ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

गरीब कुटुंबातील मुलींना मिळणार 1 लाख रूपये, पात्रता काय कोणती कागदपत्रे लागणार, जाणून घ्या

महाराष्ट्र सरकारने अनेक योजना महिलांसाठी, मुलींसाठी राबवल्या आहेत. त्याचप्रमाणे मुलींसाठी *लेक लाडकी योजना* सुरु केली आहे. मुलींच्या जन्मापासून ते 18 वर्षांच्या होईपर्यंत आर्थिक मदत केली जाते.
 *लेक लाडकी योजनेचा लाभ कोणाला मिळणार.*
पिवळ्या व केशरी रेशनकार्ड लाभार्थी कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर 5 हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर 6 हजार रुपये, सहावीत गेल्यावर 7 हजार रुपये, 11 वीत गेल्यावर 8 हजार रुपये, 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 75 हजार रुपये, अशा रितीने एकूण त्या मुलीस 1 लाख रुपये एवढा लाभ मिळणार आहे.
 शासनामार्फ़त थेट (DBT) द्वारे लाभाची रक्कम लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. 1 एप्रिल 2023 नंतर कुटुंबात जन्मणाऱ्या 1 अथवा 2 मुली त्याचप्रमाणे 1 मुलगा व 1 मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळेल.
 *योजनेच अर्ज कुठे कराल.*
– तुमच्या भागातील अंगणवाडी सेविका कडे तुम्हाला योजनेसाठी अर्ज करायचा आहे.
– अर्जात तुमची वैयक्तिक माहिती, पत्त्याची माहिती, मोबाईल नंबर, अपत्यांची माहिती, बँक खात्याचा तपशील व योजनेच्या कोणत्या टप्प्यातील लाभासाठी अर्ज केला ते लिहायचं आहे. तारीख, ठिकाण टाकून सही करायची आहे.
– अर्ज करून झाला की अंगणवाडी सेविकेकडून पोहोच पावती घ्यायची आहे.
 *योजनेसाठी आवश्यक.*
– लाभार्थीचा जन्माचा दाखला
– कुटुंब प्रमुखांच्या उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.)
* लाभार्थीचे आधार कार्ड (प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहिल.)
– पालकाचे आधार कार्ड
– बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स
– रेशनकार्ड (पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड साक्षांकित प्रत)
 अंगणवाडी सेविका योजनेसाठीचा अर्ज व कागदपत्रे नीट तपासून घेतली की त्याची नोंदणी सरकारच्या ऑनलाईन पोर्टलवर करायची आहे.