सांज मल्टी ऍक्टिव्हिटी डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट यस्टर एरिया बिनागुंडा स्थित भामरागड या स्वयंसेवीस सामाजिक संस्थेद्वारा दिनांक 22/12/2024 ला भामरागड येथे संस्थेच्या कार्यालयात दिव्यांग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. अपंग प्रमाणपत्र, UDID नोंदणी , अपंग प्रमाणपत्र धारकास संजय गांधी निराधार योजनेच्या लाभाकरिता 67 दिव्यांग महिला/ पुरुषांची नोंदणी केली. संस्था स्वखर्चाने दिव्यांग लाभार्थ्या करिता प्रयत्न करणार आहे.
मेळाव्या करिता उद्घाटक म्हणून मा. श्री. किशोर बागडे तहसीलदार, भामरागड , प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भूषण चौधरी ( वैद्यकीय अधीक्षक ) ग्रामीण रुग्णालय भामरागड , तसेच श्री. गाडे साहेब मंडळ अधिकारी भामरागड मंचावर उपस्थित होते.
मेळाव्यात दिव्यांगाना मार्गदर्शन करताना मा. बागडे साहेब यांनी दिव्यांगा करिता सुरू असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती देत दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक योजना आणि दिव्यांग आरक्षण व पुर्नवसन बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. दिव्यांग मेळाव्यातून दिव्यांगाच्या अडचणी लक्षात घेत दिव्यांगांना कृत्रिम अवयव व सहाय्यक उपकरणे, तसेच अपंग प्रमाणपत्रापासून वंचित असलेल्या अपंगांना अपंग प्रमाणपत्र व प्रमाणपत्राचे नूतनीकरण बाबत भामरागड येथे तालुकास्तरीय मेळावा आयोजित करून दिव्यांगाना त्याचा लाभ देण्यात येईल असे सांगितले.
भामरागड तालुक्याच्या सर्वांगीण विकासाकरिता तालुक्यातील इतर घटकासह दिव्यांग व्यक्तींना विकास सक्षम बनविणे व त्यांचे पुर्नवसन करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे समाजातील इतर घटकांनी दिवयांगाच्या अपयशाकडे न बघता उपचारात्मक दृष्टिकोन बदलून त्याच्याकडे सकारात्मकतेने पाहणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन मेळाव्याचे आयोजक कुमार रुपलाल गोंगले यांनी केले.
मेळाव्याच्या यशस्वी तेकरिता श्री. अशोक आलाम श्री. वैभव मेश्राम , श्री.अलपाज शेख यांनी अथक परिश्रम घेतले.