Maharashtra Politics : ठाकरे गटाकडून मातृतीर्थ ते शिवतीर्थ यात्रेची घोषणा करण्यात आली असून या माध्यमातून ७० लाख लोकांपर्यंत पोहोचून लोकसभेचे १३ तर विधानसभेचे २७ मतदारसंघ कव्हर करण्याचे नियोजन आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यात ८०० किलोमीटरची यात्रा काढण्यात येणार आहे. ३० जानेवारी ते ३ मार्च पर्यंत म्हणजे ३५ दिवस हे अभियान सुरू […]
ताज्या बातम्या
सर्वसमावेशक, प्रगतीशील, पुरोगामी, विकसित महाराष्ट्र घडविणार -राज्यपाल रमेश बैस प्रजासत्ताक दिन मुख्य शासकीय समारंभ
मुंबई, दि. २६: सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक, प्रगतीशील, पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्यपाल रमेश बैस यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित समारंभात दिली. स्वातंत्र्याच्या अमृत काळात नवीन व बलशाली महाराष्ट्र घडविण्याच्या दृष्टीने संकल्प करावा, असे आवाहन करून त्यांनी नागरिकांना प्रजासत्ताकदिनाच्या शुभेच्छा दिल्या. ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईतील शिवाजी पार्कवर आयोजित मुख्य शासकीय […]
अमृत काळातील विकसित भारतासाठी संविधानातील कर्तव्याचे पालन करूया! -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अमृत काळातील विकसित भारतासाठी संविधानातील कर्तव्याचे पालन करूया! -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर, दि. 26 : प्रजासत्ताकाच्या अमृत महोत्सवाच्या काळात संविधानाने सामान्य नागरिकाला दिलेल्या मूलभूत अधिकारांसोबत मूलभूत कर्तव्यांचे पालन करून देशाला अमृतकाळात विकसित करण्याचे व महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला एक ट्रिलियन डॉलर करण्याचा संकल्प करण्याची अपेक्षा उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केली. शेतकरी कल्याण […]
महाराष्ट्रातील तीन महिलांना जीवन रक्षा पदक पुरस्कार जाहीर
देशातील 31 व्यक्तींना राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी जीवन रक्षा पदक श्रुंखला पुरस्कार 2023 साठी मान्यता प्रदान केली असून, यात महाराष्ट्रातील तीन धाडसी महिलांचा समावेश आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या पुरस्कारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये तीन सर्वोत्तम जीवन रक्षा पदक, सात उत्तम जीवन रक्षा पदक आणि 21 पराक्रमी व्यक्तींना जीवन रक्षा पदकाचा समावेश आहे. यात […]
महाराष्ट्राला १२ पद्म पुरस्कार जाहीर
दिग्दर्शक राजदत्त, ज्येष्ठ नेते राम नाईक, संगीतकार प्यारेलाल यांच्यासह सहा जणांना पद्मभूषण पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर, मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे, नेत्रतज्ञ मनोहर डोळे सह सहा मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार नवी दिल्ली, 25 : सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांची घोषणा आज रात्री उशीरा करण्यात आली. प्रसिध्द साहित्यिक होर्मुसजी कामा यांना (साहित्य व शिक्षण-पत्रकारिता) क्षेत्रात, अश्विन मेहता […]
Arif Mohammad Khan दोन मिनिटांतच संपवले
केरळच्या राज्यपालांनी दोन मिनिटांतच संपवले धोरणात्मक भाषण राज्यातील सत्ताधारी डाव्या आघाडीवर आपली नाराजी दर्शविणार्या अभूतपूर्व घडामोडीत केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी गुरुवारी विधानसभेत सरकारच्या प्रथागत धोरणाचा शेवटचा परिच्छेद वाचून दोन मिनिटांपेक्षा कमी वेळेत आपले धोरणात्मक भाषण संपविले. राज्यपाल आरिफ मोहम्मद खान हे सकाळी 9 वाजता विधानसभेत पोहोचले आणि त्यांनी 9.02 वाजताच्या आधी आपले धोरणात्मक […]
संतप्त Prakash Ambedkar काँग्रेसला खरमरीत पत्र
मुंबई :- गेल्या अनेक बैठकांमध्ये वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडी किंवा देश स्तरावरील आघाडीपासून बाजूला ठेवून आता ऐनवेळी बैठकीचे निमंत्रण दिल्याने वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर संतापले असून, काँग्रेसवर आगपाखड करणारे खरमरीत पत्र त्यांनी पाठविले आहे. निमंत्रण मिळूनही वंचितकडून गुरुवारी झालेल्या बैठकीत कोणीही सहभागी झाले नाही. लोकसभा निवडणुकीच्या द़ृष्टीने महाविकास आघाडीकडून मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली […]
उत्कृष्ट सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून मुलचेऱ्याचे तहसीलदार चेतन पाटील यांचा गौरव.
मुलचेरा -: सन 2023 मधील मतदार यादीचे अद्यावतीकरण, तक्रारीचे निवारण, मतदार यादीमध्ये नवीन युवा मतदारांचे नाव नोंदणीसाठी राबविलेलेले नावीन्यपूर्ण उपक्रम या कार्याबद्दल जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी गडचिरोली यांचे कार्यालयामार्फत राष्ट्रीय मतदार दिनांचे औचित्य साधून उत्कृष्ट सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून मुलचेऱ्याचे तहसीलदार चेतन पाटील यांचा प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला.सदर राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमाला […]
नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय, मुलचेरा येथे एक दिवसीय राष्ट्रीय परीषद संपन्न
नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय, मुलचेरा येथे एक दिवसीय राष्ट्रीय परीषद संपन्न शाश्वत विकास साधायचा असेल तर त्यासाठी तंत्रज्ञान आवश्यक आहे, शाश्वत विकासानेच शहरी व ग्रामीण भागातील दरी दुर होईल .- मा. कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांचे प्रतिपादन मुलचेरा- नुकतेच नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय, मुलचेरा येथे शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानातील इमर्जिंग ट्रेंड्स NCETSTSD-2024 या विषयावर गोंडवाना […]
भारत ब्राह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांची निर्यात करणार
BrahMos supersonic missiles संरक्षण क्षेत्रात पूर्णपणे स्वावलंबी होण्याच्या भारताच्या प्रयत्नात लवकरच आणखी एक यशाची भर पडणार आहे. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DDO) या वर्षी मार्चपर्यंत ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची निर्यात सुरू करेल. खुद्द डीआरडीओचे प्रमुख समीर व्ही. कामत यांनी याला दुजोरा दिला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले की, डीआरडीओ येत्या 10 दिवसांत या […]