‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ अभियानाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ ठाणे दि. ३ (जिमाका) : ठाण्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून स्वच्छ आणि सुंदर ठाणे साकाराण्याकरिता लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ‘माझे ठाणे’ ही भावना मनात ठेवून उत्कृष्ट दर्जाचे काम करावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. ठाणे महानगरपालिकेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी […]
महाराष्ट्र
राज्यातील ‘या’ विभागात 2063 पदांची भरती होणार, राज्य सरकारची मोठी घोषणा…
महाराष्ट्रात आज स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाची स्थापना केल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयात लवकरच तब्बल 2063 पदांची भरती केली जाणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले. तसेच, या विभागासाठी 1143 कोटी रुपयांची निधी राज्य सरकारने दिल्याचे सांगितले. राज्यात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय असावे, अशी अनेकांची मागणी होती. जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून […]
केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून समाजाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य – हंसराज अहीर
अहीर यांनी स्वीकारला केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदाचा पदभार नवी दिल्ली, २ : केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून मागास समाजाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे, केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी सांगीतले. येथील केंद्रीय केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या कार्यालयात अध्यक्षपदाचा पदभार श्री. अहीर यांनी स्वीकारल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. श्री. अहीर म्हणाले की, देशभरात इतर मागासवर्गात […]
फेस्टिव्हलने शतकी वाटचाल करावी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या शुभेच्छा
पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन पुणे, दि. 2: पुणे हे महाराष्ट्रातील विचारवंतांचे शहर आहे. त्यामुळे या ठिकाणी लेखक वाचक महोत्सव होत असल्याचा आनंद आहे. आयोजकांनी स्वत:च्या समाधानासाठी सुरू केलेल्या पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलने शतकी वाटचाल करावी, अशा शुभेच्छा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी त्यांनी दिल्या. यशदा येथील सभागृहात विश्वकर्मा पब्लिकेशन्स आयोजित ‘१० व्या इंटरनॅशनल […]
पोलीस उपनिरीक्षक पदांच्या शारीरिक चाचणीनंतर चारच तासात निवड यादी, सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गतिमान कामगिरी मुंबई, दि. २ : पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांना पोलीस उपनिरीक्षक पदांसाठीच्या शारीरिक चाचणीनंतर चार तासातच जलदगतीने आणि उमेवारांना प्रतिक्षा करण्याची संधी न देता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निवड यादी व सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. पोलीस उपनिरीक्षक पदांसाठीच्या २५० पदांवर पदोन्नती देण्याकरीता विभागीय […]
महाराष्ट्र शाहीर पद्मश्री कृष्णराव साबळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कार्यक्रम निश्चितीसाठी सल्लागार समितीचे गठन
मुंबई, दि. २ : महाराष्ट्र शाहीर पद्मश्री कृष्णराव साबळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कार्यक्रम निश्चितीसाठी सल्लागार समितीचे गठन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्य सुधीर मुनगंटीवार हे या समितीचे अध्यक्ष असतील. या सल्लागार समितीमध्ये डॉ.प्रकाश खांडगे, शाहीर अंबादास तावरे, केदार शिंदे, भरत जाधव, प्रशांत दामले, नंदेश उमप, शाहीर देवानंद माळी, अंकुश चौधरी, कैलास महापदी, चारुशीला साबळे- वाच्छानी, […]
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत उद्या राज्यस्तरीय कार्यक्रम
मुंबई, दि.2 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत जागतिक दिव्यांग दिनानिमित्त उद्या राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. शनिवारी, 3 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता मुंबई विद्यापीठाचे दीक्षांत सभागृह, फोर्ट, मुंबई येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय […]
उद्योग उभारण्यासाठी देशात महाराष्ट्र अव्वल; यूके इंडिया बिझनेस कौन्सिलने प्रकाशित केला अहवाल
मुंबई, दि. 2 : भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये डुइंग बिझनेस मूल्यांकनात महाराष्ट्र अव्वल आहे; असे यूके इंडिया बिझनेस कौन्सिलने प्रकाशित केलेल्या अहवालात (नोव्हेंबर 2022) नमूद केले असल्याची माहिती, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिली आहे. ‘डुइंग बिझनेस इन इंडिया: द यूके पर्स्पेक्टिव्ह (2022 एडिशन)’ हा यूके इंडिया बिझनेस कौन्सिलचा आठवा […]
विघटनशील पदार्थांपासून बनविण्यात येणाऱ्या एकल वापर स्ट्रॉ, ताट, कप, प्लेट्स, काटे, चमचे यांच्या उत्पादन व वापरास परवानगी – सचिव प्रविण दराडे
मुंबई, दि. २ : महाराष्ट्र शासनाच्या प्लास्टिक बंदी धोरणाच्या अधिसूचनेमध्ये सुधारणा करण्यात आली असून, नव्या निर्णयामुळे विघटनशील (कंपोस्टेबल) पदार्थापासून बनविण्यात आलेले आणि एकदाच वापर होणाऱ्या स्ट्रॉ, ताट, कप, प्लेटस, ग्लासेस, काटे, चमचे, भांडे, वाडगा, कन्टेनर आदी वस्तूंच्या उत्पादनास अनुमती देण्यात आली आहे. अशी माहिती, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग सचिव प्रविण दराडे यांनी पत्रकार परिषदेत […]
डॉ.बाबासाहेब आंबेडकर पर्यटन सर्किटची नोंदणी सर्वांसाठी खुली; पर्यटनप्रेमींनी विनामूल्य सहलीचा लाभ घ्यावा – पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आवाहन
मुंबई, दि. 2 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांविषयी माहिती देण्यासाठी, पर्यटन संचालनालयाद्वारे तयार केलेले ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पर्यटन (टूर) सर्किट’ 3, 4, 7 आणि 8 डिसेंबर 2022, या तारखांना विनामूल्य आयोजित केले आहे. या सहलीचा पर्यटन प्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले. 26 […]