मुंबई, दि. 23 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून १३ ऑगस्ट, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या “महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा- २०२१” या परीक्षेची अंतिम उत्तरतालिका २३ नोव्हेंबर २०२२ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्याची माहिती आयोगाने दिली आहे. १३ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा- २०२१ पेपर क्रमांक – २ (स्वतंत्र पेपर लिपिक-टंकलेखक)” (लिपिक-टंकलेखक, – दुय्यम निरीक्षक, […]
महाराष्ट्र
कर सहायकाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी उमेदवारांची यादी जाहीर
मुंबई, दि. 23 : महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा – 2021 मधील कर सहायक या संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अर्हताप्राप्त उमेदवारांची यादी ही निव्वळ टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी असून उमेदवारांच्या अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी पडताळणीअंती काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये, शिफारशीमध्ये बदल होऊ शकतो. खेळाडूसाठी आरक्षित […]
महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२१ ची सर्वसाधारण गुणवत्ता, तात्पुरती निवड यादी जाहीर
मुंबई, दि. 23 : महाराष्ट्र दुय्यम सेवा, अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा – २०२१ या परीक्षेतील राज्य कर निरीक्षक संवर्गाच्या ६०९ व सहायक कक्ष अधिकारी संवर्गाच्या १०० पदांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता व तात्पुरती निवड याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. त्याआधारे उमेदवारांकडून भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प मागविण्यात येत असल्याची माहिती, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने […]
स्वातंत्र्यसैनिकांचे निवृत्तीवेतन दुपटीने वाढविण्याचा शासन निर्णय जारी
मुंबई, दि. 23 : राज्य शासनामार्फत स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे जोडीदार यांना सध्या देण्यात येत असलेल्या दरमहा 10 हजार रुपये इतक्या निवृत्तीवेतनामध्ये 10 हजार रुपयांची वाढ करुन आता त्यांना दरमहा 20 हजार इतके निवृत्तीवेतन अदा करण्यात येणार आहे. ही वाढ 1 नोव्हेंबर, 2022 पासून लागू राहणार असल्याचे यासंदर्भातील शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. राज्यातील स्वातंत्र्यसैनिकांचे […]
राज्यात लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव कमी – आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह
मुंबई, दि. 23 : लम्पी हा केवळ गोवंश वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य चर्मरोग आहे. हा रोग कीटकांपासून पसरत असून गाई व बैलांपासून किंवा गाईच्या दुधापासून मानवामध्ये संक्रमित होत नाही. हा आजार फक्त पशुधनामध्ये आढळत असून, राज्यात लम्पी चर्म रोग प्रादुर्भाव कमी होत असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले. श्री.सिंह म्हणाले की, लम्पी चर्मरोग […]
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत २४ नोव्हेंबरला मुंबईत राज्यस्तरीय शुभारंभ
अमृत महाआवास अभियान २०२२-२३ मुंबई, दि. 23 : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर, 2022 रोजीच्या राष्ट्रीय आवास दिनापासून ते 31 मार्च 2023 या कालावधीत ‘अमृत महाआवास अभियान 2022-23’ राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ व महाआवास अभियान पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत 24 नोव्हेंबर, 2022 रोजी मुंबईतील […]
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोवारी शहीद स्मारकाला भेट देऊन वाहिली श्रद्धांजली
नागपूर दि. 23 : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथील झिरो माईल्स परिसरातील गोवारी शहीद स्मारकाला भेट देऊन श्रद्धांजली वाहिली. अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाव्यात या मागणीसाठी आजच्याच दिवशी 23 नोव्हेंबर रोजी चेंगराचेंगरी होऊन 114 गोवारी बांधव शहीद झाले होते. दरवर्षी विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून गोवारी बांधव या ठिकाणी अभिवादन सोहळ्याला उपस्थित असतात. आज 28 वा गोवारी शहीद स्मृती दिवस आहे. उपमुख्यमंत्री […]
‘ओरल हेल्थकेअर’साठी अधिकाधिक निधी उपलब्ध करणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दंत महाविद्यालयाला अत्याधुनिक वसतिगृह देणार नागपूर, दि. 23 : मध्य भारतामध्ये नागपूर व परिसरात मोठ्या प्रमाणात मौखिक आजार (ओरल डिसीज) व कर्क रोगाचे (कॅन्सरचे) आजार बळावले आहेत. या परिसरात ओरल हेल्थकेअरसाठी सर्वसमावेशक उपचार पद्धती अस्तित्वात असणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य शासन मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. शासकीय दंत महाविद्यालयातील […]
अकोला हे देशात दळणवळणाचे महत्त्वाचे केंद्र ठरेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अकोला-अकोट पॅसेंजर रेल्वे सेवेमुळे उत्तरेकडील राज्ये अकोल्याशी जोडण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल अकोला, दि.23 (जिमाका)-: अकोला रेल्वे स्थानक हे दक्षिण व उत्तरेकडील राज्यांना जोडणारे महत्त्वाचे स्थानक आहे. अकोला-अकोट पॅसेंजर रेल्वे सेवेमुळे उत्तरेकडील राज्ये अकोल्याशी जोडण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असून येत्याकाळात देशात हा जिल्हा दळणवळणाचे महत्त्वाचे केंद्र ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला. अकोला-अकोट पॅसेंजर (गाडी […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री साईबाबा समाधी दर्शन
अहमदनगर, दि. 23 :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक आज शिर्डी येथे श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा […]