ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये ‘हेरिटेज वॉक’ सुरू

पर्यटकांना मिळणार १६० वर्षे जुन्या वास्तूला भेट देण्याची संधी – पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा मुंबई, दि. २७ : मुंबईतील हायकोर्ट हेरिटेज वॉक प्रमाणेच वास्तूंचा समृद्ध वारसा, इतिहास आणि वास्तू याविषयी जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने पर्यटन संचालनालयाने मुंबईतील हाफकिन इन्स्टिट्यूट येथे हेरिटेज वॉक सुरू केला आहे. या उपक्रमाची सुरुवात आज २७ नोव्हेंबर पासून करण्यात येत आहे. हा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

विठ्ठल उमपांनी समाजाला दिलेली ऊर्जा जगातील कुठलीही औषध कंपनी देऊ शकत नाही – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

मृद्गंध पुरस्कारांचे वितरण मुंबई, दि. 26 : शाहिर विठ्ठल उमप यांनी आपल्या शाहिरीतून समाजात निर्माण केलेली ऊर्जा जगातील कुठलीही औषध कंपनी निर्माण करू शकत नाही, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. 12 व्या शाहिर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोहाच्या वेळी मृद्गंध पुरस्कार 2022 चे वितरण करतांना ते बोलत होते. यावेळी आमदार आशीष शेलार, […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

लम्पी चर्मरोग : नुकसान भरपाईपोटी राज्यात पशुपालकांच्या खात्यांवर २५.३१ कोटी रुपये जमा – पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह

मुंबई, दि. २६ : राज्यात लम्पी चर्मरोगामुळे ज्या पशुपालकांचे गोवंशीय पशुधन मृत्युमुखी पडले,अशा पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाई म्हणून रु. २५.३१ कोटी रक्कम जमा करण्यात आली असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले. श्री. सिंह म्हणाले, राज्यामध्ये दि. 26.11.2022 अखेर 34 जिल्ह्यांमधील एकूण 3775 संसर्गकेंद्रांमध्ये लंपी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण 309064 बाधित […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

डॉ. कांता नलावडे साहित्य क्षेत्रातही भरारी घेतील – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

डॉ. कांता नलावडे यांच्या ‘भरारी’ कवितासंग्रहाचे प्रकाशन मुंबई, दि.26 : भाजपच्या विविध राष्ट्रीय पदांवर आणि नंतर आमदार असताना आपल्या भाषणातून, आपल्या कार्यातून लोकांमध्ये ओळख निर्माण करणाऱ्या डॉ. कांता नलावडे या येणाऱ्या काळात साहित्य क्षेत्रातही भरारी घेतील, असा विश्वास सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. राजकारण क्षणभंगुर तर साहित्य शाश्वत असते, असेही ते म्हणाले. माजी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संपन्नतेचे उदाहरण जगाला दिले जाईल – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या हस्ते दृकश्राव्य केंद्राचे उद्घाटन मुंबई, दि.२६ : महाराष्ट्राला संपन्न असा ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. या संपन्न अशा वारसाचे जतन आणि जोपासना करून येणाऱ्या काळात अख्या जगामध्ये महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसाचे उदाहरण दिले जाईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभागाच्या दृकश्राव्य केंद्राचे “स्वरालय” दालनात आज उद्घाटन केले. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

कौशल्य विकास, रोजगारविषयक विविध कार्यक्रम प्रभावीपणे राबवू – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अनुसूचित जाती, नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांसाठी चेंबूर येथे आयटीआय इमारतीचे उद्घाटन संपन्न मुंबई, दि. 26 : जगामध्ये सध्या सर्वात जास्त मागणी ही कौशल्याला आहे. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांसाठी आज मुंबईत सुरू करण्यात आलेल्या आयटीआयमधून सर्वांना संधीची समानता मिळू शकेल. तरुणांना कौशल्य आणि रोजगार मिळवून देण्यासाठी येत्या काळात शासनामार्फत विविध कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येतील, असे प्रतिपादन […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पर्यटन सर्किटची व्याप्ती वाढवणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संविधान दिनाचे औचित्य साधून ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पर्यटन टूर सर्किट’चे उद्घाटन मुंबई, दि.26 : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पर्यटन सर्किटच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन कार्य, त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. या पर्यटन सर्किटची व्याप्ती वाढवून शालेय स्तरावर देखील सहलींचे आयोजन करण्याचा मानस आहे, असे उद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. चेंबूर येथील फाईन आर्ट […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

२ डिसेंबरला नियोजित संयुक्त चाळणी परीक्षा – २०२२ प्रवेश प्रमाणपत्र एमपीएससीच्या संकेतस्थळावर उपलब्ध

मुंबई, दि. २६ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शुक्रवार, दिनांक ०२ डिसेंबर २०२२ रोजी नियोजित विविध विभागातील प्रशासकीय अधिकारी, सहायक प्रशासकीय अधिकारी व सहायक प्रशासन अधिकारी या सहा संवर्गाच्या संगणक प्रणालीवर आधारित संयुक्त चाळणी परीक्षेकरीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन  अर्जप्रणालीच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावरील त्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोडकरुन प्रिंट […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पोलिसांचा सत्कार

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना आदरांजली वाहिली मुंबई, दि. 26 : २६/११  च्या दहशतवादी हल्ल्यावेळी धाडसी कामगिरी बजावलेल्या पोलीस कर्मचारी, बेस्ट कर्मचारी, सफाई कर्मचाऱ्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सन्मानित करण्यात आले. पोलिस बॉइज चॅरीटेबल ट्रस्ट संचलित महाराष्ट्र पोलिस बॉइज संघटनेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही गेट वे ऑफ इंडिया येथे २६/११ हल्ल्यातील शहीद वीरांच्या स्मरणार्थ श्रद्धांजलीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

विक्रम गोखले यांच्या निधनाने एक निष्ठावान कलातपस्वी हरपला – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 26 : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने एक निष्ठावान कलातपस्वी हरपल्याची शोकभावना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. मराठी रंगभूमी, मराठी व हिंदी चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमात त्यांनी आपल्या सशक्त अभिनयाच्या बळावर आपले कर्तृत्व सिद्ध केले. भारदस्त आवाजाची देणगी लाभलेल्या विक्रम गोखले यांनी अभिनयासोबत लेखन व दिग्दर्शन देखील केले […]