ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी, आपत्तीपूर्व अंदाज येण्यासाठी शासन नावीन्यपूर्ण संकल्पना राबवीत आहे. कोकणातील सागरी किनारा क्षेत्रात पूर प्रतिबंधक बंधारे बांधणे, दरड कोसळण्यास अटकाव करणे, पूरप्रवण क्षेत्रात उपाययोजना करण्यासाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीयस्तरावर वापरण्यात येणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दरड प्रतिबंधक, धूप प्रतिबंधक कामांबाबत तांत्रिक सादरीकरण करण्यात आले. यावेळी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मॉरिशसचे प्रधानमंत्री प्रविंद जगन्नाथ यांचे मॉरिशसला प्रयाण

मॉरिशसचे प्रधानमंत्री प्रविंद जगन्नाथ यांचे मंगळवारी सकाळी मुंबईत आगमन झाले होते. एकदिवसीय दौऱ्यात त्यांनी विविध कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली. मुंबई भेटीनंतर मॉरिशसचे प्रधानमंत्री श्री. जगन्नाथ यांचे आज पहाटे मॉरिशसकडे प्रयाण झाले. मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन निरोप दिला. अतिरिक्त पोलीस आयुक्त, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त तसेच पोलीस व राजशिष्टाचार विभागाचे वरिष्ठ अधिकारी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

कामगारांसाठीच्या ‘तपासणी ते उपचार’ योजनेत प्रत्येक जिल्ह्यातील ५ रुग्णालये व रोग निदान केंद्र संलग्न करणार – कामगारमंत्री सुरेश खाडे

 महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून कामगारांसाठी ‘तपासणी ते उपचार’ ही आरोग्य योजना राबविण्यात येत असून योजनेंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात ५ रुग्णालये व रोग निदान चाचणी केंद्र संलग्न करण्यात येणार आहेत. यात कामगारांच्या कुटुंबाला दोन लाखांपर्यंतचे उपचार मिळणार असून पाच हजारांची औषधे आणि २३ तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत. या योजनेत  कामगाराच्या संपूर्ण […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

‘मृदसंधारण उपाययोजनांद्वारे जमिनीचा विकास’ योजनेअंतर्गत पाणलोट क्षेत्र विकासाकरिता सुधारित मापदंडास मान्यता – मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

मुंबई, दि. 13 : ‘मृदसंधारणाच्या उपाय योजनांद्वारे जमिनीचा विकास’ योजनेंतर्गत जुने मंजूर पाणलोट व नवीन पाणलोटांना मंजूरी देऊन पाणलोट पूर्ण करण्याकरिता, इतर क्षेत्रासाठी प्रती हेक्टर रु.२२,०००/- व डोंगराळ क्षेत्रासाठी प्रती हेक्टर रु. २८,०००/-  मापदंड निश्चितीस मान्यता देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली. या योजनेचा उद्देश राज्यातील अपूर्ण पाणलोट […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

विकासप्रकल्प निधी किंवा प्रशासकीय मान्यतेअभावी प्रलंबित राहू नयेत – उपमुख्यमंत्री अजित पवार

 “राज्यातील महत्त्वाचे विकासप्रकल्प निधी किंवा प्रशासकीय मान्यतेअभावी प्रलंबित  राहणार नाहीत. पुणे मेट्रो, पुणे रिंगरोड, पुणे नाशिक हायस्पिड रेल्वे, सातारा, अलिबाग येथील वैद्यकीय महाविद्यालये, ‘सारथी’संस्थेचे पुण्यातील मुख्यालय, औंध, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, अमरावतीतील ‘सारथी’च्या विभागीय उपकेंद्रांचे बांधकाम युद्धपातळीवर पूर्ण करावे,” असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात, उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प सनियंत्रण […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

‘आयुष्मान भव’ मोहिमेत महाराष्ट्र उत्कृष्ट काम करून दाखवेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

‘आयुष्मान भव’ मोहिमेत महाराष्ट्र उत्कृष्ट काम करून दाखवेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही आपल्याकडे निरोगी आयुष्यासाठी ‘आयुष्मान भव’ असा आशीर्वाद दिला जातो. या भावनेतून देशवासियांच्या निरोगी आयुष्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘आयुष्मान भव’ मोहिमेची सुरूवात राज्यभर करणार आहोत. या मोहिमेत महाराष्ट्र देशामध्ये उत्कृष्ट काम करून नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देईल, […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या करंचा येथील शंकर लिंगा सिडाम यांच्या कुटुंबाला मिळाला आधार

अहेरी इस्टेटचे दानशूर राजे तथा माजी पालकमंत्री राजे अंब्रिशराव आत्राम यांनी दिला मदतीचा हात अहेरी तालुक्यातील करंचा येथील स्थानिक रहिवासी श्री.शंकर लिंगा सिडाम वय-40 वर्षे हे आपल्या घरच्या बैलांना जंगलात नेहमी चरण्यासाठी घेऊन  जात असत.ते काल सुध्दा नेहमी प्रमाणे जंगलात बैलांना घेऊन गेले असता.नकळत पणे एका अस्वलाने शंकर लिंगा सिडाम यांच्या वरती हल्ला केला त्या […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या मुंबई राज्य विदर्भ

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची IRCTC वेब साइटवर ऑनलाईन बस बुकिंग सेवा सुरु

एसटी महामंडळाने प्रवाशांना एक गुड न्यूज दिली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची ऑनलाईन बस बुकिंग सेवा सक्षम करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्याची घोषणा आयआरसीटीसीने केली आहे. त्यामुळे आता IRCTC च्या वेबसाईटद्वारे एसटी बसचे तिकीट काढता येणार आहे. प्रवाशांना https://www.bus.irctc.co.in या वेबसाईटवर जाऊन तिकीट बुक करता येणार आहे. प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी करण्यासाठी IRCTC ने हा निर्णय […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

दुर्गम भागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध:भाग्यश्रीताई आत्राम

राज्याच्या शेवटच्या टोकावरील गावात चावडी सभा अतिदुर्गम भागातील गावांत होणार विकासात्मक कामे एटापल्ली:-अतिदुर्गम भागातील गावांत विविध विकासात्मक कामे करून गावाचा कायापालट करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन माजी जि.प.अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांनी केले. राज्याच्या शेवटचा टोक व छत्तीसगडच्या सीमेवर वसलेल्या अतिदुर्गम जवेली (बु.) येथे आयोजित चावडी सभेत ते बोलत होते.यावेळी माजी जि प सदस्य […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

प्रलंबित वनहक्क दावे निकाली काढण्यासाठी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

 तालुक्यातील विविध गावातील नागरिकांच्या प्रलंबित वनहक्क दावे निकाली काढण्यासाठी माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी अहेरी चे अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांच्याशी सकारात्मक चर्चा केली. मागील अनेक वर्षांपासून विविध कारणाने या भागातील नागरिकांचे वनहक्क दावे निकाली काढण्यात आले नाही.त्यामुळे नागरिकांना अनेकदा विविध कार्यालयात चकरा मारावे लागत आहे.या बाबीची दखल घेऊन भाग्यश्री ताई आत्राम […]