गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

दिव्यांगांसाठी रोजगाराचे नवे दालन जिल्हा प्रशासन आणि यूथ 4 जॉब्स फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार

जिल्हा प्रशासन आणि यूथ 4 जॉब्स फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार गडचिरोली जिल्ह्यात दिव्यांग युवक-युवतींच्या कौशल्य विकासासाठी आणि रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. गडचिरोली जिल्हा प्रशासन आणि यूथ 4 जॉब्स फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला असून, या करारावर जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा व यूथ 4 जॉब्स तर्फे राज्य समन्वयक […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

कीर्तनाची परंपरा हा अमूल्य ठेवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सोनी मराठी वरील ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ कार्यक्रमाला शुभेच्छा मुंबई दि. २५ : कीर्तनाची परंपरा फार जुनी आहे. या परंपरेशी सर्व प्रकारचे लोक जोडले गेले. ही परंपरा छत्रपती शिवाजी महाराज यांनी जपली. स्वराज्याच्या स्थापनेमध्ये या संत शक्तीचा, कीर्तन शक्तीचा, प्रबोधनाचा प्रचंड मोठा वाटा आहे. म्हणूनच ही परंपरा अमूल्य ठेवा आहे, की जो पुढच्या पिढ्यांपर्यंत नेण्याचे काम करणे गरजेच आहे, असे […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

शांतता भंग करणाऱ्या दंगलखोरांविरुद्ध कडक कारवाई करा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संचारबंदी टप्प्याटप्याने हटवणार आक्षेपार्ह पोस्ट संदर्भात सहआरोपी करणार नुकसानीचे पंचनामे, तीन दिवसात मदत नागपूरची शांतता भंग होणार नाही, दक्षता घेणार दंगेखोरांकडून नुकसान भरपाई वसूल करणार नागपूर, दि. २२: नागपूर हे धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. या शहराची वेगळी संस्कृती आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशा प्रकारच्या घटना बरेच वर्षानंतर पहिल्यांदाच घडली आहे. भविष्यात अशा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

आरोग्य सेवेतील उमेदवारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नियुक्ती आदेश

 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, दंत तसेच आयुर्वेद महाविद्यालयासह संलग्न ९ रुग्णांलयातील गट ‘ड’ संवर्गातील ६८० पदांची सरळसेवेने भरती करण्यात आली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले. नियुक्त झालेल्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. रुग्णालयातील रुग्णांना उत्तम सेवा देण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात गट – ड  संवर्गातील मंजूर पदापैकी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मंजूर निधी मार्चपूर्वी शंभर टक्के खर्च करा – सह पालकमंत्री आशिष जयस्वाल यांचे यंत्रणेला आढावा सभेत निर्देश

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेला एकूण ६०४ कोटीचा निधी संबंधित यंत्रणेने मार्च अखेरपर्यंत शंभर टक्के खर्च करावा व लोककल्याणकारी योजनांसाठी प्राप्त निधी परत जाणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधि व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी दिले. जिल्हा वार्षिक योजना २०२४-२५ […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मुंबई इंडियन्स दुसऱ्यांदा ठरला WPL चॅम्पियन, हरमनप्रीत कौरच्या संघाने घडवला इतिहास; दिल्लीच्या पदरी पुन्हा निराशा

मुंबई इंडियन्सने दुसऱ्यांदा WPL चे जेतेपद पटकावले आहे. दिल्ली कॅपिटल्सविरूद्धच्या अटीतटीच्या सामन्यात मुंबईने दिल्लीवर ८ धावांनी थरारक विजय मिळवला. मुंबईच्या संपूर्ण संघाने उत्कृष्ट खेळी करत संघाच्या विजयात आपले योगदान दिले. दिल्लीच्या संघाने सलग तिसऱ्या वर्षी अंतिम फेरीत येऊन विजयापासून दूर राहिला आहे. दिल्लीच्या पदरी सलग तिसऱ्यांदा निराशा पडली आहे. मुंबई इंडियन्स संघ WPL मध्ये दोन […]

गडचिरोली महाराष्ट्र मुंबई विदर्भ

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा बंजारा रंगात रंगला होळी उत्सव

जिंतुर तालुक्यातील आडगाव तांड्यावर बंजारा समाजाच्या पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात होळी साजरी करण्यात आली. महिलांनी पारंपरिक वेषभूषेत मोहक नृत्य सादर करत होळीच्या रंगात रंग भरले. या अनोख्या उत्सवात राज्याच्या महिला व बालकल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनीही सहभाग घेतला. बंजारा समाजाच्या भगिनींच्या आग्रहास्तव त्यांनी पारंपरिक वेष परिधान करून नृत्याचा आनंद घेतला. पारंपरिक लेंगी गीते, नृत्य आणि रंगोत्सवाच्या जल्लोषात होळी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट गडचिरोली माईनिंग हब, नागपूर विमानतळ, स्थानिक स्वराज्य संस्थांना वित्त आयोगाचा निधी इत्यादींबाबत सकारात्मक चर्चा नवी दिल्ली, 13 मार्च महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेत, त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. राज्य सरकारने गडचिरोलीत पोलाद क्षेत्रात मोठा […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

शासनाच्या सर्व विभागांची माहिती ‘सीएम डॅश बोर्ड’वर लवकरच उपलब्ध- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘सीएम डॅश बोर्ड’ संकेतस्थळ आणि ‘स्वॅस’ माहिती प्रणालीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ मुंबई, दि. ११ : शासनाच्या सर्व विभागांची माहिती जनतेला ‘सीएम डॅश बोर्डवर’ लवकरच उपलब्ध होईल यामध्ये न्यायालय,रेरा तसेच कायदा व सुव्यवस्था या सेवांचाही समावेश करावा, ‘स्वॅस’ (SWaaS) या माहिती तंत्रज्ञान विभाग अधिकृत प्रणालीमध्ये ३४ विभागांच्या संकेतस्थळाच्या सेवांबरोबर शासनाच्या सर्व विभागांचाही लवकर समावेश करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]

गडचिरोली महाराष्ट्र मुंबई विदर्भ

अजित पवारांनी मांडला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प, ‘या’ आहेत 13 मोठ्या घोषणा

महाराष्ट्राचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. सुरुवातीलाच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले. अजित पवार अकराव्यांदा अर्थसंकल्प सादर करून, माजी अर्थमंत्री शेषराव वानखेडेंचा अर्थसंकल्प सादर करण्याच्या विक्रमाच्या जवळ पोहोचले. यापूर्वी शेषराव वानखेडे यांनी 13 वेळा, जयंत पाटील यांनी 10 वेळा आणि सुशीलकुमार शिंदे 9 वेळा अर्थसंकल्प सादर […]