लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाव्दारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात दि.19 एप्रिल ते 20 मे, 2024 या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे.या निवडणुकीचीआदर्श आचारसंहिता आजपासून लागू झाली असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. मंत्रालय विधीमंडळ वार्ताहार संघ येथे लोकसभा निवडणूक […]
विदर्भ
लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर : देशभरात सात टप्प्यात होणार मतदान
नवी दिल्ली, 16 मार्च : देशात 18 व्या लोकसभेसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सर्व राज्ये व केंद्रशासीत प्रदेशांमध्ये दिनांक 19 एप्रिल ते 1 जून 2024 या कालावधीत एकूण सात टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार असून 4 जून 2024 रोजी निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्रात १९ एप्रिल ते २० मे दरम्यान पहिल्या ५ टप्प्यांमध्ये […]
राज्याच्या चौथ्या महिला धोरणाच्या अंमलबजावणीचा पहिला मान ‘अजित आशाताई अनंतराव पवार’ यांना
यंदाच्या जागतिक महिला दिनी (8 मार्च रोजी) जाहीर करण्यात आलेल्या राज्याच्या चौथ्या महिला धोरणात शासनाच्या अधिकृत कागदपत्रांमध्ये आईचे नाव लिहिणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी तत्काळ करण्याचा मान उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी पटकावला असून मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील त्यांच्या दालनाबाहेर ‘अजित आशाताई अनंतराव पवार’ अशी पाटी, सुटीनंतरच्या पहिल्याच कार्यालयीन दिवशी झळकली […]
मंत्रिमंडळ निर्णय
६१ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ करण्यास मान्यता राज्यातील ६१ आदिवासी अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. 17 अनुदानित प्राथमिक आश्रमशाळांना माध्यमिक आश्रमशाळा म्हणून 2024-25 पासून श्रेणीवाढ करण्यात येईल. तसेच 2024-25 पासून इयत्ता 8 वी, 2025-26 पासून इयत्ता 9 वी आणि 2026-27 पासून 10 वीचा वर्ग सुरु करण्यात […]
अपारंपरिक, नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी क्षेत्रातील मोठ्या प्रकल्पांचे शुभारंभ व भूमिपूजन
महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) चे महामंडळाची सहयोगी कंपनी म्हणून उत्कृष्ट काम मुंबई दि. ११ : राज्यात नाविन्यपूर्ण प्रकल्पांवर भर देण्यात येत आहे. अपारंपरिक व नविनीकरणीय ऊर्जा स्रोतांतील सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, ग्रीन हायड्रोजन या पर्यायांवर अंमलबजावणी केली जात आहे. ग्रीन हायड्रोजनचा वापरास प्रोत्साहन देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे, असे गौरवोद्गार […]
(Central Bank of India) सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 3000 जागांसाठी भरती
Central Bank of India Apprentice Bharti 2024. Central Bank of India Apprentice Recruitment 2024, (Central Bank of India Bharti 2024) for 3000 Apprentice Posts. प्रवेशपत्र निकाल जाहिरात क्र.: — Total: 3000 जागा पदाचे नाव: अप्रेंटिस (Apprentice) शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी. वयाची अट: 31 मार्च 2024 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] वय […]
*हत्तींनंतर रानगव्यांचा धुडगूस; रबी धान केले बुंध्यापासून फस्त, शेतकऱ्यांचे नुकसान*
गडचिरोली: देसाईगंजच्या पूर्वेकडील भागात वाघांची दहशत अजूनही कायम आहे. सोबतच रानटी हत्तींच्या कळपाने शेतकऱ्यांसह वनविभागास सुद्धा जेरीस आणले आहे. हत्तींची दहशत कायम असतानाच आता १२ ते १३ च्या संख्येत असलेला रानगव्यांचा कळप देखील शेतातील धान पिके बुंध्यापासून फस्त करीत आहे. शुक्रवार ८ फेब्रुवारी रोजी पिंपळगाव- विहीरगाव जंगलपरिसरातील पिके रानगव्यांच्या कळपाने फस्त केली. पिंपळगाव- विहीरगाव जंगलाला […]
जिल्हा हादरला! आरोग्य केंद्राच्या शिपायाचे पाच वर्षांच्या मुलीशी कुकर्म; एटापल्ली तालुक्यातील घटना
गडचिरोली : दारासमोर खेळत असलेल्या पाच वर्षांच्या चिमुकलीला स्वतःच्या शासकीय निवासस्थानी बोलावून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शिपायाने अत्याचार केला. एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम गावात ९ मार्च रोजी ही घृणास्पद घटना घडली. वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याने पीडितेची उपचाराअभावी हेळसांड झाल्याने संताप व्यक्त होत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, संतोष नागोबा कोंडेकर (५२, रा. भेंडाळा ता. चामोर्शी) असे आरोपीचे नाव आहे. […]
बांबू, टसर रेशीम शेतीमुळे पूरक रोजगाराची मोठी संधी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मौजे दरे (ता. महाबळेश्वर) येथील बांबू मूल्यवर्धन केंद्र आणि टसर रेशीम शाश्वत रोजगार व वनसंवर्धन प्रकल्पाचे लोकार्पण व गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. बांबू, टसर रेशीममुळे पूरक रोजगाराची मोठी संधी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. दरे येथे झालेल्या कार्यक्रमास राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, […]
जल पर्यटन प्रकल्पामुळे पर्यावरणपूरक विकासासह स्थानिकांच्या रोजगारास प्राधान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
गोड्या पाण्यातील देशातील सर्वात मोठे कोयना जल पर्यटन केंद्र आहे. या माध्यमातून पर्यावरणपूरक विकास आणि स्थानिकांना रोजगारास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. जिल्ह्यातील मुनावळे (ता. जावळी) येथे कोयना जलाशय (शिवसागर) तीर येथे महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विकास महामंडळाच्या कोयना जल पर्यटन शुभारंभ मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी आयोजित समारंभात […]