राज्यात आज बहुतांश भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. पुढील २४ तासात राज्यातील अनेक भागात पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाड्यासह विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. उत्तर बंगालच्या उपसागरावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र आज उत्तर पश्चिम आणि लगतच्या पश्चिम बंगालच्या उपसागरावर […]
महाराष्ट्र
आरोग्य क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाच्या उपयोगाने भारत जगात आदर्श ठरेल – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
‘आयुष्मान भव’ या १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान देशभरात राबविण्यात येणाऱ्या मोहिमेचा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ डिजिटल तंत्रज्ञान उपयोगात आणण्यामध्ये भारत उत्साहाने पुढे येत आहे. भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेची प्रशंसा जगात होत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर छोटे शहर आणि गावांना डिजिटल अर्थव्यवस्थेशी जोडण्यात भारत जगात उत्तम उदाहरण बनले आहे. सप्टेंबर 2021 मध्ये आयुष्मान भारत डिजिटल मिशनची […]
नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरावे – उपमुख्यमंत्री अजित पवार
नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी, आपत्तीपूर्व अंदाज येण्यासाठी शासन नावीन्यपूर्ण संकल्पना राबवीत आहे. कोकणातील सागरी किनारा क्षेत्रात पूर प्रतिबंधक बंधारे बांधणे, दरड कोसळण्यास अटकाव करणे, पूरप्रवण क्षेत्रात उपाययोजना करण्यासाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीयस्तरावर वापरण्यात येणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दरड प्रतिबंधक, धूप प्रतिबंधक कामांबाबत तांत्रिक सादरीकरण करण्यात आले. यावेळी […]
मॉरिशसचे प्रधानमंत्री प्रविंद जगन्नाथ यांचे मॉरिशसला प्रयाण
मॉरिशसचे प्रधानमंत्री प्रविंद जगन्नाथ यांचे मंगळवारी सकाळी मुंबईत आगमन झाले होते. एकदिवसीय दौऱ्यात त्यांनी विविध कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली. मुंबई भेटीनंतर मॉरिशसचे प्रधानमंत्री श्री. जगन्नाथ यांचे आज पहाटे मॉरिशसकडे प्रयाण झाले. मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन निरोप दिला. अतिरिक्त पोलीस आयुक्त, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त तसेच पोलीस व राजशिष्टाचार विभागाचे वरिष्ठ अधिकारी […]