वर्ष २०२२ चे क्रीडा पुरस्कार आणि वर्ष २०२१ चे तेनजिंग नोर्गे साहस पुरस्कार प्रदान नवी दिल्ली, दि. 30 : क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणा-या खेळाडूंना विविध श्रेणीतील राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराने आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यामध्ये वर्ष 2022 चे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार आणि वर्ष 2021 साठीचा तेनजिंग नोर्गे साहस पुरस्कार प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रातील दोन प्रशिक्षक आणि चार खेळाडूंचा यात […]
मुंबई
नाशिक येथील वैद्यकीय संस्थांच्या ३४८ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन
मुंबई, दि. 30 : नाशिक शहरातील लोकसंख्या विचारात घेऊन येथे वैद्यकीय महाविद्यालय आणि महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था स्थापन करण्यात आले आहे. या दोन्हींसाठी मंगळवारी शासन निर्णयान्वये 348 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले. नाशिक येथे वैद्यकीय महाविद्यालय आणि महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था […]
मच्छिमार परवाना नूतनीकरणासाठी आता ‘ना हरकत प्रमाणपत्रा’ची गरज नाही; मच्छिमार सहकारी संस्थांना शासनाचा दिलासा
मुंबई, दि. 30 : राज्यातील तलाव आणि धरणांमध्ये मासेमारी करणाऱ्या आणि दि. 3 जुलै 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना यापुढे परवाना नूतनीकरण करण्याकरिता विभागाच्या ‘ना हरकत प्रमाणपत्रा’ची गरज राहणार नाही, असा शासन आदेश आज राज्य शासनाने जारी केला आहे. या नवीन निर्णयामुळे राज्यातील मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर […]
महाराष्ट्र आणि ओंटारियो राज्य (कॅनडा) यांच्यात सामंजस्य करार; राज्यात विविध क्षेत्रात मोठी गुंतवणूक होणार
मुंबई, दि. 30 : महाराष्ट्र आणि कॅनडा देशातील ओंटारियो या दोन राज्यांमध्ये विविध क्षेत्रातील गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले. उद्योग मंत्री उदय सामंत व ओंटारियो राज्याचे (कॅनडा) आर्थिक विकास, रोजगार निर्मिती आणि व्यापार मंत्री व्हिक्टर फेडेली यांच्या स्वाक्षरीने हा सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार राज्यात माहिती तंत्रज्ञान, वित्त, मीडिया, ऑटोमोबाईल, अन्न प्रक्रिया, अंतराळ (एरोस्पेस) […]
विद्यापीठातील लैंगिक तक्रार प्रकरणातील फसवणूक रोखण्यासाठी यंत्रणा असावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई, दि. 30 : राज्यात अनेक ठिकाणी तरुणी, महिला यांच्यावर अत्याचाराच्या घटना घडतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात लैंगिक छळाची तक्रार प्रकरणाबाबत व सेफ कॅंपसबाबत अनेक सूचना व निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज दिले. महाविद्यालयीन व विद्यापीठातील अत्याचाराच्या घटनांवरील उपाययोजना आणि नागपूर विद्यापीठातील स्त्री अभ्यास केंद्राच्या अडचणी या विषयासंदर्भात विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या […]
डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्रद्धांजली
समाजमनाची नस अचूक पकडणारा साक्षेपी लेखक आपण गमावला मुंबई, दि. 30 : आपल्या लेखनातून समाजमनाची नस अचूक पकडणारा साक्षेपी लेखक आपण गमावला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस शोकसंदेशात म्हणतात, डॉ. नागनाथ कोतापल्ले यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. त्यांनी विविध लेखनप्रकारांतून मराठी साहित्य […]
‘राज्य सांस्कृतिक पुरस्कार’ निवड समितीची पुनर्रचना
मुंबई, दि. 30: सांस्कृतिक क्षेत्रात विशेष लक्षणीय कार्य करणाऱ्या कलावंतांना ‘राज्य सांस्कृतिक पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो. या सांस्कृतिक पुरस्कार निवड समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. या समितीमध्ये सांस्कृतिक कार्य मंत्री हे अध्यक्ष, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव हे सदस्य तर सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे सदस्य सचिव असतील. तसेच नाटक या कलाक्षेत्रासाठी सतिश पुळेकर, कंठसंगीतासाठी […]
माजी कुलगुरु प्राध्यापक नागनाथ कोतापल्ले यांच्या निधनाने अभिजात लेखणी शांत झाली – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 30 : ज्येष्ठ साहित्यिक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तसेच मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु प्राध्यापक नागनाथ कोतापल्ले यांच्या निधनाने अभिजात लेखणी शांत झाली आहे, या शब्दांत सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. श्री. मुनगंटीवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, कविता, कथा, दीर्घकथा, कादंबरी, ललित गद्य आणि समीक्षा […]
राज्यपालांच्या हस्ते गुरुनानक यांच्या जीवनकार्यावरील पुस्तकाचे प्रकाशन
मुंबई, दि. 30 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शीख समाजाचे संस्थापक व पहिले गुरु गुरुनानक यांच्या जीवनकार्यावरील ‘गुरुनानक देव के संवाद और समाज को मार्गदर्शन’ या पुस्तकाचे राजभवन मुंबई येथे आज प्रकाशन करण्यात आले. लेखक व क्रीडा सुविधा विकासक राजन खन्ना तसेच स्तंभलेखक व संशोधक डॉ. रतन शारदा हे या पुस्तकाचे लेखक आहेत. गुरुनानक यांच्या […]
नेदरलँड्सचे महावाणिज्य दूत बार्ट डे जाँग यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
राज्यातील गुंतवणुकीबाबत नेदरलँड उत्सुक मुंबई, दि. 30 : नेदरलँडचे महावाणिज्य दूत बार्ट डे जाँग यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या ‘सागर’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी उभय देशांतील व्यापार आणि महाराष्ट्रातील गुंतवणुकीबाबत चर्चा झाली. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले की, नेदरलँड आणि महाराष्ट्र यांचे घनिष्ठ संबंध आहेत. हे संबंध परदेशीय गुंतवणुकीत आणखी दृढ […]