मुंबई, दि. ५ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दि. ०६ ऑगस्ट, २०२२ व दि. २० ऑगस्ट, २०२२ रोजी मुंबईसह औरंगाबाद, अमरावती, नागपूर, नाशिक व पुणे जिल्हा केंद्रांवर घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा – २०२१ मधील दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क या संवर्गाचा अंतिम निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. एकूण ११४ उमेदवारांची प्रस्तुत पदाकरिता […]
महाराष्ट्र
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेसाठी पूर्व प्रशिक्षण परीक्षा संपन्न
मुंबई, दि. ५ : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा सन २०२३ करिता भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रातील विनामूल्य प्रवेश परीक्षा राज्यातील सात केंद्रांवर ऑफलाईन पद्धतीने यशस्वीरित्या झाल्याची माहिती, राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेच्या संचालकांनी दिली. उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (सीॲक) मुंबईचे भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक, […]
महापरिनिर्वाण दिनानिमित्त उद्या माहितीपट, व्याख्यान आणि चित्रपटाचे आयोजन
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवरुन प्रसारण होणार मुंबई, दि. 5 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी, दि. ६ डिसेंबर २०२२ रोजी डॉ. आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित दोन माहितीपटांसह व्याख्यान आणि चित्रपटाचे प्रसारण माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सर्व समाजमाध्यमांवरून करण्यात येणार आहे. ‘महापुरुष डॉ.आंबेडकर’ या माहितीपटाचे प्रसारण सकाळी ११ वा. आणि ‘बाबासाहेब आंबेडकर’ या माहितीपटाचे […]
गोवर संसर्ग रोखण्यासाठी दहा कलमी कार्यक्रम राबवावा – आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या सूचना
अतिरिक्त लसीकरणही करणार पुणे, दि. 5 : गोवर संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका तसेच नगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबविण्याच्या सूचना आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी आज दिल्या. त्याचबरोबर दहा कलमी कार्यक्रम राबविण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले. पुणे येथे टास्क फोर्सची पहिली बैठक झाली. या बैठकीपूर्वी डॉ. सावंत यांनी टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंके आणि आरोग्य […]
वस्त्रोद्योग धोरणातून १० लाख रोजगार निर्मिती; ३६ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट – वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, दि. ५ : “वस्त्रोद्योगामध्ये भारताने पूर्वीपासूनच आपले स्थान निर्माण केले आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. पारंपरिक कापड निर्मितीपासून ते तांत्रिक वस्त्रोद्योगाकडे वाटचाल सुरु असून या क्षेत्रात रोजगार निर्मितीला मोठी संधी उपलब्ध आहे. राज्याच्या प्रस्तावित नवीन वस्त्रोद्योग धोरणात १० लाख रोजगार निर्मिती आणि ३६ हजार कोटी रुपयांची गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे”, अशी माहिती […]
गुजरातमधून आणलेले सिंह उद्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिवासात सोडणार
मुंबई, दि. 5 : गुजरातमधून आणलेली सिंहांची जोडी उद्या मंगळवारी 6 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिवासात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत सोडण्यात येणार आहेत. ही सिंहांची जोडी काही दिवसांपूर्वी गुजरातेतील सक्करबाग प्राणी संग्रहालयातून मुंबईत दाखल झाली आहे. हे दोन्ही सिंह प्रत्येकी दोन वर्षे वयाचे आहेत. मुंबईतील वातावरणाशी परिचित होण्यासाठी काही काळ जाऊ देण्यात आला […]
‘गोष्ट एका पैठणीची’ हृदयापर्यंत पोहोचणारा सिनेमा – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
महिला अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी ‘गोष्ट एका पैठणीची‘ चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन मुंबई, दि.५: साध्या सरळ गोष्टीतून मनाचे सुख नेमके काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. आपले सुख, हास्य कसे मिळवता येईल हाच या सिनेमाचा गाभा असल्याने हा सिनेमा आपल्या हृदयापर्यंत पोहोचतो असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर […]
अमृत महोत्सवी वर्षात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना गती द्यावी – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
नागपूरला ग्रामविकास विभागाचे भव्य ‘महारुद्र’ केंद्र उभारणार मुंबई, दि. 5 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने राज्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम व नियोजित कामांना गती देऊन दर्जा व वेळ यांस प्राधान्य द्यावे, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. या बैठकीत, ग्रामविकासाला गती प्राप्त करुन देणारी प्रबोधिनी नागपूरला उभारण्याचा व यासह अनेक महत्त्वाचे निर्णय […]
लम्पी चर्मरोग : गोवंशीय पशुधनाचे लसीकरण पूर्ण – पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची माहिती
मुंबई, दि. 5 : राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आजअखेर एकूण 144.12 लक्ष लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून एकूण 139.42 लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेल्या लसीकरणाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात 100 टक्के गोवंशीय पशुधनाचे लसीकरण झाले असल्याची माहिती पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे […]
महापरिनिर्वाण दिनानिमित्त ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. प्रकाश पवार यांचे व्याख्यान
मुंबई, दि. 5 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात महापरिनिर्वाण दिनानिमित्त ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. प्रकाश पवार यांचे व्याख्यान प्रसारित होणार आहे. मंगळवार, दि. 6 डिसेंबर 2022 रोजी सायं 7.30 वाजता हे व्याख्यान महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल. यू ट्यूब- https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR फेसबुक https://www.facebook.com/MahaDGIPR ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या […]