मुंबई, दि.१४ : विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांच्या निधनाने अभ्यासू वक्ता, भाषा अभ्यासक, सर्जनशील लेखक, अभ्यासक व संशोधक हरपल्याची शोकभावना सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. मनोहर म्हैसाळकर यांनी साहित्य क्षेत्रात बहुमोल योगदान दिले आहे. गेल्या १० वर्षापासून विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळली. वाड्.मयाच्या क्षेत्रात त्यांनी आयुष्यभर मोलाचे योगदान […]
विदर्भ
तंत्रनिकेतनाच्या उन्हाळी २०२२ फेरपरिक्षेचा निकाल जाहीर; फेरपरिक्षेच्या निर्णयामुळे १३ हजार ७८७ विद्यार्थ्यांना लाभ – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, दि. 14 : मागील दोन वर्ष कोरोनाच्या काळात ऑनलाईन शिक्षण सुरु होते. त्यानंतर प्रथमच उन्हाळी 2022 ही परिक्षा प्रचलित पद्धतीने ऑफलाईन घेण्यात आली. या परिक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक होती. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थी हितासाठी फेरपरिक्षा घेण्यात आली, या तंत्रनिकेतनच्या उन्हाळी 2022 फेरपरिक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परिक्षेमध्ये 13 हजार […]
उमदा साहित्यव्रती हरपला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ साहित्यिक मनोहर म्हैसाळकर यांना श्रद्धांजली
मुंबई, दि. १४ :- ‘मराठी वाङ्मयाच्या सेवेला वाहून घेतलेला उमदा साहित्यव्रती हरपला,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ‘मनोहर म्हैसाळकर यांनी साहित्यिक चळवळीला वाहून घेतले होते. लेखन, संशोधन आणि सर्जनशील साहित्य निर्मिती बरोबरच त्यांनी क्रीडा क्षेत्रात संघटनात्मक कार्य केले. विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्षपदही यशस्वीपणे सांभाळले. […]
गोसीखुर्द प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या २६ गावांच्या पुनर्वसनाबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मुंबई, दि. १४ :- भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द (ता. पवनी) राष्ट्रीय सिंचन प्रकल्पामुळे बाधीत होणाऱ्या भंडारा विधानसभा क्षेत्रातील २६ गावांच्या पुनर्वसनाबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली या गावांच्या पुनर्वसनाच्या मागणीबाबत बैठक झाली. बैठकीस आमदार नरेंद्र भोंडेकर, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान […]
अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे कालव्याचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मुंबई, दि. १४: अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे कालव्याचे काम डिसेंबर २०२२ अखेरपर्यंत पूर्ण करून या भागातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होईल यासाठी जलसंपदा विभागाने प्रयत्न करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. निळवंडे कालव्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, महसुल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, जलसंधारण विभागाचे […]
भंडारा रोड ते भंडारा शहर पर्यंत मेट्रो रेल्वे सुरू करण्यास तत्वत: मान्यता – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. १४: भंडारा रोड ते भंडारा शहर पर्यंत मेट्रो रेल्वे सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तत्वत: मान्यता देण्यात आली. यासंदर्भात महारेल मार्फत रेल्वे आणि राज्य सरकार यांच्या ५०-५० टक्के आर्थिक सहभागासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. भंडारा रोड ते भंडारा शहर पर्यंत मेट्रो रेल्वे सुरू करण्यासंदर्भात आज मंत्रालयात आढावा बैठक […]
शेतकऱ्यांच्या खात्यात १७ ऑक्टोबर २०२२ रोजी PM किसान योजनेचा १२ वा हप्ता जमा होणार !
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना १२ वा हप्ता (२००० रू) लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची कार्यवाही सुरू होणार आहे. यामुळे १७ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता माननीय पंतप्रधानांकडून लाभार्थ्यांशी थेट संवाद आणि १२ वा हप्ता वितरण करतील. प्रधानमंत्री किसान योजनेचे वर्षाला सहा हजार रुपये ज्या ज्या शेतकऱ्यांना येतात त्या सर्व शेतकऱ्यांनी आपली आधार eKYC केली आहे […]
पोलीस शिपाई संवर्गातील सन २०२१ मधील रिक्त पदे १००% भरण्यासाठी नवीन शासन निर्णय जारी
राज्याच्या पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गातील सन २०२१ मध्ये पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक व सशस्त्र पोलीस शिपाई संवर्गात सुमारे ११४४३ इतकी पदे भरतीसाठी उपलब्ध होणार आहेत. दरम्यान वित्त विभाग, शासन निर्णय क्र. पदनि २०२२/प्र.क्र.२/२०२२/ आ.पु.क., दि.१२/०४/२०२२ अन्वये पदभरतीच्या अनुषंगाने सूचना देण्यात आल्या असून यामध्ये सुधारीत आकृतीबंध अंतिम मंजूर केले आहेत, अशा सुधारित आकृतीबंधातील महाराष्ट्र […]
अंधेरी पोटनिवडणुकीसाठी आजअखेर ३ अर्ज दाखल
मुंबई, दि. 13 : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या 166 – अंधेरी (पूर्व) या मतदारसंघाच्या एका जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या जागेसाठी आजअखेर 3 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. अंधेरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघाकरिता श्री. राकेश विश्वनाथ अरोरा (क्रांतिकारी जय हिंद सेना) आणि (हिंदुस्तान जनता पार्टी), श्री. मिलिंद काशिनाथ कांबळे […]
मंगळसूत्र, सिंदूर, हातात चुडा अन्…, विकी- कतरिनाचा पहिला करवाचौथ थाटामाटात साजरा
विशेष म्हणजे तिने तिच्या सासरच्या मंडळींसोबत अगदी पारंपारिकरित्या करवा चौथ साजरा करण्यास प्राधान्य दिले. विवाहित महिलेसाठी करवा चौथ हे व्रत फारच खास मानले जाते. त्यात नवविवाहित लग्न झालेले असेल तर मग वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. नुकतंच अभिनेत्री कतरिना कैफने तिचा पहिला करवाचौथ साजरा केला. कतरिना आणि विकी कौशलचा हा पहिलाच करवा […]