मुंबई, दि. 14 : स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी पंडित नेहरु यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी विधानमंडळ सचिवालयाचे उपसचिव विलास आठवले, शिवदर्शन साठये, श्रीमती मेघना तळेकर, राजेश तारवी, संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी […]
महाराष्ट्र
उत्तराखंड व महाराष्ट्र येथील उद्योग संघटनांमध्ये उद्योग वाढीसाठी करार
राज्यपाल कोश्यारी व उत्तराखंडच्या उद्योग मंत्र्यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या महाराष्ट्र चेंबर व सिडकुल उत्पादक संस्था उत्तराखंड यांच्यात कराराचे आदानप्रदान मुंबई, दि. 14 : उत्तराखंड व महाराष्ट्र राज्यातील व्यापार संघटनांमध्ये सहकार्य वाढविण्याच्या दृष्टीने सोमवारी (दि. १४) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन येथे एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर तसेच […]
बालदिनाच्या सोहळ्यात मुख्यमंत्री रमले मुलांमध्ये..
पांढऱ्या रंगाचेच कपडे का, दाढी का ठेवता.. ? मुलांचे कुतूहल अन् मुख्यमंत्र्यांची खुमासदार उत्तरे मुंबई, दि. 14 : परळच्या क्षा.म.स. संस्थेच्या डॉ. शिरोडकर शाळेमधील विद्यार्थ्यांना आज बालदिनाची अनोखी भेट मिळाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रत्यक्षात शाळेत आले.. त्यांनी मुलांशी गप्पा मारल्या..त्यांच्या मनातल्या प्रश्नांना थेट उत्तरे देताना मी याठिकाणी मुख्यमंत्री म्हणून नाही तर तुमच्यातलाच एक होऊन शाळेच्या आठवणी […]
प्रतिभावंत अभिनेता हरपला – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 14 : मराठीसह हिंदी मालिका, सिनेमांमध्ये सहज अभिनय, शब्दांवरील पकड आणि स्पष्ट शब्दोच्चार यामुळे ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनामुळे प्रतिभावंत अभिनेता हरपला असल्याची भावना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. मंत्री श्री. मुनगंटीवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, मालिका आणि सिनेमांबरोबर अनेक नाटकांत काम केलेल्या श्री. शेंडे यांनी दोन दशकांहून अधिक […]
‘बालभारती’ चित्रपटाच्या ट्रेलरचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते अनावरण
मुंबई, दि. 14 – इंग्रजी ही संपर्काची भाषा असली तरीही ती सर्वस्व नाही. मातृभाषेतून दिलेले शिक्षण प्रभावी ठरते त्यामुळे शासन मातृभाषेतून शिक्षणाला प्रोत्साहन देत असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. ‘बालभारती’ हा चित्रपट याच विषयावर आधारित असल्याने तो लोकप्रिय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मंत्री श्री.केसरकर यांच्या हस्ते ‘बालभारती’ चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण करण्यात आले. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक […]
राज्यातील तरुणांना जलसंधारण तसेच पर्यावरणपूरक जीवनशैलीवर संशोधन आणि सामाजिक कार्याची संधी – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, दि. 14 : जलसंधारण तसेच पर्यावरण पूरक जीवनशैली यावर संशोधन करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी युनिसेफ आणि उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सात लाख तरुणांना हवामान बदलाचे योद्धे म्हणून कार्य करण्याची संधी आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. आज मुंबई विद्यापीठ येथे उच्च […]
गोद्री येथील कुंभ महोत्सवसाठी चोख व्यवस्था करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
मुंबई, दि. १४ : जळगाव जिल्ह्यातील गोद्री येथील अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा आणि लबाना-नायकडा समाज कुंभ २०२३ साठी देशभरातून अंदाजे 50 ते 60 हजार भाविक अपेक्षित आहेत. येणाऱ्या भाविकांसाठी सर्व व्यवस्था चोखपणे करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गोद्री येथे होणाऱ्या ‘अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा आणि लबाना-नायकडा समाज कुंभ २०२३‘ बाबत सह्याद्री अतिथगृह येथील पूर्वतयारी […]
केंद्र सरकारच्या मदतीने वेळेत योजना पूर्ण करण्यास प्राथमिकता – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जलशक्ती मंत्रालयाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्राने पथदर्शी भूमिका बजावावी – केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत मुंबई, दि. 14 : केंद्रीय जलशक्ती मंत्रालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या अंमलबजावणीमध्ये राज्याने प्रभावी आणि पथदर्शी भूमिका बजावावी, अशी अपेक्षा केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी व्यक्त केली. दरम्यान, केंद्र सरकारकडून विविध योजनांच्या पूर्ततेसाठी भरीव सहाय्य मिळत असून, राज्यातील विविध योजना केंद्र […]
पंडित नेहरू यांच्या जयंतीनिमित्त मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन कार्यक्रम
मुंबई, दि. 14 : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी पंडित नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सदानंद जाधव, सह निबंधक दुतोंडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
झोपडपट्टी पुनर्वसन वसाहतीमध्ये अंगणवाडीला जागा द्या – पालकमंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई, दि. 14 :- झोपडपट्टी पुनर्वसन वसाहतीमध्ये अंगणवाडीला जागा देण्याबाबत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने कार्यवाही करावी, असे निर्देश मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. अंधेरी पूर्व येथील के पूर्व वॉर्ड येथे झालेल्या ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमात पालकमंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते. यावेळी आमदार पराग आळवणी तसेच सर्व विभागांचे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्री श्री. लोढा म्हणाले […]