मुंबई, दि. १७ : राज्यात दि. १७ सप्टेंबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या सेवा पंधरवडा कालावधीत विविध १४ सेवा आणि पोर्टलवरील प्रलंबित प्रकरणांचा ९५ टक्के निपटारा करण्यात आला आहे. या मोहिमेत एकूण ८३ लाख ५७ हजार २१८ प्रलंबित अर्जांपैकी ७९ लाख ४५ हजार २२ अर्ज निकाली काढण्यात आले. याबद्दल आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादरीकरण […]
महाराष्ट्र
वैद्यकीय मदत कक्ष पोहचवण्याचा संकल्प – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून चार महिन्यात ६ कोटी ४० लाखांची मदत राज्याच्या कानाकोपऱ्यातील गरजू रुग्णांपर्यंत मुंबई दि. १७ – जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हा शासनाचा प्राधान्याचा विषय आहे. यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातील गरजू रुग्णांपर्यंत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची मदत पोहचवण्याचा संकल्प करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. या निर्देशानुसार कक्षाचे कार्य सुरु […]
मंत्रिमंडळ बैठक
मुंबईतील भांडवली मूल्याधारित मालमत्ता दर यावर्षी न बदलण्याचा निर्णय कोविडमुळे झालेल्या विपरीत परिणामांमुळे मुंबईतील भांडवली मूल्याधारित मालमत्ता दर सध्या म्हणजे २०२२-२३ करिता न सुधारण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. याप्रमाणे मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ मधील कलम १५४(1ड) मध्ये सुधारणा करण्यात येईल. कोविडमुळे लागू केलेल्या टाळेबंदी तसेच प्रादुर्भावाच्या […]
स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे अभिवादन
मुंबई, दि. १७ : स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या १० व्या पुण्यतिथीनिमित्त विधानभवनात त्यांच्या प्रतिमेस विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ.राजेन्द्र भागवत, उपसभापतींचे खाजगी सचिव रविंद्र खेबुडकर, उपसचिव श्री. तारवी, स्वीय सहायक कौस्तुभ खांडेकर यांनीही पुष्प अर्पण करून दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली.
महिलांना न्यायालयीन लढाईत आयोग देणार साथ – राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर
महिला आयोगाच्या मुख्यालयातील कायदेविषयक सल्ला केंद्राचे उद्या लोकार्पण मुंबई दि. १७ : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या मुंबईतील मुख्यालयात महिलांना विनामूल्य कायदेविषयक सल्ला देणारे केंद्र (लीगल एड क्लिनिक) सुरु करण्यात येणार असून यामुळे पीडित महिलांना न्यायालयीन प्रकरणांमध्ये आयोगाकडून तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि तत्पर मदत मिळेल, असे आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले. दि. १८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ […]
वीज निर्मिती कंपनीत 661 जागांसाठी भरती, ‘या’ उमेदवारांसाठी नोकरीची संधी…
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड इथे लवकरच काही जागांसाठी भरती होत आहे. त्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. या भरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या.. एकूण जागा – 661 पुढील पदांसाठी भरती सहाय्यक अभियंता (Assistant Engineer AE) – 339 […]
शेतकरी, स्वातंत्र्यसैनिक, बेरोजगारांना दिलासा, मंत्रिमंडळाच्या बैठकीत 15 महत्वाचे निर्णय…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता.17) राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. राज्यातील जनतेसाठी सरकारने 15 महत्वपूर्ण निर्णय घेतले. त्यात राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या पेन्शनमध्ये सरकारने दुप्पटीने वाढ केली असून, सरकारच्या या निर्णयाचा लाभ राज्यातील 6229 स्वातंत्र्यसैनिकांना होणार आहे. राज्य शासनामार्फत 1965 पासून स्वातंत्र्य सैनिकांना पेन्शन दिली जात होती. स्वातंत्र्यसैनिकांना 2 ऑक्टोबर 2014 पासून दर महिन्याला 10 […]
लाभार्थी उद्योजकांच्या व्यवसायांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ
मुंबई, दि. 16 : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करणाऱ्या उद्योजकांच्या व्यवसायाचा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. नवउद्योजकांना त्यांच्या फूड व्हॅन आणि प्रवासी टॅक्सीच्या चाव्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आल्या. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह आदी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन
मुंबई, दि. 16 :- स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथील स्मृतिस्थळावर प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, अन्न […]
ऑटो रिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी नवीन भाडेदराप्रमाणे इलेक्ट्रॉनिक मीटर रिकॅलिब्रेट करून घेण्याचे आवाहन
मुंबई, दि. 16 : ऑटो रिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी वाहनाचे इलेक्ट्रॉनिक फेर मीटर 30 नोव्हेंबर, 2022 पर्यंत रिकॅलिब्रेट करुन घ्यावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) यांनी केले आहे. मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत ऑटो रिक्षा व टॅक्सी धारकांनी आकारावयाच्या भाडेदर वाढीस मान्यता दिली आहे. यामध्ये ऑटो रिक्षांसाठी प्रथम […]