मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोल्हापूर ये सुमंगलम पंचभौतिक महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण व पंचगंगा नदीची आरती कोल्हापूर, दि.25 (जिमाका) : पर्यावरण रक्षण ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. कण्हेरी मठ येथील ‘पंचभौतिक महोत्सव’ यशस्वी होण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही देऊन पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारा हा महोत्सव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त […]
महाराष्ट्र
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डिस्टिलरी प्लांटचे उद्घाटन
कोल्हापूर दि २५ ( जिमाका) हातकणंगले तालुक्यातील नरंदे येथील शरद सहकारी साखर कारखान्याच्या ३० केएलपीडी क्षमतेच्या डिस्टिलरी प्लांटचे उद्घाटन तसेच १ लाख ६२ हजाराव्या साखर निर्मिती पोत्याचे पूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले . यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार प्रा . संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने , राज्य नियोजन मंडळाचे कार्य. अध्यक्ष राजेश क्षीरसागर […]
राज्याच्या सर्वसमावेशक विकासासाठी जनहिताचे निर्णय घेणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कोल्हापूर, दि.25 (जिमाका) : शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या कष्टाची जाणीव असणारे हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. सर्वसामान्यांचे हित जोपासण्यासाठी या शासनाने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असून यापुढेही राज्याच्या सर्वसमावेशक विकासासाठी जनहिताचे निर्णय घेतले जातील अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर आयोजित केलेल्या शेतकरी जनसंवाद मेळाव्यात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. […]
प्रधानमंत्री श्रम योगी मान धन
प्रधानमंत्री श्रम योगी मान धन PM Shram Yogi Maan Dhan योजनेसाठी आपण अर्ज करू शकतात या मध्ये सरकार कडून विविध व्यावसायिक लोकांना आणि असंघटीत कामगारांना पेन्शन सुरु होईल. असंघटित कामगारांसाठी श्रम आणि रोजगार मंत्रालयाची अंशदायी पेन्शन योजना आहे. प्रधान मंत्री श्रम योगी मानधन ही असंघटित कामगारांच्या वृद्धत्व संरक्षण आणि सामाजिक सुरक्षेसाठी एक सरकारी योजना आहे. , PM […]
बचत गट, लघु उद्योजकांनी उत्पादित केलेल्या मालाला आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात उत्स्फूर्त प्रतिसाद
नवी दिल्ली, 24 : बचत गट, लघु उद्योजकांनी उत्पादित केलेल्या मालाला आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची प्रतिक्रिया स्टॉल धारकांनी दिली. येथील प्रगती मैदानात 41 वा आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात सुरूवात 14 नोव्हेंबरपासून झाली आहे. महाराष्ट्र या यावर्षी ‘भागीदार राज्य’ म्हणून सहभागी झाला आहे. महाराष्ट्र दालन हे सर्वसामवेश असे दालन आहे. या दालनात बचत गट, लघु उद्योजक, विविध वस्तू उत्पादन समूह केंद्रांच्यावतीने लावलेला आहे. …असे आहे महाराष्ट्र दालन! महाराष्ट्र […]
जे.जे. कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मागण्या मार्गी
विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घ्यावे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील मुंबई, दि. 24 : जे जे कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंत्रालयात बैठक घेवून विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या मार्गी लावल्या आहेत. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी केले. जे जे कला महाविद्यालयातील […]
‘स्मार्ट’ प्रकल्प कृषी क्षेत्रासाठी गेम चेंजर ठरेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जागतिक बँकेच्या शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट मुंबई, दि. 24 : ‘स्मार्ट’ प्रकल्प हा राज्यातील कृषि क्षेत्रासाठी गेम चेंजर असणार आहे. या प्रकल्पादरम्यान विकसित होणाऱ्या लिंकेजेसमुळे शेती आणि शेतकरी अधिक समृद्ध होणार आहे. राज्यातील कृषिक्षेत्र वातावरणीय बदलांना अनुकूल करण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याचे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जागतिक बँकेचे भारतातील संचालक ऑगस्टे तानो कौमे यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस […]
खासगी क्षेत्रातील बांधकाम व्यावसायिकांनी परवडणाऱ्या घरांची निर्मिती करुन प्रत्येकाचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
क्रेडाई नाशिक मेट्रो शेल्टर २०२२ रिअल इस्टेट एक्स्पोचा शुभारंभ नाशिक, दि.24 (जिमाका वृत्तसेवा) – केंद्र आणि राज्य शासन परवडणाऱ्या घरांसाठी ग्रामीण व शहरी भागात घरकुलाच्या योजना राबवित आहे. शासनाप्रमाणेच खाजगी क्षेत्रातील बांधकाम व्यावसायिकांनी सामाजाचे आपण देणं लागतो या भावनेतून परवडणाऱ्या घरांची निर्मिती करावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. एक्स्पोच्या माध्यमातून सामान्य माणसाला त्याच्या […]
लम्पी चर्मरोग : नुकसान भरपाईपोटी राज्यात ७ हजार ९०९ पशुपालकांच्या खात्यावर २० कोटी रुपये जमा – पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह
मुंबई, दि. २४ : राज्यात लम्पी चर्मरोगामुळे ज्या पशुपालकांचे गोवंशीय पशुधन मृत्युमुखी पडले, अशा ७ हजार ९०९ पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाई म्हणून रु. २०.१२ कोटी रक्कम जमा करण्यात आली असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले. श्री. सिंह म्हणाले की, राज्यामध्ये दि. 24 नोव्हेंबर 2022 अखेर 34 जिल्ह्यांमधील एकूण 3741 संसर्गकेंद्रांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव […]
एमएडीसी आणि एमआयडीसीमार्फत विमानतळांचा विकास करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 24 : महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण (MADC) आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) यांच्यामार्फत संयुक्तरित्या विमानतळांचा विकास करावा. पुरंदर विमानतळासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने तातडीने जागेचे अधिग्रहण करावे; याचबरोबर अमरावती येथील बेलोरा विमानतळावर रात्री विमान उतरण्याची सुविधा तत्काळ सुरू करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. राज्यातील विविध विमानतळांच्या कामकाजासंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृह […]