ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

भारतीय संविधान दिनानिमित्त मंत्रालयात प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन

मुंबई, दि. 26 : भारतीय संविधान दिनानिमित्त मंत्रालयामध्ये आज भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करुन संविधान दिन साजरा करण्यात आला. माहिती व जनसंपर्क सचिव तथा महासंचालक जयश्री भोज यांच्यासह उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी प्रास्ताविकेचे वाचन केले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव ज.जी.वळवी, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव,  किरण देशपांडे,  सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक कक्ष अधिकारी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संविधान प्रास्ताविकेचे वाचन

समता पर्वचा प्रारंभ, सहभागाचे आवाहन मुंबई, दि. २६ :- संविधान दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन केले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले. यावेळी मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. संविधान दिन ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनापर्यंत समता पर्व साजरा करण्यात येत आहे. या पर्वानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

संविधान दिन : राजभवन येथे संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन

मुंबई, दि. 26 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी संविधान दिनानिमित्त राजभवन येथे राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिसांसमवेत भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे वाचन केले.  दरवर्षी दिनांक 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. 000 Governor reads out Preamble of Constitution Mumbai 26 : The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari read out the preamble […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

२६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना राज्यपाल, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची मानवंदना

मुंबई, दि. २६ : मुंबईवरील २६ नोव्हेंबर २००८ च्या दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करताना शहिद झालेल्या मुंबई पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी तसेच सुरक्षा दलातील वीरांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानवंदना दिली. तसेच त्यांच्या स्मृतीस्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सर्व मान्यवरांनी तसेच गणवेशातील अधिकारी व पोलीस जवानांनी हुतात्म्यांना सलामी दिली. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

संजय गांधी निराधार योजना

संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ६५ वर्षाखालील महिला-पुरुष, अनाथ मुले, अपंग,विधवा व घटस्फोटित महिला आणि गंभीर आजारांमुळे स्वतःचा चरितार्थ चालवू न शकणाऱ्या निराधार व्यक्तींना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य करण्यात येते. संजय गांधी निराधार योजना (महाराष्ट्र) लाभ मिळविण्यासाठी संजय गांधी निराधार योजना पात्रता, संजय गांधी निराधार योजना कागदपत्रे, संजय गांधी निराधार योजना अनुदान (आर्थिक लाभ) […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

कृषी यांत्रिकीकरण योजना ऑनलाईन अर्ज सुरु

उद्देश  – जेथे शेतीमधील उर्जेचा वापर कमी आहे अशा क्षेत्रामध्ये व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांपर्यंत कृषि यांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचविणे. प्रात्याक्षिके व मनुष्यबळ विकासाद्वारे सहभागीदारमध्ये जागरुकता निर्माण करणे. धोरण  – कृषि यंत्र/ अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे प्रशिक्षण व प्रात्यक्षिका द्वारे सहभागीदारांना कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहित करणे अनुदान या योजनेतून खालील दिलेल्या कृषि यंत्र / अवजारे यांच्या […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

वन विभाग भरती वेळापत्रक जाहीर

भुतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्याबाबत एकत्रित मार्गदर्शक सूचना सामान्य प्रशासन विभागाने दि. ४/५/२०२२ च्या शासन निर्णयान्वये निर्गमित केलेल्या आहेत. आता सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय दिनांक २१ / ११ / २०२२ अन्वये भुतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

महाराष्ट्रातील ३ हजार कोटी रूपयांच्या अतिरिक्त प्रकल्पांच्या प्रस्तावास मंजुरी मिळावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केंद्रीय अर्थसंकल्प २०२३-२४ च्या पूर्वतयारी बैठकीत विविध महत्त्वपूर्ण मागण्या नवी दिल्ली, दि. 25 : महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला गती मिळण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या सुमारे 3 हजार कोटी रुपयांच्या अतिरिक्त प्रकल्पांच्या प्रस्तावास मंजुरी प्रदान करावी, अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली येथे केली. येथील मानेकशॉ सेंटरमध्ये केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय अर्थसंकल्प : 2023-24 […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

नागरी सेवा परीक्षेच्या विनामूल्य प्रशिक्षणासाठी २७ नोव्हेंबरपर्यंत प्रवेश अर्ज करता येणार

मुंबई, दि. 25 : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या विनामूल्य प्रशिक्षण प्रवेश अर्जाची मुदत 27 नोव्हेंबर 2022 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC) मुंबईचे संचालक डॉ. के. एस जैन यांनी दिली आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई, भारतीय प्रशासकीय सेवा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

‘गुड समेरिटन’ पुरस्कार योजनेच्या आढाव्यासाठी राज्यस्तरीय देखरेख समिती

मुंबई दि. २५ : अपघातात बळी पडलेल्या व्यक्तीचे प्राण वाचविल्याबद्दल गुड समेरिटनला पुरस्कार देण्याच्या योजनेच्या योग्य अंमलबजावणीबाबत त्रैमासिक आढावा घेण्याकरिता राज्यस्तरीय देखरेख समितीची स्थापना गृह विभागाने शासन निर्णयाद्वारे केली आहे. केंद्र शासनाच्या रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाच्या मार्गदर्शनास अनुसरून मोटार वाहनांच्या जीवघेण्या अपघातात अपघातग्रस्त झालेल्या व्यक्तीस तत्काळ मदत करणाऱ्या आणि अपघाताच्या सुरुवातीच्या काही तासात अपघातग्रस्तांना […]