मुंबई, दि. १० : भारतीय नौदलाचे कामकाज कसे चालते, युद्धनौकांचे संचलन कसे होते, युद्धनौकेवरील जवान कशा पद्धतीने खडतर परिस्थितीत कामकाज करतात, शोध आणि बचाव कार्यात भारतीय नौदल कशा पद्धतीने योगदान देते याची प्रत्यक्ष पाहणी करण्याची संधी आज विधानमंडळ सदस्यांना मिळाली. भारतीय नौदलाचा पश्चिम विभाग आणि महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र यांच्यामार्फत […]
महाराष्ट्र
‘वन सेवा केंद्र’ सुरू करणार – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. १० : सामान्य नागरिकांना “आपले सरकार” पोर्टलच्या माध्यमातून अनेक सेवा सुविधा उपलब्ध होत असतात. याच धर्तीवर वन विभागामार्फत केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व सेवा एका छताखाली देण्यासाठी ‘वन सेवा केंद्र’ सुरू करण्याचे निर्देश वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. वन मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान नियामक मंडळाची बैठक आयोजित […]
आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणणार – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
पालघर दि. 10 : केंद्र व राज्य शासनाद्वारे आदिवासी समाजासाठी विविध योजना राबविल्या जातात. या योजना आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उपयोगी आहेत. आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणणार असल्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सांगितले. जव्हार येथील प्रगती प्रतिष्ठाणच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात तसेच वाडा येथे कातकरी समन्वय समितीमार्फत कातकरी समाजाचा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम […]
‘दिलखुलास’ कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव दिनेश सुराणा यांची मुलाखत
मुंबई, दि. 10 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव दिनेश सुराणा यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर शुक्रवार दि. 11, शनिवार दि. 12 , सोमवार दि. 14 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 […]
ग्रंथप्रेमींसाठी १६ नोव्हेंबरपासून दादरमध्ये ‘मुंबई शहर ग्रंथोत्सव’
मुंबई, दि. 10 : जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, मुंबई शहर आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मुंबई शहर ग्रंथोत्सव’ येत्या १६ व १७ नोव्हेंबर रोजी दादर (पू) येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात आयोजित करण्यात आला आहे. या ग्रंथोत्सवाच्या अध्यक्षस्थानी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे असतील व शालेय शिक्षण व मराठी भाषा तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते […]
राज्य लोकसेवा आयोगाच्या इमारतीसाठी २८२ कोटी २५ लाख रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता
मुंबई, दि. 10 : राज्य लोकसेवा आयोगाच्या नवी मुंबईतील बेलापूर येथील नियोजित इमारतीसाठी राज्य शासनाकडून सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. आता या इमारतीसाठी 282 कोटी 25 लाख रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून त्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आयोगाच्या कार्यालयासाठी प्रशासकीय इमारत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू होते आयोगाकडून सादर करण्यात आलेल्या […]
महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (मुख्य) परीक्षा – २०२० मधील संयुक्त पेपर- १ ची अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध
मुंबई, दि. १० : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दि. ११ सप्टेंबर २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (मुख्य) परीक्षा – २०२० मधील संयुक्त पेपर- १ या परीक्षेची अंतिम उत्तरतालिका दि. ०९ नोव्हेंबर, २०२२ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित परीक्षेच्या सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवांनी केले आहे.
राज्य कर निरीक्षक पेपर-२ या परीक्षेची अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध
मुंबई, दि. 10 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दि. २४ जुलै, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब (मुख्य) परीक्षा – २०२१ मधील राज्य कर निरीक्षक पेपर-२ या परीक्षेची अंतिम उत्तरतालिका दि. ०९ नोव्हेंबर, २०२२ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित परीक्षेच्या सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवांनी केले आहे.
भांडूप पश्चिम येथे तात्पुरत्या स्वरूपात कंटेनर ठेवून आरोग्य सुविधा देण्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांचे निर्देश
मुंबई, दि. १० : भांडूप पश्चिम येथे तात्पुरत्या स्वरूपात कंटेनर ठेवून मुंबई महापालिकेने नागरिकांना तात्काळ आरोग्य सुविधा द्याव्यात, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. भांडूप पश्चिम येथील के.ईस्ट वॉर्ड येथे झालेल्या ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमात पालकमंत्री श्री. लोढा बोलत होते. यावेळी खासदार मनोज कोटक, आमदार रमेश कोरगावकर तसेच सर्व विभागाचे अधिकारी आणि नागरिक […]
चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातील वनक्षेत्रात कृषी पंपांचे दिवसभराचे भारनियमन रद्द
मुंबई, दि. 10 : चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या मानव- वन्यजीव संघर्ष मोठ्या प्रमाणात असलेल्या जिल्ह्यांमध्ये दिवसा होणारे कृषीपंपांचे वीज भारनियमन रद्द करून सकाळी ६ ते संध्याकाळी ६ या वेळात कृषीपंपांना सलग वीजपुरवठा करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुधीर मुनगंटीवार […]