गडचिरोली येथील गोंडवाना भवन येथे आयटक प्रणित महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान यांचे हस्ते पार पडले, यावेळी मार्गदर्शन करतांना आपल्या न्याय हक्कांसाठी लढा देण्यासाठी संघटित होऊन संघर्ष करण्याची गरज असून मोदी सरकारच्या खाजगीकरण धोरणाविरुद्ध सुद्धा आवाज उठविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. किरसान यांनी केले. […]
ताज्या बातम्या
जपानमधील गुंतवणूकदारांकडून राज्यात मोठ्या गुंतवणूकीची शक्यता – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई दि.26: जपान सरकारच्या विशेष निमंत्रणावरूनजपान दौऱ्यावर गेलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज मुंबईत आगमन झाले. शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर तसेच अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. आगमनानंतर पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जपानच्या या दौऱ्यात जपान सरकारचे मंत्री, पंतप्रधानाचे सल्लागार, विविध कंपन्या, अधिकारी,प्रांतांचे गव्हर्नर, कंपन्या, एंजन्सी यांच्यासोबत आपण […]
व्यावसायिकांनी व्यापक समाज हितासाठी कार्य करावे : राज्यपाल रमेश बैस
‘तेरापंथ प्रोफेशनल फोरम’ या संस्थेतर्फे ‘लघुतेकडून प्रभुतेकडे’ या विषयावरील १६ वे राष्ट्रीय अधिवेशन मुंबई दि.26: जैन तेरापंथ समाजातील व्यावसायिकांनी आपल्या समाजातील युवकांच्या उन्नतीसाठी स्थापन केलेले आयएएस स्पर्धा प्रशिक्षण वर्ग तसेच इतर उपक्रमांचा लाभ सर्वच समाजांमधील युवकांना करुन द्यावा असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. व्यापक समाज हितासाठी कार्य केल्यास ते ‘लघुतेकडून प्रभुतेकडे’ […]
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सुपा व माळेगाव येथील नवीन पोलीस ठाणे इमारतीचे उद्घाटन
बारामती, दि २६:- पोलिसांच्या कार्यक्षमतेत आणि गुणवत्तेत वाढ व्हावी यासाठी त्यांना आवश्यक सुविधा देण्यात येत असून पोलिसांनी गुन्ह्यावर नियंत्रण राखण्यासाठी नागरिकांशी संवाद, समन्वय आणि सहकार्य ठेऊन काम करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. सुपा आणि माळेगाव येथील नवीन पोलीस ठाण्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा […]
ओडिगुडम येथील मल्ला विस्तारी टेकुलवार या अर्धांगवायू (लकवा) ग्रस्त रुग्णाला मिळाला आधार!
माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांच्या तर्फे आर्थिक मदत..! गडचिरोली जिल्ह्याचे विकास पुरुष आणि दानशूर राजे म्हणून सुपरिचित असणारे व्यक्तिमत्व म्हणजे अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी पालकमंत्री गडचिरोली जिल्हा राजे अंम्ब्रिशराव आत्राम हे आपल्या क्षेत्रातील जनतेला नेहमीच मदतीचा हात देत असतात आणि आपल्या मतदार संघातील गरीब व रोगाने ग्रासलेल्या आणि अडचणीत असलेल्या जनतेला नेहमीच आर्थिक […]
राज्याचे अन्न व औषध प्रशासन कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी घेतली तहसिल कार्यालय मुलचेरा येथे आढावा सभा
अधिकाऱ्यांना जाब विचारात तात्काळ समस्यांचे निराकरण करण्याचे दिले निर्देश मुलचेरा: तहसिल कार्यालय मुलचेरा येथे २६ ऑगस्ट रोजी कार्यालयातील सभागृहात अन्न व प्रशासन कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थित विविध विभागांची आढावा सभा घेण्यात आली,याप्रसंगी माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम,माजी प स सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम,माजी बांधकाम सभापती युधिष्ठिर बिश्वास,उपसरपंच महेंद्र बाबा आत्राम, तहसीलदार चेतन पाटील,गटविकास […]
माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी देवनगर येथील दिलीप बिश्वास यांच्या कुटुंबाला दिला आधार!
माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी देवनगर येथील दिलीप बिश्वास यांच्या कुटुंबाला दिला आधार! दानशूर राजेंनी पुन्हा एकदा गरजुला केली आर्थिक मदत..! मूलचेरा तालुक्यातील स्थानिक विवेकानंदपूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या देवनगर येथील रहवासी असलेले दिलीप बिश्वास हे काही दिवसापासून आजाराने ग्रस्त होते आणि ते मूलचेरा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत होते पण त्यांच्या प्रकृती […]
पीएम मोदींनी इस्रोच्या कार्यालयाला दिली भेट; शास्त्रज्ञांच अभिनंदन करत केल्या 3 मोठ्या घोषणा
चांद्रयान 3 मोहिमेच्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं. ब्रिक्स परिषदेसाठी मोदी दक्षिण आफ्रिकेत होते. त्यानंतर त्यांनी ग्रीसचा एकदिवसीय दौरा केला. हा दौरा आटोपून पंतप्रधान मोदी मायदेशी परतले. त्यांनी थेट इस्रोचं बंगळुरूतील मुख्यालय गाठलं. तिथे त्यांनी शास्त्रज्ञांशी संवाद साधला. इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांची पाठ थोपटून मोदींनी त्यांचं कौतुक केलं. स्पेस मिशनमध्ये टचडाऊन […]
महावितरणकडून ग्राहकांना जोराचा करंट; ग्राहकांना बसणार 885 रुपयांचा भुर्दंड
लाइट बिल चेकद्वारे भरताना वीज ग्राहकांना आता अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. चेक बाऊन्स झालाच तर ग्राहकाला तब्बल 885 रुपये भुर्दंड बसणार आहे. महावितरणने तसा निर्णय घेतला आहे. महावितरणचे हजारो ग्राहक त्यांचे लाइट बिल चेकद्वारे भरतात. मात्र, त्यापैकी हजारो चेक दरमहा बाऊन्स होतात. त्यामुळे महावितरणला अनेकदा त्रास सहन करावा लागतो. त्यावर तोडगा म्हणून महावितरणने पुढील […]
राज्यात येत्या काही दिवसात पडणार हलका पाऊस – हवामान विभागाचा अंदाज जारी
वामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्याच्या उर्वरित दिवसांत राज्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. एवढेच नव्हे तर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातही अशीच स्थिती राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. तर सप्टेंबरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे.