ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

अभियंत्यांच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

मुंबई, दि. 28 : देशाच्या तसेच राज्याच्या विकासात अभियंत्यांचे मोलाचे योगदान आहे. शासकीय सेवेतील त्यांच्या सेवा नियम, भरती, पदोन्नती या मागण्यांबाबत निर्णय घेऊन त्याची अमंलबजावणी केली जाईल. अभियंत्यांच्या सर्व मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक विचार करेल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे राजपत्रित अभियंता संघटना महाराष्ट्र […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

सर्वांनी मिळून मुंबईचा विकास करूया – पालकमंत्री दीपक केसरकर

मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत २०२३-२४ च्या ४५० कोटींच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी मुंबई, दि. 28 :- मुंबई शहर जिल्ह्याच्या 2023-24 या आर्थिक वर्षासाठीच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या (सर्वसाधारण) 450 कोटी रूपयांच्या प्रारूप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. सन 2022-23 च्या 315 कोटींच्या तुलनेत यावर्षीच्या आराखड्यात 135 कोटींची वाढ करण्यात आली आहे. पालकमंत्री […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून आर्थिक मदतीसाठी मंजुरीची प्रक्रिया जलदगतीने व्हावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुख्यमंत्र्यांची वैद्यकीय सहायता निधी कार्यालयास भेट मुंबई, दि. 28 : वैद्यकीय उपचारासाठी गरजू रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्यात येणारी आर्थिक मदत तातडीने उपलब्ध होण्यासाठी मंजुरीची प्रक्रिया जलदगतीने करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर असलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या कार्यालयास मुख्यमंत्र्यांनी दुपारच्या सुमारस अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मुंबई महानगर क्षेत्रात (एमएमआर) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 28 : मुंबई हे जागतिक दर्जाचे स्वच्छ आणि सुंदर शहर व्हावे म्हणून भक्कमपणे पावले उचलली असून रस्ते, चौक, पदपथ, वाहतूक बेटं, उड्डाणपूल यांचे सुशोभीकरण केले जात आहे. मुंबईप्रमाणेच महानगर क्षेत्रात (एमएमआर) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पुढच्या टप्प्यात सुरू होणार असल्याची माहिती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. ‘मुंबई फर्स्ट’ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

विमानतळांच्या धावपट्ट्यांचे विस्तारीकरण करतानाच प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 28 : राज्यातील विमानतळांच्या धावपट्ट्यांचे विस्तारीकरण करतानाच प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड करण्यात यावे; जेणेकरून भविष्यात वैद्यकीय सहाय्यासाठी त्याचा उपयोग होईल. त्याचबरोबर गोसीखुर्द, कोयना, कोकण भागात पर्यटनाच्या दृष्टीने सीप्लेन सुरू करण्याबाबत आढावा घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची ८१ वी संचालक मंडळाची बैठक आज मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, महाराष्ट्र विमानतळ विकास […]

चंद्रपुर ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

बल्लारपूर रेल्वेस्थानक दुर्घटनेतील मृत महिलेच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत

मुंबई दि.२८- चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे रेल्वेस्थानकात झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले आहे. पादचारी पुलाचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नीलिमा रंगारी यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच लाख रुपये अर्थसहाय्य देण्याचीही घोषणा आज केली आहे. याशिवाय जे जखमी झाले असतील त्यांच्यावर योग्य ते उपचार शासकीय खर्चाने करण्याचे निर्देश त्यांनी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

 मुंबई, दि.28 – महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रांचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज मंत्रालय येथे झाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आमदार छगन भुजबळ, मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक , चित्रकार राजेश सावंत, तसेच इतर मान्यवर, अधिकारी उपस्थित होते. मंत्रालयातील मुख्य प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस लावण्यात आलेल्या या भव्य तैलचित्रांचे अनावरण करून […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

उस्मानाबाद जिल्हा समृध्द आणि निरोगी असावा हा शासनाचा मानस – पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत

परंडा येथील महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन उस्मानाबाद,दि.27(जिमाका) :- उस्मानाबाद जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्यासाठी हे सर्वं रोगाचे निदान एकाच ठिकाणी व्हावे म्हणून या महाआरोग्य शिबिरात देश विदेशातील मोठे डॉक्टर्स उपस्थित आहेत.  प्राथमिक स्वरुपांच्या चाचण्या या ठिकाणी होत आहेत. त्यानंतर प्राथमिक उपचार आणि औषध याच ठिकाणी दिली जात आहेत. जर काही गंभीर आजार असतील त्यांच्या सर्व चाचण्या व सर्व परीक्षणे […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

शास्त्रशुद्ध बांबू लागवड शेतकऱ्यांसाठी कल्पवृक्ष सिद्ध होऊ शकते – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

ॲग्रोव्हीजन कृषी प्रदर्शनात वनमंत्र्यांचे मार्गदर्शन नागपूर दि.२७ : विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये बांबू लागवडीला वाव आहे. महाराष्ट्रातही अनेक जिल्ह्यांमध्ये ही बाब शक्य आहे. बांबू संदर्भातील नवनवीन संशोधन सुरू असून शास्त्रशुद्ध बांबू लागवड शेतकऱ्यांसाठी कल्पवृक्ष सिद्ध होऊ शकते, असे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, महामार्ग मंत्री तथा नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात ॲग्रोव्हीजन हे मध्यभारतातील […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

नंदुरबार जिल्ह्यातील बिबट्याच्या हल्ल्यातील मृत महिलेच्या वारसांना दहा लाख देण्याचे विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

मुंबई, दि. २७ :  नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील डाबचा मालीआंबा येथील मोगराबाई रुमा तडवी या महिलेचा १९ नोव्हेंबर रोजी बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. श्रीमती तडवी यांच्या कायदेशीर वारसांना दहा लाख रु. रक्कम लवकरात लवकर द्यावे, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी वन विभागास दिले आहेत. या महिलेच्या कुटुंबियांना वन विभागाकडून दिली जाणारे आर्थिक […]