ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर सजगपणे आवश्यक – मनीष पोतदार

 कृत्रिम बुद्धिमत्ता सारख्या तंत्रज्ञानाचा वापर जितक्या मोठ्या प्रमाणात वाढतो आहे, तितक्याच मोठ्या प्रमाणावर त्याच्याशी संबंधित काही धोकेही आहेत. काही वेळा हे तंत्रज्ञान आपल्याला वास्तवापासून दूर नेते, ज्या प्रश्नांची उत्तरे आपण शोधत आहोत, त्यापासून आपले लक्ष विचलित करते. त्यामुळे, या वापरासोबतच आपण त्याचे धोके ओळखणे आणि त्याबाबत सजग राहणे आवश्यक आहे, असे मत एलटीआय माईंडट्री कंपनीचे […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, स्वच्छता व शिस्त रुजवावी – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत ‘सिंगापूर अभ्‍यास दौरा : समृद्ध अनुभव’ चर्चासत्राचे आयोजन  सिंगापूरच्‍या शिक्षण प्रणालीमध्‍ये देशप्रेमाला अनन्‍यसाधारण महत्त्व आहे. विद्यार्थ्‍यांना शिक्षण देताना ते देशाचे उत्‍कृष्‍ट नागरिक कसे घडतील याला त्‍यांनी प्राधान्‍य दिले आहे. त्‍याप्रमाणेच आपण देखील विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, स्वच्छता आणि शिस्त रुजवून ते भविष्‍यात सुजाण नागरिक घडतील, यावर भर देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

विकासकामे तातडीने सुरू करावीत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

‘झिरो माईल’ होणार पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र नागपूर महानगराच्या चौफेर विकासासाठी जे आराखडे व नियोजन झाले आहे त्याप्रमाणे तत्काळ कामे सुरू झाली पाहिजे. ऑरेंज सिटी स्ट्रिट प्रकल्प येथे परफार्मन्स गॅलरी, झिरो मॉईल सुशोभिकरण, कॉटन मार्केट विकास, फुल मार्केट, कारागृह स्थलांतरण ही कामे महानगराच्या चौफेर विकासाला हातभार लावणारी आहेत. यादृष्टीने संबंधित यंत्रणांनी प्रस्तावित कामे तत्काळ सुरु करण्याचे […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत गोंडवाना विद्यापीठ, लॉईड स्टील व कर्टीन विद्यापीठ करार यांचेमध्ये सामंजस्य करार

आगामी पाच वर्षांमध्ये गडचिरोली देशातील ‘स्टील हब’ होईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली लवकरच सर्वाधिक समृद्ध जिल्हा होईल – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन मुंबई, दि.7 : युवकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण व कौशल्य प्रदान केल्याशिवाय विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करता येणार नाही असे सांगून गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाने तेथील लॉइड स्टील कंपनी व पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या कर्टीन विद्यापीठासोबत […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

विकसित महाराष्ट्र २०४७ चे व्हिजन डॉक्युमेट तयार करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई,दि.७ : प्रशासनात लोकाभिमुखता आणणारा १०० दिवस या उपक्रमाचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडला आहे. शंभर दिवसात सर्व विभागांनी चांगले काम केले आहे. आगामी १५० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कामकाजाचा निकाल २ ऑक्टोबर रोजी घोषित केला जाणार आहे या उपक्रमांतर्गतच ‘विकसित भारत २०४७’ च्या धर्तीवर ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ चे व्हिजन डॉक्युमेट तयार करा असे निर्देश मुख्यमंत्री […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

प्रवाशांना ‘बेस्ट’ बसेसची रिअल-टाईम माहिती देणारी सुविधा उपयुक्त -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ७ : मुंबईतील प्रवास आता अधिक सुलभ आणि स्मार्ट होणार आहे. बृहन्मुंबई इलेक्ट्रिक पुरवठा आणि परिवहन उपक्रम (बेस्ट) आणि गुगल यांच्यातील सहकार्यामुळे आता बेस्ट बसेसची रिअल-टाईम माहिती गुगल मॅपवर पाहता येणार आहे. प्रवाश्यांच्या वेळेची बचत करुन त्यांच्या सुलभ प्रवाशांच्या दृष्टीने ही एक उपयुक्त सुविधा उपलब्ध होत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. गुगल […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मुलचेरा तालुक्यात खरीप हंगामपूर्व शेतकरी कार्यशाळेचे आयोजन

मुलचेरा :- ०६/०५/२०२५ रोजी तालुकास्तरीय खरिप हंगामपुर्व शेतकरी कार्यशाळा तहशील सभागृह मूलचेरा येथे आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेमध्ये खालील प्रमाणे मार्गदर्शन व चर्चा करण्यात आली. गटांच्या माध्यमातून खरीप हंगामासाठी आवश्यक निविष्ठा एकत्रित खरेदी केल्यास मोठ्या प्रमाणात बचत होऊन उत्पादन खर्च कमी होणार आहे विद्यापीठाचे तंत्रज्ञान व नैसर्गिक शेती तसेच सेंद्रिय शेती अवलंब करणे कृषी विभागाच्या […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

अमृत बेकरी प्रशिक्षण योजना

अमृत बेकरी प्रशिक्षण योजना (Amrut Bakery Prashikshan Yojana) ही महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (AMRUT) आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणारी एक निवासी प्रशिक्षण (Amrut Bakery Prashikshan Yojana) योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे लक्षित गटातील उमेदवारांना बेकरी उत्पादनांवर आधारित उद्योजकता विकास प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

इंटरनेट ऑफ थिंग्ज तंत्रज्ञानामुळे कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार – नॅसकॉमचे तज्ज्ञ रवींद्र देशपांडे

इंटरनेट ऑफ थिंग्ज तंत्रज्ञानामुळे शासनाच्या विविध सेवांमध्ये गतिमानता येऊन कार्यक्षमता वाढीस लागणार आहे. तसेच नागरिकांचे जीवनमान सुधारण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन नॅसकॉमचे सिस्टिम इंटिग्रेशन तज्ज्ञ रवींद्र देशपांडे यांनी केले. सामान्य प्रशासन विभागातर्फे प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्यामध्ये प्रशिक्षण संस्कृती निर्माण करण्यासाठी “टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत ‘इंटरनेट ऑफ […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

पारंपरिक खाद्यसंस्कृती डिजिटल माध्यमातून नव्या पिढीकडे पोहोचविण्याचा प्रयत्न – मधुरा बाचल

सध्याच्या काळात तंत्रज्ञानाचा प्रभाव सर्वच क्षेत्रांवर पडत असताना, आता पारंपरिक खाद्यसंस्कृती जपण्यासाठीही डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर केला जात आहे. आपल्या आजी, आईकडून शिकलेले पारंपरिक पदार्थ, मराठी खाद्यसंस्कृती नव्या पिढीला डिजिटल भाषेत सांगणे काळाची गरज आहे, असे मधुरा’ज रेसिपी, चॅनेलच्या प्रमुख मधुरा बाचल यांनी सांगितले. टेक-वारी कार्यक्रमाच्या निमित्ताने मंत्रालयात “प्रवास पाककृतींचा” या विषयावर मधुरा बाचल यांचे […]