ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र राज्य विदर्भ

१७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान ‘आयुष्मान भव:’ मोहीम

देशभरात 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत ‘आयुष्मान भव:’ मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणार असून राज्यस्तरावर या मोहिमेचा कार्यारंभ सोहळा राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

आता CMMRF अ‍ॅप्लिकेशनवर अर्ज भरून मिळवता येणार मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी

आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळविणे आणखी सोपे झाले आहे . आता CMMRF या अ‍ॅप्लिकेशनवर अर्ज भरुन मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळविता येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने मागील वर्षी पहिल्याच जुलै महिन्यात याद्वारे 178 रुग्णांना 76 लाखांची मदत देण्यात आली.  *पहा काय म्हणाले […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

अरविंद पोरेड्डीवारांच्या स्वागतासाठी गडचिरोलीत उसळला जनसागर सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या जीवनगौरव पुरस्काराने नाशिक मध्ये गौरव

राज्याच्या सहकार क्षेत्रात नावलौकीक प्राप्त केलेले सहकार महर्षी अरविंद सा. पोरेड्डीवार यांना महाराष्ट्र सहकारी बॅंक्स असोसिएशन मुंबईच्या वतीने राज्याच्या सहकार क्षेत्रातील कै. विष्णू अण्णा पाटील जीवन गौरव पुरस्कार नाशिक येथील एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. अरविंद पोरेड्डीवारांना प्रदान करण्यात आलेला जीवन गौरव पुरस्कार हा त्यांच्या सहकार क्षेत्रातील उल्लेखनिय कार्याची पावती असून राज्यस्तरावर गडचिरोली जिल्हयाचा नावालौलिक […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार द्वारा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांना सन्मानपत्र प्रदान..

अहेरी विधानसभा क्षेत्रातील टिबी रुग्णांना माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री गडचिरोली जिल्हा श्रीमंत राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी 538267473 या आयडीने नि-क्षय मित्र म्हणून ‘प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाअंतर्गत अहेरी विधानसभा क्षेत्रातील टीबीचे उपचार घेत असलेल्या व्यक्तींना पाठिंबा देण्यासाठी नोंदणी केली आहे. राजेंचे बहुमोल सहकार्य भारतातून टीबी दूर करण्यात देशाला मदत होतो आहे करीता भारत सरकारचे […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

प्रत्येक शिधापत्रिकाधारकांपर्यंत धान्य पोहोचवावे – मंत्री छगन भुजबळ

प्रत्येक पात्र लाभार्थ्याला स्वस्त धान्य मिळायलाच हवे. त्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी. तसेच गरीब, गरजू लाभार्थींना विनासायस  शिधापत्रिका देखील दिल्या जाव्यात, असे निर्देश अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री  छगन भुजबळ यांनी येथे दिले. मुंबईतील आझाद मैदानात अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने रेशन दुकानाच्या बाबतीत विविध मागण्यांसाठी आज आंदोलन करण्यात आले. मंत्री श्री. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

उत्कृष्ट गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

राज्य शासनाने १९ सप्टेंबरपासून सुरु होणा-या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मुंबई, मुंबई (उपनगर), पुणे, ठाणे या जिल्ह्यातून प्रत्येकी ३ व अन्य जिल्ह्यातून प्रत्येकी १ याप्रमाणे एकूण उत्कृष्ट ४४ गणेशोत्सव मंडळाची निवड करण्यात येणार आहे. या ४४ गणेशोत्सव मंडळांमधून राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळास रुपये ५ लाख, व्दितीय क्रमांकास रुपये २.५० […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

नॅक मूल्यांकन न करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई होणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

राज्यातील उच्च शिक्षण संस्थांनी नॅक मूल्यांकन करावे, यासाठी उच्चशिक्षण विभागाकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, अपेक्षित नॅक मूल्यांकन होत नाही. यासाठी विद्यापींठानी पुढाकार घेऊन महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन करून घ्यावे. नॅक मूल्यांकन न करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करावी, असे आदेश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. मंत्रालयात आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री […]

अकोला ताज्या घडामोडी ताज्या बातम्या यवतमाळ विदर्भ

तालूका स्तरीय क्रीडा स्पर्धेत जय पेरसापेन हायस्कूल, माळंदा अव्वल

       गडचिरोली   जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने तालूकास्तरीय क्रीडा स्पर्धा महेश सावकार पोरेड्डीवार हायस्कूल चातगाव  येथे पार पडल्या. त्या स्पर्धेत जय पेरसापेन हायस्कूल माळंदाच्या चमूने १७ वर्षे वयोगट मुले-मुली खो-खो स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविले.१४ वर्षे वयोगट मुले खो-खो स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविले. यशाबद्दल अबूझमाळ शिक्षण मंडळाचे सचिव प्राचार्य एस.एस.पठाण, प्राचार्या लीना हकीम,तालुका क्रीडा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ६ : – ओबीसी बांधवांवर अन्याय न करता, त्यांच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जाणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे स्पष्ट केले आहे. वर्षा शासकीय निवासस्थानी रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. पण काही मंडळी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी समिती गठित

मराठा समाजातील ज्या व्यक्तींनी मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीच्या जात प्रमाणपत्राची मागणी केली असेल अशा व्यक्तींनी सादर केलेल्या निजामकालीन महसुली अभिलेखात, शैक्षणिक अभिलेखात तसेच अन्य अनुषंगिक समर्थनीय अभिलेखात जर त्यांच्या वंशावळीचा उल्लेख ‘कुणबी’ असा असेल, तर अशा व्यक्तींनी सादर केलेल्या पुराव्यांची काटेकोर तपासणी करुन त्यांना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र प्रदान करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्याचप्रमाणे […]