ण सेवक वर्गाची पारदर्शक, निष्पक्ष व विश्वासार्ह भरती प्रक्रिया राबविण्यासाठी शासन आदेश क्र. युआरबी १८१८/प्र.क्र. ९/ शिकाना/७ – स, दि. २१ जानेवारी, २०१९ अन्वये राज्यातील सर्व नागरी सहकारी बँकांना ऑनलाईन पद्धतीने भरती प्रक्रीया राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या शासन आदेशान्वये करण्यात येत असलेल्या नोकर […]
सार्वजनिक ठिकाणी मास्क असलेल्या व कोरोना लसीकरण झालेल्यांना प्रवेश
सार्वजनिक ठिकाणी मास्क असलेल्या व कोरोना लसीकरण झालेल्यांना प्रवेश आंतरराष्ट्रीय प्रवास करून आल्यास आरटीपीसीआर चाचणी व विनियमन बंधनकारक जिल्हा प्रशासनाच्या नवीन मार्गदर्शक सूचना जारी नियमांचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाईचीही तरतूद गडचिरोली: राज्यांतील कोविड- 19 रुग्णसंख्येच्या आलेखामध्ये, निरंतर व सातत्याने घट होत आहे. आवश्यक निर्बंधांचे विविध आस्थापनांकडून कोविड 19 विषयक निर्बधांचे पालन करण्यात येत असलेल्या […]
पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी
१ डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू; शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे १०० टक्के लसीकरण आवश्यक विशेष माहिती :- येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. सर्व शाळांनी या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे. […]
रमाई आवास योजना : राज्यात ग्रामीण भागात व शहरी भागात १ लाख ३६ हजार २४७ घरकुल उभारणीच्या उद्दिष्टास राज्य शासनाची मंजुरी
विशेष माहिती :- सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वतःच्या हक्काचे घर उभारणीच्या स्वप्नाला पूरक असलेल्या रमाई आवास घरकुल या अत्यंत महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत राज्यात ग्रामीण भागात 1 लाख 13 हजार 571 व शहरी भागात 22 हजार 676 घरकुलांच्या उद्दिष्टास सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी राज्य शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती, सामाजिक न्याय व विशेष […]
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नातेवाईकांना मिळणार 50,000 हजार रुपये
योजना :- दि. 30/06/2021 रोजी दिलेल्या निर्णयानुसार कोव्हिड-19 या आजारामुळे निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाईकास सहाय्य प्रदान करणेबाबत वर नमूद दिनांक 11 सप्टेंबर 2021 च्या परिपत्रकान्वये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सविस्तर मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाने दि. 04 ऑक्टोंबर, 2021 रोजी सविस्तर आदेश निर्गमित केले आहेत. राज्य शासनाने, महसूल व वन […]
या शेतकऱ्यांचे सावकारी कर्ज होणार माफ; शासन निर्णय जारी
विशेष माहिती :- विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेले कर्ज शासनामार्फत संबंधीत सावकारास अदा करुन शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यास दि. १०/०४/२०१५ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. सदर शासन निर्णयानुसार सावकाराने सावकारी परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेर दिलेले कर्ज या योजनेस अपात्र ठरविण्यात आले होते. त्यानुषंगाने दि. १०/०४/२०१५ रोजीच्या शासन निर्णया मधील सदर अट […]