पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन पुणे, दि. 2: पुणे हे महाराष्ट्रातील विचारवंतांचे शहर आहे. त्यामुळे या ठिकाणी लेखक वाचक महोत्सव होत असल्याचा आनंद आहे. आयोजकांनी स्वत:च्या समाधानासाठी सुरू केलेल्या पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलने शतकी वाटचाल करावी, अशा शुभेच्छा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी त्यांनी दिल्या. यशदा येथील सभागृहात विश्वकर्मा पब्लिकेशन्स आयोजित ‘१० व्या इंटरनॅशनल […]
विदर्भ
पोलीस उपनिरीक्षक पदांच्या शारीरिक चाचणीनंतर चारच तासात निवड यादी, सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गतिमान कामगिरी मुंबई, दि. २ : पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांना पोलीस उपनिरीक्षक पदांसाठीच्या शारीरिक चाचणीनंतर चार तासातच जलदगतीने आणि उमेवारांना प्रतिक्षा करण्याची संधी न देता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निवड यादी व सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. पोलीस उपनिरीक्षक पदांसाठीच्या २५० पदांवर पदोन्नती देण्याकरीता विभागीय […]
महाराष्ट्र शाहीर पद्मश्री कृष्णराव साबळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कार्यक्रम निश्चितीसाठी सल्लागार समितीचे गठन
मुंबई, दि. २ : महाराष्ट्र शाहीर पद्मश्री कृष्णराव साबळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कार्यक्रम निश्चितीसाठी सल्लागार समितीचे गठन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्य सुधीर मुनगंटीवार हे या समितीचे अध्यक्ष असतील. या सल्लागार समितीमध्ये डॉ.प्रकाश खांडगे, शाहीर अंबादास तावरे, केदार शिंदे, भरत जाधव, प्रशांत दामले, नंदेश उमप, शाहीर देवानंद माळी, अंकुश चौधरी, कैलास महापदी, चारुशीला साबळे- वाच्छानी, […]
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत उद्या राज्यस्तरीय कार्यक्रम
मुंबई, दि.2 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत जागतिक दिव्यांग दिनानिमित्त उद्या राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. शनिवारी, 3 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता मुंबई विद्यापीठाचे दीक्षांत सभागृह, फोर्ट, मुंबई येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय […]
उद्योग उभारण्यासाठी देशात महाराष्ट्र अव्वल; यूके इंडिया बिझनेस कौन्सिलने प्रकाशित केला अहवाल
मुंबई, दि. 2 : भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये डुइंग बिझनेस मूल्यांकनात महाराष्ट्र अव्वल आहे; असे यूके इंडिया बिझनेस कौन्सिलने प्रकाशित केलेल्या अहवालात (नोव्हेंबर 2022) नमूद केले असल्याची माहिती, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिली आहे. ‘डुइंग बिझनेस इन इंडिया: द यूके पर्स्पेक्टिव्ह (2022 एडिशन)’ हा यूके इंडिया बिझनेस कौन्सिलचा आठवा […]
विघटनशील पदार्थांपासून बनविण्यात येणाऱ्या एकल वापर स्ट्रॉ, ताट, कप, प्लेट्स, काटे, चमचे यांच्या उत्पादन व वापरास परवानगी – सचिव प्रविण दराडे
मुंबई, दि. २ : महाराष्ट्र शासनाच्या प्लास्टिक बंदी धोरणाच्या अधिसूचनेमध्ये सुधारणा करण्यात आली असून, नव्या निर्णयामुळे विघटनशील (कंपोस्टेबल) पदार्थापासून बनविण्यात आलेले आणि एकदाच वापर होणाऱ्या स्ट्रॉ, ताट, कप, प्लेटस, ग्लासेस, काटे, चमचे, भांडे, वाडगा, कन्टेनर आदी वस्तूंच्या उत्पादनास अनुमती देण्यात आली आहे. अशी माहिती, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग सचिव प्रविण दराडे यांनी पत्रकार परिषदेत […]
डॉ.बाबासाहेब आंबेडकर पर्यटन सर्किटची नोंदणी सर्वांसाठी खुली; पर्यटनप्रेमींनी विनामूल्य सहलीचा लाभ घ्यावा – पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आवाहन
मुंबई, दि. 2 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांविषयी माहिती देण्यासाठी, पर्यटन संचालनालयाद्वारे तयार केलेले ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पर्यटन (टूर) सर्किट’ 3, 4, 7 आणि 8 डिसेंबर 2022, या तारखांना विनामूल्य आयोजित केले आहे. या सहलीचा पर्यटन प्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले. 26 […]
महापरिनिर्वाण दिन : अनुयायांच्या सुविधेसाठी प्रशासन सज्ज
पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून व्यवस्थेचा आढावा मुंबई, दि. २ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांच्या सोयीसाठी राज्य शासन, सामाजिक न्याय विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका, पोलीस यंत्रणा सज्ज आहे. डॉ. बाबासाहेबांच्या अनुयायांना सर्व मूलभूत सुविधा पुरविण्यात येतील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक […]
उर्जा क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणार – उपमुख्यमंत्री
एनेल ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर ॲन्ड नेटवर्क कंपनीचे मार्सेलो कॅस्टीलो आगुर्तो यांनी घेतली उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची भेट मुंबई, दि. १ :- ऊर्जा क्षेत्रात जागतिक पातळीवर नामांकित कंपन्यांपैकी एक असलेल्या इटली येथील एनेल ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर ॲन्ड नेटवर्क कंपनीने ऊर्जा, नवीकरणीय ऊर्जासह इतर क्षेत्रांत महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास स्वारस्य दाखविले आहे. त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा राज्य शासन निश्चितपणे उपलब्ध […]
सॅटेलाईट तंत्रज्ञानाद्वारे राज्याचा बहुआयामी संदर्भमूल्य कोश शक्य – उपमुख्यमंत्री
मुंबई दि २- सॅटेलाईट तंत्रज्ञानाद्वारे विविध क्षेत्रांत उपयोगिता वाढविताना राज्याचा स्वत:चा असा एक बहुआयामी आणि बहुउपयोगी दर्जेदार संदर्भमूल्य असलेला कोष तयार करता येऊ शकतो, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सॅटेलाईट तंत्रज्ञानाद्वारे विविध क्षेत्रातील संनियंत्रणाच्या उपयोगितेसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. यासंदर्भात सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक झाली. यावेळी मुख्य सचिव मनु कुमार […]