कोपरल्ली येथे भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न मूलचेरा :- आपल्या अहेरी विधानसभा क्षेत्रातील युवकांमध्ये क्रीडा स्पर्धेच्या बाबतीत भरपूर गुणवत्ता आणि अनेक गावात विविध क्रीडा स्पर्धा घेण्यासाठी आपण युवकांना सहकार्य करत असतो.क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपले युवक पुढे जावे आणि आपल भविष्य उज्वल करून या क्षेत्राच नावलौकिक करावे,तसेच युवकांनी क्रीडा स्पर्धेसोबत सामाजिक कार्यात पुढे […]
महाराष्ट्र
नवीन शैक्षणिक धोरणामुळे कुशल मनुष्यबळ निर्मिती होईल -पालकमंत्री चंद्रकांत पाटील
अमरावती, : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षणाच्या विविध संधी निर्माण होवून कौशल्य व व्यावहारिक शिक्षणाला प्राधान्य देण्यात येईल. या शैक्षणिक धोरणामुळे देशात मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळ निर्माण होऊन स्वयंरोजगारक्षम युवापिढी तयार होईल, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले. शासकीय तंत्रनिकेतन, अमरावती येथील सुरक्षाभिंतीचे भूमिपूजन पालकमंत्री […]
नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपीकांसह मालमत्ता नुकसानबाधितांना मदत वाटपासाठी १०६ कोटीवर निधीस मान्यता; निधी मंजुरीमुळे बाधितांना दिलासा – मंत्री अनिल पाटील
सन २०२० ते २०२२ या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानाकरिता बाधितांना मदत वाटपासाठी १०६ कोटी ६४ लाख ९४ हजार रूपये निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली असल्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याने या निर्णयामुळे बाधितांना जलद मदत मिळेल, असा […]
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
मुंबई, दि. २० : राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक आज विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षणासाठी घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक, धाडसी आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणारा असल्याचे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने संमत केल्याबद्दल सर्व सदस्यांचे आभार मानले. इतर मागास वर्ग (ओबीसी) अथवा इतर […]
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत २३.३७ कोटी रुपये वितरित
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत 23.37 कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना अपघातात अपंगत्त्व अथवा मृत्यू आल्यास त्यांना भरपाई देण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये सुधारणा करून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत […]
महासंस्कृती महोत्सवात रंगली हास्यजत्रा
गडचिरोली दि. 19 : महासंस्कृती महोत्सवात आज हास्यजत्राच्या चमूने धमाल विनोद रंगवित सर्वांना पोट धरून हसायला लावले. सांस्कृतिक कार्य संचालनालय व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पटांगणात सुरू असलेल्या पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाच्या चौथ्या दिवशी मतदार जनगृतीवरील पथनाट्य व हास्यजत्रा कार्यक्रम सादर करण्यात आला. आमदार देवराव होळी, अपर जिल्हाधिकारी धनाजी पाटील, सहाय्यक […]
माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी एम उषा प्रकल्पाचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे डिजिटल लॉंचिंग
या प्रकल्पाच्या माध्यमातून गोंडवाना विद्यापीठाला १०४ कोटींचा निधी गडचिरोली(गो. वि.)दि:१९ केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (पी एम- उषा) योजनेला मंजूरी दिली आहे, ज्याचा एकूण खर्च रु. १२,९२६.१० कोटी इतका आहे. राज्य सरकारी विद्यापीठे आणि महाविद्यालयांना समानता, प्रवेश आणि उत्कृष्टतेची उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करण्यासाठी निधी पुरविणे हा या योजनेचा उद्देश आहे. या […]
सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत १९ फेब्रुवारी ते ४ मार्च दरम्यान विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम
राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षिणता नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत दि. 19 फेब्रुवारी ते 4 मार्च 2024 दरम्यान राज्यभरात विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम राबविण्यात येणार आहे. या कालावधीत 1 लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठेवले आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. शासकीय रुग्णालय, मान्यता […]
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती विविध कार्यक्रमाने साजरी करा जिल्हाधिकारी संजय मीणा
गडचिरोली, दि.18: छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यावर्षी महाराजांच्या राज्याभिषेकाचे 350 वे वर्ष साजरे केले जात आहे. यानिमित्ताने 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती विविध कार्यक्रमाने जिल्हाभर मोठ्या उत्साहात आणि शांततेने साजरी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे 350 वे राज्याभिषेक वर्ष साजरे केले जात आहे. […]