जिल्ह्यात मेंढा लेखा ग्रामसभेपासून ऐतिहासिक वाटचालीस सुरूवात गडचिरोली : जिल्हयातील ग्रामसभांसाठी कौशल्य व क्षमता विकसनासंदर्भात कार्यक्रम हाती घेवून गौणवनोपजामधून त्यांच्या क्षमता व मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेण्यास सक्षम करणे या उद्देशाने प्रशासन आणि विविध ग्रामसभांमध्ये सामंजस्य करार होणार आहेत. याची ऐतिहासिक सुरूवात जिल्हाधिकारी कार्यालयात आज लेखा मेंढा या ग्रामसभेपासून झाली. यावेळी जिल्हा परिवर्तन समितीचे अध्यक्ष तथा […]
ताज्या बातम्या
खरीप व रब्बी हंगाम २०२२-२३ करिता खताच्या संरक्षित साठ्यासंदर्भात नियोजन करण्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश
मुंबई,.:- खरीप व रब्बी हंगाम 2022-23 मध्ये शेतकऱ्यांना युरिया व डीएपी खताचा तुटवडा भासू नये, यासाठी केंद्र शासनाकडे याबाबत पाठपुरावा करुन नियोजन करावे, अशा सूचना कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केल्या. आज मंत्रालयात युरिया व डीएपी खताच्या संरक्षित साठा (Buffer Stock) करुन ठेवण्याबाबत गठीत केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. याबैठकीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, […]
विद्यार्थ्यांनी परीक्षांना आत्मविश्वासाने सामोरे जावे – शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांचे आवाहन
मुंबई, : कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने इयत्ता दहावी आणि बारावीच्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा प्रचलित पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टीने शाळा तेथे केंद्र किंवा उपकेंद्र या पद्धतीने नियोजन करण्यात आले असून इयत्ता बारावीसाठी परीक्षा केंद्रांची/ उपकेंद्रांची संख्या 9613 तर इयत्ता दहावीसाठी परीक्षा केंद्रांची […]
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ ते २५ मार्चदरम्यान मुंबईत; कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय
मुंबई,:- महाराष्ट्र विधानमंडळाचे सन 2022 चे पहिले (अर्थसंकल्पीय अधिवेशन) मुंबईत गुरुवार दि. 3 मार्च 2022 रोजी सुरु होणार असून दि. 25 मार्च 2022 पर्यंत अधिवेशनाचे कामकाज होणार आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (ऑनलाईन […]
लोकसेवा आयोगामार्फत पशुधन विकास अधिकारी पदांच्या एकूण २२४ जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यामार्फत राज्य सरकारच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या अस्थापनेवरील पशुधन विकास अधिकारी पदांच्या एकूण २२४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पशुधन विकास अधिकारी पदाच्या २२४ जागा कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागातील जागा अर्ज करण्याची तारीख – दिनांक १५ […]
गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राला अनेक गुंतवणूकदारांची पसंती – उद्योगमंत्री सुभाष देसाई
पुणे:- महाराष्ट्र औद्योगिकरणात नेहमीचे अग्रेसर राज्य राहिले आहे. राज्यात चांगल्या पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ उपलब्ध असल्याने राज्यात गुंतवणूक करण्यास अनेक गुंतवणूकदारांनी पसंती दर्शवली असल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले. पुणे येथे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रिज अँड ॲग्रीकल्चरच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय व्यापार परिषदेत उद्योगमंत्री श्री.देसाई बोलत होते. यावेळी सिरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक डॉ. सायरस पूनावाला, […]
छत्रपती शिवाजी महाराज जयंती 2022 बाबत गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी
“छत्रपती शिवाजी महाराज” यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्यानुसार दि. १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर हा उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन प्रजातीचे संक्रमण अद्याप सुरु आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गर्दी करुन उत्सव साजरा न करता स्वतःच्या व इतरांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून काळजी घेऊन “छत्रपती शिवाजी महाराज जयंती” उत्सव […]
E-Shram Card Yojana Marathi : असंघटीत कामगारांसाठीची योजना
E-Shram Card Yojana Marathi-केंद्र सरकार केवळ शेतकऱ्यांसाठीच नवनवीन योजना राबवत नाही तर त्याच बरोबर असंघटीत कामगारांसाठीही योजना राबवल्या जात आहेत. आता ई-श्रम कार्डच्या माध्यमातून योजनांचा लाभ तर मिळणार आहेच पण सर्व असंघटीत कामगारांचा डाटा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. ई-श्रम कार्ड योजना ही संपूर्ण देशभर राबवली जात आहे. देशात स्थलांतरीत कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या […]
थेट कर्ज योजनेच्या कर्जाची मर्यादा रु. २५,०००/- वरुन रु. १,००,०००/- पर्यंत वाढविण्याबाबत शासन निर्णय जारी
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील दारिद्र्य रेषेखालील जीवनमान जगणा-या घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी तसेच त्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने शासन निर्णय दि. ३०/११/२००४ अन्वये रु. २५,०००/- थेट कर्ज योजना राबविण्यात येत आहे. तथापि, सध्याच्या परिस्थितीत लघु उद्योगांकरीता लागणा-या भांडवली व पायाभूत […]
जगातील अव्वल व्यापारी राष्ट्र होण्यासाठी उद्योग जगताने कृती आराखडा तयार करावा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
मुंबई:-देश स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत असताना देशातील उद्योग जगताने पुढील २५ वर्षात देशाला जगातील अव्वल व्यापारी राष्ट्र बनविण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावे व त्या दृष्टीने कृती आराखडा तयार करावा, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. एसएमई चेंबर ऑफ इंडीया आणि महाराष्ट्र औद्योगिक व आर्थिक विकास असोसिएशनच्या वतीने देण्यात येणारे ‘इंडीया एसएमई […]