महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आलं आहे. महायुतीच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच १५ डिसेंबरला पार पडला. तर खातेवाटप २१ डिसेंबरला पार पडलं. २१ डिसेंबरला अधिवेशनही संपलं आहे. आता सगळ्या मंत्र्यांना दालनांचं वाटप करण्यात आलं आहे. मंत्रालयात कुणाला कुठलं दालन असेल ते आपण जाणून घेऊ. कॅबिनेट मंत्री कुणाला कुठली दालनं, कशी आहे विभागणी? १) चंद्रशेखर बावनकुळे – दालन […]
राज्य
‘विजय दिवस अल्ट्रा मॅरेथॉन’ राज्यपालांच्या उपस्थितीत रवाना
मुंबई, नाशिक, अहिल्यानगर, कोल्हापूर, पुणे मार्गे मॅरेथॉन धावणार ५४ व्या विजय दिवसानिमित्त सैन्य दलातर्फे अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजन; राज्यपालांचे हुतात्म्यांना अभिवादन मुंबई, दि. ६: महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी 54 व्या विजय दिवसानिमित्त आयोजित ‘विजय दिवस अल्ट्रा मॅरेथॉन’ला आज कुलाबा येथील शहीद स्मारक येथून झेंडी दाखवून रवाना केले. स्थलसेनेच्या महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा क्षेत्र मुख्यालयातर्फे आयोजित ही […]
मधुकरराव पिचड यांच्या निधनाने कर्मसिद्धांताचा उपासक गमावला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. ६: ज्येष्ठ राजकारणी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या निधनाने आदिवासी समाजासाठी अहोरात्र झटणारा आणि कर्मसिद्धांताचा उपासक आपण गमावला आहे, अशी शोकसंवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. आपल्या शोकसंदेशात ते म्हणतात की, मधुकरराव पिचड यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषदेपासून राजकारणाची सुरुवात करत प्रदीर्घ काळ त्यांनी राज्य विधिमंडळात प्रतिनिधीत्व […]
आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन साजरा जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाद्वारे विविध लाभाचे वाटप
गडचिरोली दि ३: ३ डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन म्हणून राज्यभा-यात विविध कार्यक्रम आयोजित साजरा केला जातो. जागतिक दिव्यांग दिनाची या वर्षीची संकल्पना ‘सर्वसमावेशक आणि शाश्वत भविष्यासाठी दिव्यांग व्यक्तींचे नेतृत्व वाढवणे’ ही आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ अन्वये समान संधी व संपूर्ण सहभाग या धोरणात्मक निकषाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी आणि जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या […]
वाहन वितरकांच्या स्तरावरच होणार हलक्या मालवाहू वाहनांची ऑनलाईन नोंदणी
हलक्या मालवाहू वाहनांची नोंदणी फेसलेस (चेहरा विरहित) स्वरूपात वाहन वितरक यांच्या स्तरावरच ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा २८ नोव्हेंबरपासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यभरातील सर्व परिवहन कार्यालयांसाठी ही सुविधा कार्यान्वित असणार आहे. तसेच ही सुविधा सर्व संबंधित वाहन वितरकांकडे उपलब्ध असणार आहे. ही सेवा पूर्णपणे फेसलेस (चेहरा विरहित) स्वरुपाची असून वाहन वितरकास त्यासाठी www.parivahan.gov.in या संकेतस्थळावर वाहन […]
२५ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात या मुद्द्यावरुन विरोध आक्रमक होणार
महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुका पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी न्यूयॉर्क टाइम्समध्ये सौरऊर्जेचा कराराबाबत बातमी आल्याने विरोधकांना मोठा मुद्दा मिळाला आहे. २५ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात या मुद्द्यावरुन विरोध आक्रमक होणार आहेत. काँग्रेसने हा मुद्दा पकडण्यात दिरंगाई केली नाही. या करारातील भ्रष्टाचाराबाबत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी […]
निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांसाठीची केंद्रीय निवडणूक आयोगाने दि. 15 ऑक्टोबर पासून आदर्श (Adarsh Aachar Sanhita) आचारसंहिता लागू केली. नि:पक्षपाती वातावरणात निवडणूक पार पाडणे हा आदर्श (Adarsh Aachar Sanhita) आचारसंहितेचा भाग आहे. राज्यघटनेनुसार आपल्या देशात बहुपक्षीय लोकशाही अस्तित्वात आहे आणि कोणताही नागरिक ठरवून दिलेले निकष पूर्ण करीत असल्यास तो निवडणुकीस उभे राहू शकतो. अशा निवडणुकीसाठी उभे राहिलेले उमेदवार आणि […]
(RPF Bharti) रेल्वे सुरक्षा दलात 4660 जागांसाठी भरती
RPF Bharti 2024. The Railway Protection Force is a security force of India entrusted with protecting railway passengers, passenger area and railway property of the Indian Railways. RPF Recruitment 2014 (RPF Bharti 2024) for 4660 Sub Inspector & Constable Posts. जाहिरात क्र.: CEN RPF 01/2024 & CEN RPF 02/2024 Total: 4660 जागा पदाचे नाव & तपशील: […]
(Central Bank of India) सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 3000 जागांसाठी भरती
Central Bank of India Apprentice Bharti 2024. Central Bank of India Apprentice Recruitment 2024, (Central Bank of India Bharti 2024) for 3000 Apprentice Posts. प्रवेशपत्र निकाल जाहिरात क्र.: — Total: 3000 जागा पदाचे नाव: अप्रेंटिस (Apprentice) शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी. वयाची अट: 31 मार्च 2024 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] वय […]
*हत्तींनंतर रानगव्यांचा धुडगूस; रबी धान केले बुंध्यापासून फस्त, शेतकऱ्यांचे नुकसान*
गडचिरोली: देसाईगंजच्या पूर्वेकडील भागात वाघांची दहशत अजूनही कायम आहे. सोबतच रानटी हत्तींच्या कळपाने शेतकऱ्यांसह वनविभागास सुद्धा जेरीस आणले आहे. हत्तींची दहशत कायम असतानाच आता १२ ते १३ च्या संख्येत असलेला रानगव्यांचा कळप देखील शेतातील धान पिके बुंध्यापासून फस्त करीत आहे. शुक्रवार ८ फेब्रुवारी रोजी पिंपळगाव- विहीरगाव जंगलपरिसरातील पिके रानगव्यांच्या कळपाने फस्त केली. पिंपळगाव- विहीरगाव जंगलाला […]