ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

‘गुड समेरिटन’ पुरस्कार योजनेच्या आढाव्यासाठी राज्यस्तरीय देखरेख समिती

मुंबई दि. २५ : अपघातात बळी पडलेल्या व्यक्तीचे प्राण वाचविल्याबद्दल गुड समेरिटनला पुरस्कार देण्याच्या योजनेच्या योग्य अंमलबजावणीबाबत त्रैमासिक आढावा घेण्याकरिता राज्यस्तरीय देखरेख समितीची स्थापना गृह विभागाने शासन निर्णयाद्वारे केली आहे. केंद्र शासनाच्या रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाच्या मार्गदर्शनास अनुसरून मोटार वाहनांच्या जीवघेण्या अपघातात अपघातग्रस्त झालेल्या व्यक्तीस तत्काळ मदत करणाऱ्या आणि अपघाताच्या सुरुवातीच्या काही तासात अपघातग्रस्तांना […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

अनुसूचित जाती, नवबौद्ध मुला-मुलींसाठी चेंबूर येथे शासकीय उच्चस्तर आयटीआय नूतन इमारतीचे संविधान दिनी उद्घाटन

मुंबई, दि. 25 : अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील मुला-मुलींसाठी मुंबई येथे विभागस्तरीय उच्चस्तर औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) सुरू होत असून यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत मुंबई उपनगर जिल्ह्यात चेंबूर येथे नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. संविधान दिनाचे औचित्य साधून 26 नोव्हेंबर 2022 रोजी या इमारतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

राज्यात उद्यापासून ६ डिसेंबरपर्यंत ‘समता पर्व’चे आयोजन

मुंबई, दि. २५ : राज्यात २६ नोव्हेंबर संविधान दिनापासून ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनापर्यंत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ‘समता पर्व’ चे आयोजन केले जाणार आहे. या कालावधीत राज्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. दि. २५ नोव्हेंबर रोजी समता पर्वाविषयी पत्रकार परिषदेचे आयोजन, दि.२६ नोव्हेंबर रोजी प्रभात फेरी, संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन व तज्ज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शन, जिल्हास्तरावर पालकमंत्री, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचे […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन तसेच बौद्ध लेण्यांवर आधारित टूर सर्किटचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या होणार उद्घाटन – पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि. 25 : “भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत मुंबईतील महत्त्वाची स्थळे व बौद्ध लेण्यांवर आधारित टूर सर्कीट तयार करण्यात आले आहे. संविधान दिनानिमित्ताने 26 नोव्हेंबर रोजी पर्यटन संचालनालयाने नव्याने तयार केलेल्या ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीट’ चे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चेंबूरच्या दि फाईन आर्टस् सोसायटी येथे […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

जागतिक बँकेच्या संचालकांनी घेतली कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची भेट

मुंबई, दि. 25 : जागतिक बँकेचे भारतातील संचालक ऑगस्टे तानो कौमे यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने आज कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांची मंत्रालयात भेट घेतली. जागतिक बँकेच्या सहयोगातून राज्यात महाराष्ट्र कौशल्य विकास प्रकल्प राबविण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. जागतिक बँकेच्या प्रमुख शिक्षण तज्ज्ञ शबनम सिन्हा यांच्यासह कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातील वरिष्ठ […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

वैद्यकीय शिक्षण विभागातील गट ब, क संवर्गातील साडेचार हजार पदे भरणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन

मुंबई, दि. २५ : वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिनस्थ सरळसेवेची गट-ब (अराजपत्रित), गट-क तांत्रिक / अतांत्रिक व परिचर्या संवर्गातील साधारणत: ४ हजार ५०० पदे भरण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी दिली. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिनस्थ असलेल्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, आयुष संचालनालय, अन्न व औषध प्रशासन […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

रस्ते अधिक दर्जेदार होण्यासाठी नाविन्यपूर्ण संकल्पना राबवा – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन

ग्रामसडक योजनेचा राज्यस्तरीय आढावा मुंबई, दि 25 : ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून होणारे रस्ते अधिक दर्जेदार होण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्यात येत आहेत. यात गुणवत्तेबाबत कुठलीही तडजोड करू नये. ग्रामीण भागामध्ये रस्त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीष महाजन यांनी केले. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

कृषी महोत्सवात मुख्यमंत्र्यांकडून लम्पी चर्मरोग नियंत्रणाबाबत चर्चा

सातारा, दि. २५ : देशाचे माजी उपपंतप्रधान स्व.यशवंतरावजी चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराड शेती उत्पन्न बाजार समिती आणि जिल्हा परिषद सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषि, औद्योगिक व पशू पक्षी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पशुसंवर्धन विभागाच्या स्टॉलला भेट देऊन सातारा जिल्ह्यातील गाय वर्गातील लम्पी चर्मरोगाच्या प्रादुर्भाव नियंत्रणाबाबत माहिती घेऊन […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

देशावर हल्ला करणाऱ्यांना सर्व शक्तीनिशी नेस्तनाबूत करु – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई दि 25:- देशाची आर्थिक राजधानी आणि देशाच्या सार्वभौमत्वावर झालेला 26/11 चा हल्ला हा कधीही भरून न येणारा घाव आहे. या कटू आठवणी न मिटणाऱ्या आहेत. मात्र असे दुःसाहस करणाऱ्यांना सर्वशक्तीनिशी नेस्तनाबूत केले जाईल हे देशाने कृतीतून दाखवून दिले आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. हॉटेल ताजमहल पॅलेस येथे आयोजित ’26/11 मुंबई संकल्प’ या कार्यक्रमात श्री.फडणवीस बोलत होते. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मुंबईवर […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

सीमा भागातील ८६५ गावांमधील संस्था, संघटनांना बळ देण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय

मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीतून अर्थसहाय करण्याबाबतचा शासन निर्णय जारी मुंबई, दि. २५ : महाराष्ट्र- कर्नाटक सीमा भागातील विविध संस्था आणि संघटना यांना मोठं बळ मिळणार आहे. या भागातील ८६५ गावांमधील सामाजिक, शैक्षणिक, धर्मादाय, सांस्कृतिक तसेच निम सार्वजनिक संस्था व संघटनांना देखील मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीतून अर्थसहाय देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीमाप्रश्नी अलिकडेच सह्याद्री अतिथीगृहात […]